केंद्र सरकारने घेतलेल्‍या महत्‍वपुर्ण निर्णयांमुळे सहकारी साखर कारखानदारीचे भविष्‍य उज्‍वल

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  व्‍यापारी हितापेक्षा शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्‍या महत्‍वपुर्ण निर्णयांमुळे सहकारी साखर कारखानदारीचे भविष्‍य उज्‍वल ठरेल असा विश्‍वास भाजपाचे जेष्‍ठनेते माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना १२ लाख टन उसाच्‍या गाळपाचे उद्दीष्‍ठ पुर्ण करणार असल्‍याचेही … Read more

राज्य सरकारने जनतेला जास्तीत जास्त मदत करावी – पंकजा मुंडे

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकरीही अतिवृष्टीमुळे संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने जास्तीत जास्त मदत संकटकाळात जनतेला करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या कि, राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेले … Read more

महामार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेची अनोखी गांधीगिरी

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील एकही तालुक्यात सध्या धडाचे रस्ते उरलेले नाही. निवडणुका आल्या तरच राजकारणी मंडळी रस्त्यांची कामे आग्रहाने लवकर पूर्ण करतात. अन्यथा या खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांचा जीव गेला तरी प्रशासनला आता काही देणे घेणे राहिलेले नाही. असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये मनसेने नादुरुस्त रस्त्यांचा … Read more

निष्क्रिय पोलीस प्रशासनामुळे या तालुक्यात चोरटे झाले सक्रिय

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी, अशा गुन्हेगारी स्वरूपांच्या घटनांमध्ये जास्तच वाढ होऊ लागली आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे येथील पोलीस प्रशासनाच्या कामाबाबत संशय निर्माण होऊ लागला आहे. संगमनेर तालुक्याचा पठारभाग हा सध्याच्या स्थितीला चोरट्यांचा हॉटस्पॉट बनला आहे. जनावरे चोरी, दुचाकी, चारचाकी आदी चोरीच्या घटना याठिकाणी … Read more

खुशखबर! देशातील सर्वांना मोफत मिळणार कोरोनाची लस

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर देशभरातून विरोध होऊ लागला आहे, तसेच सर्वच देशवासियांना कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणी देखील होऊ लागली आहे. या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. देशातील … Read more

अपघातग्रस्त गाडीत सापडल ‘अस’ काही

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- होंडा सी. टी. कंपनीची कार गाडी क्रमांक (एमएच ०२ एपी ९२१६) यात विनापरवाना बेकायदेशिररित्या गावठी कट्टा आढळून आल्याने श्रीरामपूर पोलिसांनी टीप्या बेग व नितीन शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. होंडा सी. टी. कंपनीची कार गाडी नंबर (एमएच ०२ एपी ९२१६) या गाडीत विनापरवाना २५ हजाराचे एक स्टेनलेस स्टीलचा … Read more

जमीन वाटपाच्या वादातून पती-पत्नीस मारहाण

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जमीन वाटपाच्या कारणावरून पती रमेश निकम व शालिनी निकम यांना गज- कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा घटना तालुक्यातील सुरेगाव येथे घडली असून याबाबत आरोपी दिलीप दिनकर निकम, मोतीराम दिनकर निकम, भूषण दिलीप निकम, सर्व सुरेगाव यांच्यावर फिर्यादी शालिनी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात … Read more

कोरोनाने मृत झालेल्या ख्रिश्‍चन बांधवांचा अंत्यविधी समाजाला दिलेल्या दफनभूमीत व्हावा

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- कोरोना उपचारासाठी इतर ठिकाणाहून शहरात आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांचा शासकीय नियमानुसार अंत्यविधी शहरातील महापालिका हद्दीत करण्यात येत आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये ख्रिश्‍चन बांधवाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना अडचण येऊ नये, यासाठी ख्रिश्‍चन समाजाला दिलेल्या दफनभूमीत त्याचा अंत्यविधी करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार … Read more

ग्रामपंचायतने दिव्यांगांसाठी असणाऱ्या ५ टक्के निधीचे वाटप करावे

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-नगर तालुक्‍यातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिव्यांगासाठी असणारा शासन निर्णयानुसार ५ टक्के निधी त्यांना मिळावा म्हणून वारंवार नगर तालुक्‍यातील पंचायत समितीला निवेदनाद्वारे सांगण्यात आले. परंतु सदर निधी बऱ्याच ग्रामपंचायतींनी आजपर्यंत वाटप केलेले नाही. आपण सदर ग्रामपंचायतीला सूचना केल्या असतीलही परंतु बऱ्याच ग्रामपंचायतींनी महसुलातील हक्काचा असणारा ५ टक्के निधी आजतागायत वाटप केलेले नाही. … Read more

