महामार्गावरील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती अखेर सुरु

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून यामुळे अपघाताचे सत्र देखील सुरूच होते. अखेर आज शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे. शहरातून जाणार्‍या हायवेवरील खड्ड्यांचे पॅचिंगचे काम पीडब्ल्यूडीने सुरू केले आहे. आठ दिवसांत हे काम संपेल अशी माहिती सार्वजनिक … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलीस मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- शेवगाव तालुक्यात अनेक अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. यातच सध्या देशभर सुरु असलेल्या IPL ने सर्वाना वेड लावले आहे. मात्र तालुक्यात आयपीएल वर मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात आहे. यातून लाखों रुपयांची उलाढाल होत आहे. एकीकडे शहरासह तालुक्यात अवैध धंदे जोरात सुरु आहे तर दुसरीकडे पोलीस प्रशासन मात्र निर्धास्त … Read more

महावितरणच्या भोंगळ कारभाराचा ग्राहकांना होतोय मनस्ताप

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-महावितरण आणि त्यांच्या समस्यां या नागरिकांसाठी नेहमीच मनस्ताप ठरत असतात. आधीच कोरोनामुळे आर्थिक हतबल झालेल्या नागरिकंना आता महावितरणच्या चुकीचा आर्थिक भार सहन करण्याची वेळ आली आहे. संगमनेर तालुक्यात विज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बोगस मीटर रेडींग नोंदवून ग्राहकांकडून दामदुप्पट विजेच्या बिलाची आकारणी होत असल्याचे प्रकार … Read more

वाहतुकीसाठी मार्ग सुरळीत करून द्या; राधाकृष्ण विखेंच्या प्रशासनाला सूचना

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर मनमाड रस्त्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहाणी करून या मार्गाचे काम तातडीने सुरू होण्याबाबत अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस अधीक्षक अभियंता कुलकर्णी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी पालवे, कनिष्ठ अभियंता बांगर आदी उपस्थित होते. यापूर्वी या मार्गावरील परिस्थितीचे गांभीर्य त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाहनचालकांना करावी लागतेय ‘कसरत’

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- नगर जिल्हा हा जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते अशा नागरी समस्यांनी नावाजलेला आहे. खासदार, आमदार, मंत्री असताना देखील जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग खुंटला आहे. याचा सर्वाधिक त्रास केवळ आणि केवळ सर्वसामान्य नागरिकास सहन करावा लागतो आहे. महसूलमंत्र्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेला संगमनेर तालुक्‍यातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. यातच तालुक्यातील हिवरगाव पावसा … Read more

सरकार चालवण्याचा ठेका उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे दिला आहे !

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- सांगलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यपाल काय बोलले हे माहीत नाही. पण हे खरं आहे, की उद्धव ठाकरे यांना भेटून काही उपयोग नाही, शरद पवारचं राज्य चालवत आहेत असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. उद्धव ठाकरे हे घराच्या बाहेर पडत … Read more

माजी आमदार वैभव पिचड यांचा अकोले तहसिल कार्यालयावर ठिय्या

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत देण्याचा निर्णय दोन दिवसात न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला आहे. अकोले तहसीलदार कार्यालयावर माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. निर्णय होत नाही तोपर्यंत तहसीलदार कार्यालय सोडनार नाही, असा … Read more

पांढऱ्या सोन्याच्या आगरात बळीराजाची व्यापाऱ्यांकडून होतेय फसवणूक

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- आधीच गेले सहा महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोनाच्या संकटामुळे हतबल झालेला बळीराजा या संकटातून सावरतो तोच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. एकीकडे परिस्थिती पुर्वव्रत होत असताना आता व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात घडत आहे. शेवगाव तालुक्‍यात सर्वाधिक कपाशीलागवड होते. तालुका पांढऱ्या सोन्याचे आगार म्हणून ओळखला जातो. यंदा … Read more

दिवंगत शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या चिरंजीवास आमदार करा

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील शिवसेनेची धडाडणारी आक्रमक तोफ म्हणून नावजेलेले शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. शहरातील शिवसेनेत सुरु असलेली गटबाजीचे राजकारण मिटवत शिवसेनेला पुन्हा बळकटीकरणासाठी आता भैयांचे चिरंजीव विक्रम राठोड आता राजकीय आखाड्यात उतरले आहे. दरम्यान विक्रम राठोड यांना आमदार करण्यात यावी अशी मागणी करण्यात … Read more

