राहुरी तालुक्यातील हजारो एकरांवरील खरिप पिकांवर पाणी

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या पाऊस सर्वत्र जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांतील खरीप पिकांवर पाणी फेरले गेले आहे. मागील काही दिवसांच्या जोरदार पावसामुळे राहुरी तालुक्यातील उंबरे, ब्राम्हणी, चेडगाव, मोकळ ओहळ, पिंप्री अवघड, सडे, कुक्कडवेढे, वांबोरी परिसरात अनेक शेतकर्‍यांची सोयाबीन, घास, डाळिंब, कपाशी, उसासह सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. यात खरिपाच्या पिकांसह … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्यात अतिवृष्टी ; ‘ह्या’ गावांचा संपर्क तुटला

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, सोनेवाडी ,पोहेगाव, डाऊच खुर्द, आदी परिसरात जोरदार पाऊस पडला. तालुक्यातील काल झालेल्या पावसामुळे पिके भुईसपाट झाले आहेत. चांदेकसारे घारी या दोन गावाच्या मधून वाहणार्‍या जाम नदीला पूर आला. तर नदीवर बांधलेल्या पुलावरून पाणी वाहत … Read more

श्रीरामपुरात मोठे कोविड सेंटर उभे करू, परंतु त्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे उपचाराला मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागररिकानी 13 ते 20 सप्टेंबर दरम्यान लॉकडाऊनचा जसा निर्णय घेतला आणि त्याला शहरातील … Read more

परंपरेला छेद देत मुलींनीच मृत आईस दिला खांदा, केले अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- पारंपरिक प्रथेला छेद श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे पोटच्या सहा मुलींनीच आईच्या निधनानंतर सर्व सोपस्कार पार पाडल्याची घटना घडली. या पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या तर अनेकांनी याची वाहवा केली. आशाबाई भाऊसाहेब मुठे (वय 64) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पोटी सहाही मुलीच आहेत. त्यातील एकीने तिरडी धरत चौघी खांदेकरी … Read more

अतिवृष्टीने 17 कुटुंबे पाण्यात; आश्रय दिला तरी दैना संपेना

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेकठिकाणी या पावसाच्या पाण्याचा फटका नागरिकांना बसला आहे. मागील काही सततच्या पावसाने राहाता तालुक्यातील रुई येथील सुमारे सतरा आदिवासी कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. रुई गावठाण हद्दीतील सेवा सहकारी सोसायटीच्या मागील बाजुला सदर आदिवासी कुटुंब गेल्या 25 वर्षांपासून वास्तव्यास आहे. … Read more

धक्कादायक! ‘ह्या’उपबाजारात समितीत वजन काट्यात अफरातफर ;शेतकऱ्यांना चुना

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-   शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळावा यासाठी बळीराजा आपला माल बाजार समितीमध्ये आणत असतो.परंतु या बाजारसमितीमध्येच शेकऱ्यांस चुना लावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. श्रीरामपूर बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात असलेल्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक काट्यात वजनात अफरातफर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे … Read more

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या स्वास्थ्यासाठी विघ्नहर्तला साकडे

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली होती. दरम्यान मुश्रीफ साहेब कोरोना संसर्गातून लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी कोल्हापूर कागल कोविड केअर सेंटरमध्ये गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी कागल नगरपरिषदेचे पक्षप्रतोद नितीन दिंडे … Read more

कोविड सेंटर करण्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  नगर-मनमाड महामार्गावरील गागरे हॉस्पिटलमध्ये सुरू होत असलेल्या कोविड केअर सेंटरला परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. याबाबत तहसीलदार फसियोद्दिन शेख यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन आता खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर सुरू करत आहे. बिरोबानगर येथील गागरे हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, … Read more

