आज १२८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

‘ह्या’ आहेत 5 सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढत असल्याचे दिसून येत आहे. ही मागणी लक्षात घेता अनेक कंपन्या नवीन इलेक्ट्रिक कार तसेच दुचाकी बाजारात आणत आहेत. ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनेही आवडू लागली आहेत. यामुळे भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय … Read more

आनंदाची बातमी : के.रेंज भूसंपादन होणार नाही

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील पारनेर ,नगर व राहुरी तालुक्यातील बहुचर्चित के.रेंज साठी भूसंपादन होणार नाही असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत स्पष्ठ केले आहे. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आमदार निलेश लंके, वनकुटे सरपंच राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, पंचायत समिती सभापती अण्णा सोडणर तसेच संरक्षण विभागाची … Read more

कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असताना ही परिस्थिती नियंत्रित कशी?

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा पार्दुर्भाव झपाट्याने वाढत असताना कोरोनाची ही परिस्थिती नियंत्रित कशी आहे?  हे जनतेसमोर स्पष्ट करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात दररोज 800 ते 900 कोरोना पॉझिटिव्ह … Read more

बिग ब्रेकिंग : मनोज पाटील अहमदनगरचे नवे पोलिस अधीक्षक !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अखिलेश कुमार सिंग यांच्या जागी अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे.  सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.   सोलापूर जिल्ह्यात आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय असे काम त्यांनी केले असून 15 ऑगस्ट 2018 ते … Read more

मोठी बातमी : सुजित झावरेंवर विनयभंग, खंडणीसह ‘हा’ गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- सरकारी कामात अडथळा तसेच फोनवर अश्‍लिल भाषेत संभाषण केल्याप्रकरणी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुरूवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. तहसिलदार ज्योती देवरे यांनी यासंदर्भात  फिर्याद दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे देवरे या सुपे येथील खासगी रूग्णालयात  उपचार घेत होत्या. मिळालेल्या माहीतीनुसार १४ ऑगस्ट … Read more

खुशखबर! मराठा समाजासाठी पोलीस भरतीत 13 टक्के जागा राखीव !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  राज्यात येत्या काही महिन्यात तब्बल साडेबारा हजार पोलिसांची भरती होणार आहे. ही पदे भरण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिमंडळासमोर मांडला होता. त्यानुसार पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार असल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी … Read more

जनतेपेक्षा विरोधकांना राजकारणात जास्त रस – अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  महाराष्ट्र राज्यात मागील सहा महिन्यांपासून कोरोना महामारीचा मुकाबला आघाडीचे सरकार करत आहे. कोरोना संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना आखल्या गेल्या असून सरकार नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी गांभीर्यानं काम करत आहे. कोरोना संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीत विरोधक मात्र काही घटनांचे भांडवल करत राजकारण करत आहेत. जनतेपेक्षा विरोधकांना राजकारणात जास्त रस असल्याची टीका राष्ट्रवादी … Read more

निधीविना कोविड उपचार केंद्र सापडली संकटात

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  जिह्यातील कोरोनाची वाढती संख्या हि धक्कादायक आहे. हि संख्या लवकरात लवकर आटोक्यात आण्यासाठी जिल्ह्यात गावपातळीवर कोविड केंद्रे सुरु करण्यात आली आहे. मात्र निधीविना काही कोविड उपचार केंद्रे हि अडचणीत आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील संतलुक हॉस्पिटलमधील कोरोना उपचार केंद्रास शासनाकडून आतापर्यंत एक रुपयाही मिळाला नाही.त्यामुळे पैशाअभावी आता येथे रुग्णांना सुविधा … Read more

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र दामोधर मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. या निमिताने भाजपने तसेच कार्यकर्त्यांनी देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  याच पार्श्वभूमीवर नगरचे भाजप जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त नगर मध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावेडीमधील वॉर्ड … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले रुग्णांची संख्या वाढणार असली तरी …

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा आणि नागरिक यांनी आता पुढाकार घेऊन कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. या मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे रुग्णांची संख्या वाढणार असली तरी त्यामुळे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळू … Read more

अर्बन बँकेच्या माजी संचालकाला मारहाण

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांना आज दुपारी अर्बन बँकेच्या कार्यालयातील परिसरात मारहाण झाली. या मारहाणी संदर्भात तक्रार देण्यासाठी गांधी हे कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले होते. तिथे तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान राजेंद्र गांधी यांना कोणत्या कारणावरून मारहाण झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अर्बन बँकेतील … Read more

पुढील वर्षापासून पाचवीचे प्रवेश नाही; शासनाच्या खर्चात होणार बचत

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. तसेच शाळा या दिवाळीनंतर सुरु होणार आहे. दरम्यान मध्यन्तरी शालेय शिक्षणाबाबत काही धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले आहे. यामुळे काही फेरबदल करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्यामुळे करण्यात आलेल्या सरचनेप्रमाणे माध्यमिक शाळांना जोडून असलेल्या पाचवीचा वर्ग पुढील वर्षापासून प्राथमिक शाळांना जोडण्याचे … Read more

भेसळखोरांवर पोलिसांची धाड; लाखोंचा माल केला जप्त

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अन्न पदार्थांमध्ये वाढती भेसळखोरीमुळे मानवी शरीरावर याचा मोठा घातक परिणाम होत असतो. मात्र पैसे कमविण्याच्या उद्देशाने माणुसकी विकलेल्या या भेसळखोरांविरोधात पोलीस प्रशासन आक्रमक झाले आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील मळगंगा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कंपनीची नगर येथील अन्न औषध प्रशासनाने कसून तपासणी केली. यावेळी दुधात भेसळीसाठी वापरली जाणारी … Read more

‘या’ दुर्दैवी निर्णयावर पवार साहेबच मार्ग शोधतील

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  गेल्या काही दिवसापासून कांदा प्रश्न चांगलाच गाजतो आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. हि निर्यातबंदी उठवावी यासाठी राजकीय नेतेमंडळी देखील सक्रिय झाले आहे. या निर्यातबंदीवरून नगर जिल्ह्यात देखील संतापाची लाट उसळली आहे. मात्र केंद्र शासनाने अचानकपणे घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय दुर्दैवी असून यातून … Read more

गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी तक्रारदारच बनला जासूस

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे. मात्र अशाच गुन्हा करणाऱ्या दोन भामट्यांचा गुन्हा उघडकीस आला आहे. शहरातील नामांकित चार्टर्ड अकाउंटचे खोटे सही व शिक्के वापरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट प्रोजेक्ट करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीककर्ज वाटपास 15 दिवसांची मुदतवाढ

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- जिल्हयात सर्वत्र पाऊस चांगला झाला असून शेतकर्‍यांची पीक कर्जासाठी जिल्हा बँकेकडे मोठ्या प्रमाणावर कर्ज मागणी होत आहे. दरम्यान कोरोना, लॉकडाऊन, दळणवळण साधनांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना मुदतीपूर्वच या योजनेचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. याच पार्शवभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या या समस्यांचा विचार करत पीककर्ज वाटपासाठी मुदतवाढ दिली आहे, … Read more

कांदा निर्यातबंदी उठवावी… सभापती तनपुरे यांची केंद्राकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कांदा निर्यातबंदी मुळे शेतात अहोरात्र कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येणाची वेळ आली आहे. कोरोनामुळे अआर्थिक कंबरडे मोडलेल्या बळीराजाला आता कुठे सुगीचे दिवस येऊ लागले होते. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असून केंद्रशासनाने कांदा उत्पादकांच्या … Read more