फ्रान्स राष्ट्रपतींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी; आंदोलकांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील हातमपुरा चौकात फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्या पुतळ्यास फासावर टांगण्यात आले. तर मॅक्रॉनचे फोटो असलेले फलक रस्त्यावर लावून पायदळी तुडवून त्याच्यावर चिखलाचा मारा करण्यात आला. मोहंमद पैगंबरांचं व्यंग्यचित्र काढणार्‍या मासिकाचे समर्थन केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान परवानगी न … Read more

गणेश चौक ते बोल्हेगाव रस्त्यावरील खड्डे बुजवावे – कुमारसिंह वाकळे

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- बोल्हेगाव नागापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. परंतु नागरिकांचे विविध प्रश्न प्रलबिंत आहे. गणेशचौक ते बोल्हेगाव पर्यंत जाणाऱ्या रत्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करीत असातांना आपला जीव मुठीत धरून करावा लागतो. या रस्त्यावर दिवसभर अनेक छोटेमोठे अपघात होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न … Read more

एक्साईट बॅटरी कंपनीतील कामगारांना २४,४१४ रू बोनस व बक्षिस वाटप !

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- कोरोणासंसर्ग विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. आता हे सर्व उद्योग धंदे सुरू झाले असून एक्साईट कंपनीमध्ये कामगाराकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढून घेतले आहे. यासाठी कामगारानीही रात्रंदिवस काम करून १२ लाख ५० हजार बॅट्यांचे उत्पादन काढून दिले आहे. यासाठी दि. २३ ऑक्टोबर रोजी कंपनी … Read more

बनावट डिजेल रॅकेटच्या मुख्य आरोपीला अटक करा. – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील बनावट डिजेल व नाप्ता भेसळ रॅकेटचा पोलिस पथकाने कारवाई करून वीस दिवसाचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापपर्यंत या डिजेल रॅकेटमधील मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात आलेली नाही. या पूर्वीच्या नाप्ता भेसळ प्रकरणाचा तपासही अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची माहीती आहे. तरी यातील … Read more

थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने वीज उपकेंद्रला टाळे ठोकले

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- ग्राहकांनी विजेचे बिल भरले नाही तर आक्रमक कारवाई करत ग्राहकाचे वीज कनेक्शन कट करून त्यांना अंधारात लोटणाऱ्या महावितरणालाच नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायतीने चांगलाच शॉक दिला आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील 220 केव्ही वीज उपकेंद्राकडे असलेली 18 लाख 72 हजार 971 रुपयांची कर थकबाकी वसुलीसाठी सौंदाळा ग्रामपंचायतीने आज (दि.9 नोव्हेंबर) … Read more

सणासुदीच्या काळात चोरट्यांचा हौदास; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यावर संकटामागून संकटे येत आहे. कोरोनाचे संकट संपते तोच चोरट्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. एकीकडे अवैध धंद्यांवर कारवाई करणारे पोलीस प्रशासन वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यात साफ अपयशी होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे वर्षाचे सण काही दिवसांवर आले आहे, त्यातच चोरटे सक्रिय झाले असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे … Read more

डाळिंब उत्पादकांना ६कोटी ३९ लाख ८३हजार रुपयांचा विमा मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ६ कोटी ३९लाख ८३ हजार ६५० रुपयांचा आंबिया बहार २०१९/२० चा विमा मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली . श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांशी शेतकरी हे फळबाग व डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी आंबिया बहार २०१९-२०मध्ये डाळिंब या फळ पिकाचा … Read more

खाकीची दहशत! या तालुक्यातील बेकायदेशीर कत्तलखाने झाले बंद

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे. शेकडो वेळा कारवाया करूनही संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखाने खुलेआम सुरुच असतात. मात्र शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची बदली होऊन नविन पोलीस निरीक्षक येणार असल्याच्या धास्तीने संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखाने … Read more

ट्रॅक्टर चालकाने वयोवृद्ध महिलेला चिरडले; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नेवासा तालुक्यात खडका शिवारात शेती गट नं. १५५/५ येथे टॅक्टरचालक ट्रॅक्टर हार्वेस्टरने ऊसाची तोड चालू असताना ट्रॅक्टरमागे उसाची टिपरे वेचणारी महिला साखरबाई दामोधर थोरात, (वय ७० रा. खडका) या महिलेस ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे, अविचाराने परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून महिलेस धडक देवुन उडविले. या अपघातात साखरबाई … Read more

बापरे ! या तालुक्यात आता तिसऱ्या बिबट्याचे दर्शन..

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-कालपर्यंत पार्डिी तालुक्यात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून आज परत नगर व आष्टी तालुक्यातील मराठवाडी घाटदेऊळगाव या परिसरात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या भागातील जाधव वस्तीवर राहणाऱ्या लोकांना बिबट्या दिसल्याने या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून पाथर्डी तालुक्यातील मढी केळवंडी … Read more

साता जन्माची साथ देणारा पतीच निघाला वैरी; पत्नीला विष पाजण्याचा केला प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- साता जन्माची साथ देण्याची शपथ घेऊन आयुष्यभरासाठी लग्नाच्या बेडीत अडकलेले पती – पत्नी आजवर आपण पहिले असतील. मात्र येथे खुद्द पतीनेच केवळ पैशासाठी आपल्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. पत्नीने आपल्या पतीस पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या तोंडात विषारी औषध … Read more

धक्कादायक! विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता महिलेचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- महिला आत्महत्येचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. कौटुंबिक छळातून महिलांच्या आत्महत्या घडत असताना आणखी एक धक्कादायक घटना जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घडली आहे. राहाता शहरातील अस्तगाव रोड लगत असलेल्या एका शेतातील विहिरीत विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या बाबत समजलेली माहिती अशी कि, अलका भाऊसाहेब … Read more

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! शिष्यवृत्ती परीक्षा ‘या’ महिन्यात होणार

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 मध्ये घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता 5 वी ) व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) फेब्रुवारी ऐवजी एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा … Read more

यंदाच्या दिवाळीबाबत पवार कुटुंबीयांनी घेतला हा महत्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात. असे आवाहन पवार कुटुंबीयांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व इतर … Read more

बिग ब्रेकिंग : अर्णब गोस्वामीचा जामीन नाकारला !

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- पत्रकार अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णब गोस्वामी यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे … Read more

डिझेल प्रकरणाचा तपास आता पोलीस उपाधीक्षक मिटके यांच्या खांद्यावर

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात वाढते अवैध धंदे हे वाढत असताना त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र पोलिसांची हि कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे. यामुळे काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. यातच जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले होते. यातच पुन्हा एक मोठी माहिती समोर येत … Read more

डिझेल प्रकरण! मंत्र्यांच्या दबावातून ‘त्या’ पथकातील पोलिस सस्पेंड

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले आहे. दरदिवशी याप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान हे प्रकरण घडल्यानंतर पोलीस प्रशासनावरच शिंतोडे उडवण्यात आले. यातच काहींवर निलंबनाची कारवाई देखील झाली. यातच जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने या प्रकरणावरून मोठा आरोप केला आहे. नुकताच या प्रकरणाचा तपास तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक … Read more

मास्कचा वापर न करणार्‍यांवर होणार दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- संपुर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. तसेच कोरोनाला हद्दपार करण्यासाठीची लढाई जिल्ह्यात सुरु असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे. दरम्यान शासनाच्या नियमांचे भंग केल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. सध्या सणासुदीचा … Read more