????‍♂️ अभिनेत्री दिपाली सय्यद यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्यासोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- अभिनेत्री दिपाली सय्यद यांना फोन करून धमकावणाऱ्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी 19 ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. संदीप वाघ असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो अहमदनगर येथे राहणारा आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना 4 ऑक्टोबर रोजी एका निनावी नंबरवरून फोन आला होता. … Read more

पालकमंत्र्यांचा उद्याचा दौरा भाजपा आमदाराच्या मतदारसंघात !

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यादांच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या गुरुवारी (२२ ऑक्टोबर) ला जिल्ह्यात येणार आहे. पालकमंत्री मुश्रीफ ओला दुष्काळ पाहणीसाठी येणार असून, या दिवशी शेवगाव व पाथर्डी या तालुक्यांतील प्रत्येकी एका गावाची पाहणी ते करणार आहेत. विशेष म्हणजे शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत. त्यामुळे … Read more

तहसीलदारांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक झाले परेशान

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  म्हणायला सरकारी अधिकारी जनतेचे सेवेसाठी असतात. मात्र सरकारी बाबू म्हणजे स्वतःच्या मनाचा कारभार चालवणारे हि आजच्या काळात त्यांची झालेली खरी ओळख म्हणावे लागेल. आओ – जाओ घर तुम्हारा…कधीही या कधीची जा त्यांना विचारणारेच कोण नसतात. व जनतेला उत्तरे देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. अशाच एका सरकारी अधिकाऱ्यांमुळे श्रीगोंदा येथील नागरिक … Read more

आज ३३२ रुग्णांना डिस्चार्ज तर ३०४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज ३३२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार २५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०४ ने वाढ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या ‘ ग्रामीण रुग्णालयास देशात ‘हा ‘ बहुमान

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  सध्या देशभरमध्ये रुग्णालयांची गरज आणि भूमिका काय असते ते कोरोंनाच्या काळामध्ये सर्व देशाने अनुभवले आहे. या कार्यकाळामध्ये अनेक रुग्णालयांनी भारतास सावरण्याचे कार्य केले. आता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयाने आणखी एक मानाचा तुरा खोऊन घेतला आहे. या रुग्णालयास मुल्यांकनात देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सलग तिसर्‍यांदा राज्यात व … Read more

जुनं ते सोनं… जुन्या टीव्हीची किंमत कोटींमध्ये

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  जुनं ते सोनं अशी म्हण आहे, मात्र हि म्हण आजच्या तंत्रज्ञांनाच्या युगात खरी ठरत असलेली दिसून येत आहे. आजकाल LCD , LED अशा टीव्ही आपण पाहत असतात, मात्र एक काळ होता तेव्हा लाकडी कपाट असलेला टीव्ही बाजरात विक्रीसाठी असायचा, आता तंत्रज्ञानात बदल झाला असून आता हा टीव्ही कोठे दिसत … Read more

दिवसा ऊन रात्री पाऊस आता नगरकरांची फिटलीये हौस

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  वर्षभर शेतात कष्ट उपसल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती शेतमाल यायच्या वेळी परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. नगर जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सगळीकडेच कमी-अधिक प्रमाणात मोठा पाऊस झाला. २० ते ३० मिनिटे सुरू असलेला हा पाऊस रात्री साडेआठच्या सुमारास थांबला. पावसाने हवेत गारवा निर्माण झाला.दिवसभर ऊन असले … Read more

शिकाऱ्याच्या शोधात बिबट्याची नागरी वस्तीकडे धाव…नागरिकांमध्ये भीतीचे सावट

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची वाढती दहशत नागरिकांमध्ये भीतीचे वातारावण निर्माण करू लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. आजवर गाय, बैल, शेळ्या, मेंढरे यांच्यावर हल्ला करण्याऱ्या बिबट्याने आपला मोर्चा थेट आता मानवी वस्तीकडे वळविल्याने उत्तरेकडील तालुक्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. … Read more

महसूल मंत्र्यांच्या शहरात भिक्षेकऱ्यांचे होतायेत मृत्यू… तर्कवितर्कांना उधाण

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारे संगमनेर बसस्थानक आपल्या भव्यदिव्य आणि देखण्या रचनेमुळे निश्चितच चर्चेचे स्थान बनले आहे. मात्र आता महसूल मंत्र्यांच्या याच शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या संगमनेर बसस्थानकात गेल्या काही दिवसांपासून भिक्षेकर्‍यांचे जीव जाऊ लागले आहेत. अलिकडच्या काळात आत्तापर्यंत या परिसरात तब्बल … Read more

