दर महिन्याला तुमच्या खात्यावर जमा होतील 12 हजार रुपये ; कसे ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- भारतीय जीवन विमा महामंडळात (एलआयसी) गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. एलआयसी ही सरकारतर्फे चालवणारी कंपनी असून गुंतवणूकीनंतर पैसे बुडण्याची चिंता नाही. जर आपणही गुंतवणूकीची योजना आखत असाल तर आपण एलआयसीच्या ‘जीवन अक्षय’ एन्युटी योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळू शकेल. आपण या … Read more

आता व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट हिस्ट्री टेलीग्रामवरही करता येणार ट्रान्सफर ; जाणून घ्या प्रोसेस

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- आपणास व्हॉट्सअ‍ॅप सोडायचे असेल परंतु चॅट हिस्ट्रीचे काय होईल होईल याबद्दल संभ्रम असेल तर टेलीग्रामने यावर उपाय शोधला आहे. टेलिग्रामने एक फीचर लॉन्च केले आहे ज्याद्वारे व्हॉट्सअ‍ॅपची चॅट हिस्ट्री टेलिग्राममध्ये ट्रांसफर केली जाऊ शकते. याचा फायदा असा होईल की प्लॅटफॉर्मवर स्विच करताना वापरकर्त्यास जुन्या चॅटशी तडजोड करावी लागणार … Read more

अवघ्या 7 टक्के दराने मिळेल गोल्ड लोन; कोठे ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- गुंतवणूकीमुळे आपणास आर्थिक संकटापासून मुक्त होण्यास मदत होते. जर आपण गुंतवणूक केली नसेल तर कर्ज काम करू शकते. जर आपल्याला कर्ज घ्यायचे असेल तर आपण ते परतफेड करण्याची पूर्ण तयारी केली पाहिजे. जोपर्यंत सुलभ कर्ज घेण्याचा प्रश्न आहे, तर वैयक्तिक कर्जापेक्षा गोल्ड लोन अधिक चांगले आहे. कमी व्याज … Read more

बी. जी.कोळसे पाटील म्हणाले…तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच माणूस

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- एल्गार परिषदेचे आयोजक, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान, लाल किल्ल्यावर ज्यानं झेंडा फडकवला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माणूस होता, असा थेट आरोप कोळसे पाटील यांनी केला आहे. यावेळी … Read more

मोठी बातमी : कोरोनासाठी ‘सीरम’ आणखी एक लस आणणार ? जून 2021 पर्यंत करणार लॉन्च

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर्श पूनावाला यांनी शनिवारी सांगितले की, त्यांच्या कंपनीने कोविड -19 च्या आणखी एक लसीची चाचणी घेण्यास अर्ज केला आहे आणि संस्थेने जून 2021पर्यंत ते तयार करणे अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी सिरम ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडिश कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचे लायसेन्स RBI ने केले रद्द

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयने शुक्रवारी सांगितले की, महाराष्ट्रातील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे कारण त्यात भांडवल आणि कमाईची क्षमता राहली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) महाराष्ट्रातील दुसर्‍या बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार … Read more

उपमुख्यमंत्री म्हणतात… लोकांचा जीव वाचवणे हे सरकारचे आद्यकर्तव्य

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- सध्या राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना तिन्ही पक्षांचे सरकार असल्यामुळे कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र विकासकामांसोबत लोकांचं आरोग्य चांगल राहील पाहिजे, कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे लसीकरणाचे टप्पे ठरवण्यात आलेले आहेत. लोकांचा जीव वाचवणे हे सरकारचे आद्यकर्तव्य असल्याचे मत उपमुख्मंत्री अजित पवार यांनी सांगितले. ना.पवार आज जिल्हा दौऱ्यावर … Read more