पक्ष मोठा झाला की आपण मोठे होणार आहोत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कार्यकर्त्याना साथ देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे युवकांनी निष्ठेने काम करून सर्वसामान्य लोकांची कामे करावी. याचे फळ आपणास आगामी काळात मिळाल्याशिवाय राहणार नाही. पक्ष मोठा झाला की आपण मोठे होणार आहोत, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते कर्जत येथे गाव तेथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिक्षक नेते पवार यांचे अपघाती निधन

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील शिक्षक नेते, ऐक्य मंडळाचे माजी तालुकाध्यक्ष वाय. डी. पवार (४५, भांडगाव) यांचे सोमवारी नगर-कल्याण मार्गावर भाळवणी येथील एस. के. चौकात झालेल्या अपघातात निधन झाले. रामकृष्ण पाटीलबा रोहोकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पवार यांची सध्या आळकुटी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नियुक्ती होती. सोमवारी … Read more

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-   पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे बन्सी लहाणू घेमूड (५५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात घेमूड यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. बन्सी व त्यांच्या भावाचे रस्त्याच्या वादातून भांडण झाले होते. त्यातून बन्सी यांनी आत्महत्या केली असावी किंवा घातपात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. अहमदनगर Live24 च्या इतर … Read more

नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह देसवंडीत सापडला

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  राहुरी तालुक्यात सोमवारी मुळा नदीत उडी मारणाऱ्या अज्ञात तरूणाचा मृतदेह मंगळवारी सापडला . पट्टीच्या पोहणाऱ्या तरूणांच्या मदतीने देसवंडी पानथ्याजवळ अडकलेला हा मृतदेह बाहेर काढला. पुलावरून या तरूणाने पाण्यात उडी मारली होती. तो बुडाल्याचे समजताच निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शोधमोहीम हाती घेतली. अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या … Read more

आता नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी मिळणार ‘ते’ इंजेक्शन

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचा त्वरीत पुरवठा करावा, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.  आमदार संग्राम जगताप यांनी टोपे यांची भेट घेऊन इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत मागणी केली होती. त्यानंतर टोपे यांनी निर्देश दिले. जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत … Read more

माजी आमदार स्नेहलता कोल्हे कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून मंगळवारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी लॅबमधून चाचणी केलीअसता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.  पुढील उपचारांसाठी त्या नाशिकला रवाना झाल्याचे, तसेच त्यांच्या स्वीय सहायकलाही कोरोनाची लागण झाली असल्याचे सूत्रांकडून समजते. अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग … Read more

अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासांत ‘इतक्या’ रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १८ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ६३२ झाली आहे. दिवसभरात ९०० पॉझिटिव्ह आढळून आले असून, बाधितांची एकूण संख्या ३८ हजार १५९ झाली आहे.  जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेमध्ये ७६, खासगी प्रयोगशाळेत २२४ आणि अँटीजेन चाचणीत ६०० बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४२, पाथर्डी ९, नगर … Read more

आरोग्यमंत्र्यांची भेट घेत आमदार जगतापांनी केली ही मागणी

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यात उपचारादरम्यान रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले. या आजारातील रुग्णांना श्‍वसनाचा अधिक त्रास होतो. उपचारासाठी रेमडेसिवीर औषध प्रभावी ठरते.  अहमदनगर जिल्ह्यातील या औषधाचा साठा संपला आहे. त्यामुळे तो तत्काळ मिळावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. … Read more

कोविड सेंटरबाबत माजी आमदारांचे तहसीलदारांना पत्र

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून या दुर्गम भागात कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अधिकारी तसेच सेवा सुविधांअभावी हे कोविड सेंटर सुरु होऊ शकत नाही अशी माहिती प्रशासनाने दिली होती. मात्र आता याच कोविड सेंटर बाबत माजी आमदारांनी तहसीलदारांना पत्र … Read more

प्रवरा उद्योगसमूहाने घेतला हा कौतुकास्पद निर्णय

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारांच्या जवळपास पोहचली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांची स्रावतपासणी मोफत करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रवरा उद्योगसमूहाने सामाजिक बांधिलकी म्हणून कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला. … Read more