जिल्ह्याच्या महसूल सीमेच्‍या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  जिल्हयात 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत जिल्ह्याच्या महसूल सीमेच्‍या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश जारी केले आहेत. दरम्यान या आदेशानुसार खालील बाबींना मनाई करण्यात आली आहे. यात, शस्त्रे, काठया, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठया किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता … Read more

आमदार रोहित पवारांच्या मातोश्रीं म्हणाल्या…तोपर्यंत मी कसलाही सत्कार स्विकारणार नाही

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  कर्जत आणि जामखेडने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. त्यासाठी स्थानिक नागरिक, पदाधिकारी, प्रशासन यांच्या सोबतीला स्थानिक आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार देखील या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. दरम्यान यावेळी बोलताना आमदार पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार म्हणाल्या कि, जोपर्यंत कर्जत जामखेड ही शहरे स्वच्छता अभियानात पहिल्या पाचमध्ये … Read more

पोलिसांची आक्रमक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल केला जप्त

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीला रोखण्यासाठी नूतन पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन सक्रिय झाले आहे. नगरसह राज्यातील विविध जिल्ह्यात चारचाकी, दुचाकी वाहनांची चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीने केलेल्या या कारवाईत हर्षद भगवान गगतिरे (वय 28, रा.दुसर बीड, ता.सिंधखेड … Read more

महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांचा जामीन अर्ज फेटाळला

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- महिलेचे लैंगिक शोषण करून तिला मारहाण करणाऱ्या नगर शहर कोतवालीचा पोलीस निरीक्षक विकास वाघ याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. याबाबत एका महिलेने २९ सप्टेंबर रोजी वाघ याच्या विरोधात अत्याचाराची फिर्याद दिली होती. सरकारी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत व मारहाण करत विकास वाघ याने वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. … Read more

भय संपेना ! बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. यातच बिबट्याच्या हल्ल्यानं अनेक जण जखमी झाले आहे तर काही जणांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच श्रीगोंदा तालुक्यात बिबट्याकडून शेळ्यांचा फडशा पाडण्याचे काम सुरु आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव शिवारात देवमळा परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर बिबट्यांनी बुधवारी रात्री हल्ला केला. … Read more

1 नोव्हेंबर पासून बदलतील हे सात नियम, खिशावर पडू शकतो ताण

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  तेल कंपन्यांनी चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून नवीन एलपीजी सिलिंडर वितरण प्रणाली लागू करण्याचे ठरविले आहे. या नवीन प्रणालीला डीएसी म्हणजे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या 100 स्मार्ट शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल. फक्त बुकिंग करून सिलिंडरची डिलिव्हरी केली जाणार नाही. … Read more

ह्या प्रेमाला काय म्हणाव ? लॉकडाऊनमध्ये जुळलं प्रेम..ऑगस्टमध्ये लग्न आणि ऑक्टोबरमध्ये मर्डर !

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाउनदरम्यान एक तरुण-तरुणी प्रेमात पडले..त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांचं लग्नही झालं. मात्र यानंतर ऑक्टोबर महिन्यात या दोघांमधील वाद इतका वाढला की पतीने पत्नीची हत्या केली. यानंतर पती स्वत: पोलीस ठाण्यात गेला व त्याने आपला गुन्हा कबूल केला. इंदूर शहरातील एका कुटुंबातील वादातून नवविवाहित … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा धक्का,भाजपच्या ‘ह्या’ ज्येष्ठ नेत्याचं निधन !

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 92 व्या वर्षी केशुभाई पटेल यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. केशुभाई पटेल यांना श्वास घेण्यासाठी अचानक त्रास होऊ … Read more

नोव्हेंबर मध्ये ‘इतक्या’ दिवस राहणार बँका बंद ; जाणून घ्या तारखा

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- येत्या दोन दिवसांत नोव्हेंबर महिना सुरू होईल. नोव्हेंबर महिन्यात अनेक सण उत्सव येतात. अशा परिस्थितीत लोकांना आतापासून त्यांच्या बँकेसंबंधी माहिती मिळवणे आवश्यक आहे जेणेकरुन कोणतेही आवश्यक काम थांबू नयेत. ऑक्टोबरप्रमाणेच सणासुदीच्या हंगामामुळे नोव्हेंबरमध्ये बऱ्याच दिवस बँकेची सुट्टी असेल. अशा परिस्थितीत ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे काम वेळेत … Read more