वीजबिल वसुलीवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- महावितरण कंपनीने थकबाकीदारांना वीज कापण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. आर्थिक स्थिती नाजूक झाल्याचे कारण पुढे करीत राज्यात 71 लाख 68 हजार 596 वीजग्राहकांना अशा नोटीस आल्या आहेत. दरम्यान निश्चित मुदतीत वीजबिल न भरल्यास वीजप्रवाह खंडित करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. यावरून सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या मुद्याला राजकीय … Read more

शेतकऱ्यांनी सवलतीच्या दराचे वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-सौर उर्जा पर्यावरणपूरक आहे. त्यामधून हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ह्रास होत नाही तसेच सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येत असल्याने सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राहूरी येथे केले. एकात्मिक उर्जा विकास-1 अंतर्गत … Read more

डॉ. विखे म्हणाले कोरोना महामारीचा शेवटचा प्रवास सुरू…

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- कोरोना महामारीचा शेवटाचा प्रवास आता सुरू झाला आहे. कोविड लसीकरण मोहीम हे यातील एक सकारात्मक पाऊल आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्वात मोठे लसीकरण प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठात सुरू झाल्याची माहिती विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली. प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाचा … Read more

चावट आमदार…विधानपरिषदेत पाहत होते अश्लील व्हिडीओ

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- काँग्रेसचे आमदार प्रकाश राठोड यांच्यावर विधान परिषदेच्या सभागृहामध्ये पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचा आरोप होत आहे. राठोड हे आपल्या मोबाईलवर स्क्रोल करत असताना त्यांच्या फोनमध्ये अश्लिल व्हिडीओ असल्याचे दृष्य कॅमेरात कैद झाली आहे. राठोड यांनी यासंर्भात प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरणही दिले. इंटरनेटवर मी काही बघत नव्हतो. मी माझ्या मोबाईलमधील काही व्हिडीओ … Read more

‘येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल’ !

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-मनसेने मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची तुलना विरप्पन गँगशी केली आहे. ‘विरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल,’ असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. दरम्यान मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी आज मनसेची … Read more

फरार बोठेच्या अटकेसाठी थेट गृहमंत्र्यांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी हत्याकांडाचा सूत्रधार सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठे याच्या अटकेसाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहे, मात्र पोलिसांना यश येत नाही आहे. फरार बाळाचा तातडीने शोध घेण्यात यावा व त्याला अटक करण्यात … Read more

ब्रेकिंग न्यूज ! अखेर अण्णा हजारेंचे उपोषण मागे

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे 30 जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, आज अण्णांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चाैधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली व ही भेट यशस्वी ठरली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे … Read more

‘आपल्याला फार काळ विरोधी पक्षात राहायचं नाही’

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू’, असे सूचक वक्तव्य यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या … Read more

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन वाढला!!

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, तसे आदेश आज काढण्यात आले आहेत. लॉकडाउन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला असून, आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना … Read more

मेट्रोच्या मुद्द्यावरून महसूलमंत्र्यांचा माजी मुख्यमंत्र्याना शाब्दिक टोला

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-विकासात्मक कामे असो व राजकीय मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच शाब्दिक चकमक उडत असते. नुकतेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाब्दिक टोला लगावला आहे. मुंबईतील मेट्रोच्या कामावरून थोरात यांनी फडणवीस यांच्यावर ट्विटरच्या माथ्यमातून निशाना साधला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई मेट्रोची फार चिंता … Read more

सर्वसामान्यांच्या वापराचे साबण आणि तेल महागणार !

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- तेल, साबण यांसारख्या दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या हिंदुस्तान युनिलीव्हर लिमिटेड (एचयूएल)ने आपल्या त्वचा स्वच्छतेच्या उत्पादनांच्या किमतीत २.५ टक्क्यांनी वाढ केली आहे, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्पादन करताना वाढलेल्या खर्चामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. डिसेंबर २०२० च्या तिमाहीत कंपनीच्या त्वचा स्वच्छतेसंबंधीच्या उत्पादनांमध्ये ही … Read more