आमदार नसताना शेतकरी आपले प्रश्‍न घेऊन येतात : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी १0 वर्षे आमदारकीचे प्रतिनिधीत्व केल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचा विकास कामातून विश्वास निर्माण केला. त्यामुळे आजही मतदारसंघातील नागरिक विविध प्रश्न घेऊन माझ्याकडे येत असतात. माझ्या विरोधात निवडून आलेले उमेदवाराला राज्य ऊर्चामंत्री पद मिळाले असले तरी शेतकरी विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे येत आहे. मंत्री पद हे फक्त नावालाच घेतले … Read more

विघ्नहर्ता हॉस्पिटलने अनोळखी महिलेवर उपचार करून माणुसकीचे दर्शन घडविले

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-अनोळखी वृद्ध महिलेवर विघ्नहर्ता हॉस्पिटलने उपचार करून समाजामध्ये संवेदनशीलता दाखविली. डॉ. महेश वीर हे नेहमीच समाजातील गरीब व गरजू रुग्णांवर मानवतेच्या भावनेतून उपचार करीत असल्यामुळे ते ठरले देवदूत. डॉक्टर हे समाजामध्ये वेदनामुक्तीचे काम करत असतात. त्यामुळेच डॉक्टरांना देवदूत म्हणून संबोधिले जाते. दि. १८-१0-२०0२० रोजी पांढरीपूल येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या … Read more

ऊसतोड मजुरांसाठी प्रकाश आंबेडकरांनी केली हि महत्वपूर्ण मागणी

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- सध्या ऊसतोड कामगारांनी काही प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या मागण्यांसंदर्भात येत्या दोन दिवसात राष्टवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थिती बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान ऊसतोड कामगारांच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक मागणी केली आहे. याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले कि, वारंवार ऊसतोडणी कामगार, मुकादम … Read more

ऊसतोडणी कामगारांच्या संपाबाबत पवार साहेब काय भूमिका घेणार; दोन दिवसात कळणार

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दराचा करार संपल्याने नव्याने करार करुन दरात साधारण दुप्पट वाढ करण्यात यावी अशी मागणी करत ऊसतोडणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. ऊसाचे क्षेत्र यंदा अधिक असल्याने कारखान्याचा गाळप हंगाम लांबण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. संप सुरु असल्याने अनेक कारखाने सुरु झाले नाहीत आणि चाररूबैठका … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जाणुन घ्या जिल्ह्यातील परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ३६६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४१ ने वाढ … Read more

घरकुल मंजूर झाल्याच्या भासवत त्या भामट्याने अनेकांना फसवले

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- शासकीय योजनाची नावे सांगत भोळ्याभाबड्या लोकांना फसवण्याचा पकार संगमनेर तालुक्यात उघडकीस आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुनील पाटील नावाची एक व्यक्ती शुक्रवारी (ता.2) दुपारी पठारभागातील पिंपळगाव देपा परिसरात आली. या भागातील मुक्ताईनगर वसाहतीतल्या काही आदिवासी घरांमध्ये जावून त्याने ‘तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे, त्यासाठी पंधराशे रुपये भरावे लागतील’ तसेच … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले जिल्हाधिकारी ; प्रशासनाला दिले आदेश

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे अक्षरश वाया गेले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी व त्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी रविवारी (दि. २४) अतिवृष्टीने नुकसान … Read more

खुशखबर ! फ्रीमध्ये मिळतोय स्मार्टफोन ; फक्त करा ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- सॅमसंग सणांच्या उत्सवासाठी नेहमीच ऑफर आणतो. ज्याद्वारे आता आपणास विनामूल्य स्मार्टफोन मिळू शकेल. होय, भारतातील सर्वात मोठा आणि विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने उत्सव हंगामात होम फेस्टिव्ह होम अभियान सुरू केले आहे. या अभियानमध्ये सॅमसंगकडून क्यूएलईडी टीव्ही आणि पॅसेमॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर खरेदी केल्यास गॅलेक्सी फोल्ड, गॅलेक्सी एस 20 अल्ट्रा, … Read more

भाजपचे ‘हे’ खासदार म्हणतात , शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर? ते तुम्ही ठरवा

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-  खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार झाल्यानंतर अनेक मोठ्या कामांना हात घातला. त्यांचा अभ्यास आणि त्यांची टोलेबाजी करण्याची शैली सर्वश्रुत आहेच. त्यांनी आपल्या याच खास शैलीत टाकळीकाझी (ता. नगर) येथे फटकेबाजी केली. नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी टाकळीकाझी येथे झाले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे बोलत होते. यावेळी … Read more