नौकरीच्या आमिष दाखवत 57 लाखांना फसवले… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना महामारीमुळे अनेक जणांच्या हातचा रोजगार गेला आहे. तसेच यापूर्वीही अनेकजण बेरोजगार असल्याने नौकरीची शोधाशोध करत असतात. मात्र अशाच संधीचा फायदा घेत काही भामटे नौकरीच्या आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालतात. असाच काहीसा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे. तहसीलदार असल्याची बतावणी करीत येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिरातील … Read more

कृषिविद्यापीठातील लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- आपले प्रलंबित कामे करून घेण्यासाठी लाच देण्याचे प्रकार सध्या जोरात सुरु आहे. मात्र अशा लाचखोरांविरुद्ध आता सर्वसामान्य देखील आक्रमक पवित्रा घेत आहे. यामुळे जिल्ह्यातील एका शिक्षणाच्या मंदिरात लाचखोरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे पेन्शनबाबतचे कागदपत्र तयार करून देऊन पेन्शनचा लाभ मिळवून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच … Read more

त्या कोविड सेंटरमधील रुग्णांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांची धाव

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात अद्यापही कोरोना या भयानक विषाणूचे संक्रमण सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी शासनाने जिल्हाभर कोविड सेंटर सुरु केले आहे. यातच साईबाबांच्या शिर्डीमधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. साईनगरीतील साईबाबा कोवीड उपचार केंद्रात जवळपास पंधरा खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. अजुनही अनेक जण इच्छुक … Read more

गुटखा प्रकरणातील पोलीस निरीक्षकाची तक्रार करणाऱ्या तक्रादारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यास अरेरावी व शिवीगाळ केल्याप्रकरणी वळण (ता. राहुरी) येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीरामपूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी संदीप कमलाकर रविवारी (ता. 18) रोजी सकाळी 10 वाजता सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय … Read more

रस्ता गेला वाहून… जीव धोक्यात घालून नागरिक करतायत प्रवास

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  परतीचा पाऊस जिल्ह्यात चांगलाच बरसला आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला, तर काही ठिकाणी रस्ते, पूल हे पाण्याखाली गेले. तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच शेवगाव तालुक्यातील दहिफळ खानापूर हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता खुंटेफळ जवळ अक्षरश: वाहून गेला आहे. वाहतुकीसाठी धोकादायक … Read more

प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या नावाखाली त्या भामट्याने पाच कोटींना गंडा घातला

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  लॉकडाऊनमध्ये जपून ठेवलेला पैसा जास्तीच्या हव्यासापोटी घालवून बसल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. या फसवणुकीमध्ये संबंधित भामट्याने व्यापाऱ्यांना चक्क पाच कोटींचा गंडा घातला आहे. या घटनेमुळे शहरात एकच चर्चा रंगल्या आहेत. शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचे नाव सांगून एकाने शहरातील अनेक व्यापारी, उद्योजकांना सुमारे पाच कोटी रुपयांना गंडा घातल्याचे … Read more

आता परतीचा पाऊसही बळीराजाच्या मानगुटीवर

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  यंदा पाऊस खूप बरसला. जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार सुरु झालेल्या पावसाने अगदी आजपर्यंत दमदार हजेरी लावली आहे. या पावसाने खरीप पिकांवर अक्षरशः पाणी फिरवले. परंतु आता परतीचा पाऊसही बळीराजाच्या मानगुटीवर बसला आहे. शेतांना तळ्यांचे स्वरूप येऊन पिके नष्ट झाली. वादळासह आलेल्या पावसामुळे खरिपातील पिके, ऊस व फळबागा जमीनदोस्त झाल्याने … Read more

किसान सन्मान योजनेमध्ये अपात्र लाभार्थ्यांनी केली कोट्यवधींची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  सुमारे दोन वर्षापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केली होती. आता याच योजनेमध्ये काही अपात्र धारकांनी शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पारनेर तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये सुमारे दोन हजार 367 करदाते व 219 अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात चोरट्यांचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील जामखेड तालुक्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. जामखेड शहरात आज पहाटे चोरट्यांनी तीन दुकाने फोडून चोरी केली. चोरटयांनी दुकानातीलच गोण्यांमध्ये किंमती वस्तू भरून नेल्याचे दिसून येते, असे … Read more