रस्तालूट करणाऱ्याआरोपीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- शाहरुख अन्वर कोथमिरे (वय २६, रामनगर वॉर्ड १ श्रीरामपूर) हे मोटारसायकलीवर २ नोव्हेंबरला शिरसगाव रोडने जात असताना ओव्हरब्रिजजवळ पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांना अडवून खिशातील ३ हजार रुपये व मोबाइल लांबवला. या प्रकरणी गौरव संजय रहाटे (दत्तनगर, श्रीरामपूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. गुन्ह्याचा समांतर तपास … Read more

दिवाळी नाही त्यांच्या नावाने शिमगा करा बंडातात्या कराडकर सरकारवर संतापले

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीनंतर मंदिरे खुली करू, असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी कडाकून टीका केली आहे. देशभरातील मंदिरे सुरू झाली तरीही महाराष्ट्रातील देव बंदीवासात असताना दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला केला आहे. पार्ट्या चालतात, हळदी-लग्न समारंभ चालतो, हॉटेल, बार … Read more

बच्चू कडू यांच्या ‘त्या’ वक्त्यामुळे राजकारणात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- मागील निवडणूक हि अनेक बड्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आली होती. अनेक दिग्ग्ज नेत्यांनी वर्षानुवर्षे कामे केलेल्या पक्षांना रामराम ठोकत विरोधी पक्षात प्रवेश केला होता. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. यातच राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू हे नगर दौऱ्यावर आले होते. यातच त्यांनी एक वक्तव्य केले ज्यामुळे राजकीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खूनप्रकरणातील आरोपीस अवघ्या बारा तासांत अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून निर्घृण खून करण्याची घटना काल सकाळी नगर शहरातील निंबळक बायपास परिसरात घडली होती.दरम्यान अवघ्या बारा तासांत या गुन्हयातील आरोपीस अटक करण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनला यश आले आहे. निंबळक बायपास लामखेडे पंपाजवळ रामदास बन्सी पंडीत वय 50 रा.निंबळक ता.जि.अहमदनगर यांचा … Read more

स्टेट बँक ऑफ इंडियाने उजळली वंचित मुलांची दिवाळी.

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील गरीब आणि वंचित समूहातील लोकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आपल्या सामाजिक दायित्व धोरणानुसार दरवर्षी वंचितांसाठी काम करणाऱ्या संस्थांना बँक कर्तव्यभावनेतून सहयोग देते ,असे प्रतिपादन बँकेचे क्षेत्रीय अधिकारी महेंद्र मोहिते यांनी केले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहमदनगर औद्योगिक वसाहतींमधील विभागीय कार्यालयाने अहमदनगर आणि … Read more

पुन्हा घराणेशाही… नगर आणि नेवासा तालुक्याला मिळतेय झुकते माप

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-भाजपा युवा मोर्चाच्या नगर (दक्षिण ) जिल्हा कार्यकरणी आज जिल्हाअध्यक्ष अरुण मुंढे यांनी जाहीर केली. जिल्हाध्यक्ष पदी सत्यजित कदम यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस पदी अक्षय कर्डिले, गणेश कराड यांची निवड करण्यात आली. मात्र या निवडीवरून आता कलह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरमध्ये जाहीर झालेल्या युवा मोर्चाच्या … Read more

कांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला; कमी खर्चात मिळणार भरघोस उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यातच अतिवृष्टीमुळे कांदारोपांचे मोठे नुकसान झाले. कांदारोपांची नासाडी झाल्याने, पुन्हा रोपे टाकून लागवडीऐवजी थेट कांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच कांदापेरणी वाढल्याने तालुक्‍यातील कांद्याचे क्षेत्र … Read more

शिर्डीच्या ‘त्या’ रिक्त जागेवर तुकाराम मुंडेंची नियुक्ती करावी

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नुकतीच मुंबई येथे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे. बगाटेंची बदली झाल्यानंतर शिर्डी संस्थानची सुत्रे कोणाच्या हातात देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच या महत्वाच्या पदावर शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती असलेले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील गटनेते अनिल कराळे यांचे दीर्घ आजाराने आज (दि.13) निधन झाले. ते 41 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार चालू होते. ऐन दिवाळीत कराळे यांच्या निधनाचे वृत्त आल्याने शिवसेनेत शोककळा पसरली आहे. त्यांचे मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी महापौर संदीप कोतकर यांच्या बंगल्यात चोरी, लाखोंचा मुद्देमाल….

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-  माजी महापौर संदीप कोतकर व भानुदास कोतकर यांच्या अहमदनगर शहारातील केडगाव मधील बंगल्यात काल रात्री चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. घरातील रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात … Read more

कोरोनाचे भय कायम, नवीन वर्षात दुसर्‍या लाटेची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने वर्तवली आहे. त्यासंदर्भात प्रत्येक जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला खबरदारी म्हणून संभाव्य लाटेची पूर्वतयारी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. “सध्या राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तर युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आहे. युरोपियन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या सेक्स रॅकेट बद्दल धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यामध्ये सेक्स रॅकेट करणारी टोळी सध्या सक्रीय झालेली असून वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर मजा लुटणारे लुटेरे पुढे येत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय बंद ठेवण्यात आल्यामुळे सुखसोयीनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल लॉजऐवजी घरगुती वेश्याव्यवसायच सुरक्षित वाटू लागल्याने अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळ्या समोर येत आहे. श्रीगोंदा शहरातील उच्चभ्रू … Read more

उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोमय्या यांनी नाईक परिवाराशी असलेल्या आर्थिक संबंधाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत.ते का लपवण्यात … Read more

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीजेची भेट

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी … Read more

खासगी शाळांचा मुजोरपणा; पालकांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेत मांडले गाऱ्हाणे

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य अद्यापही शाळा बंदच ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच या काळात शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी वसुल करणार्‍या खासगी शाळांबाबत पालक वर्गांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्य शालेय शिक्षण मंत्री बच्चूभाऊ कडू एका कार्यक्रमा निमित्त शहरात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज २२८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ६०३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.११ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२८ ने वाढ … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे! या तीन दिवसांसाठी कांदा मार्केट बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कृषि उत्पन्न बाजार समिती अहमदनगरचे नेप्ती येथील कांदा लिलाव आजपासून पुढील तीन दिवस (दि.१२ ते १४) होणारे कांदा लिलाव दीपावली सणानिमित्त होणार नाहीत. सदरचे तीन दिवस कांदा मार्केट बंद राहिल. सोमवारपासून (दि. १६) नेप्ती उपबाजार कांदा मार्केटमध्ये कांदा लिलाव चालू राहतील. याची सर्व कांदा उत्पादक शेतकरी यांनी नोंद … Read more

बँकेतून काढलेले पैसे चोरट्याने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच संगमनेर तालुक्यात एक चोरीची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथील सेंट्रल बॅक ऑफ इंडियाच्या शाखेमधून सखाहरी विष्णू दुशिंग (रा.जांबुत खुर्द) या वयोवृद्धाने वीस हजार रूपये काढून खिशात ठेवले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने पाळत … Read more