भारतात कोरोना लस कधी येणार ? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  सध्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. भारतात Oxford-AstraZenecaच्या लशीच्या चाचण्या सीरमच्या मदतीने सुरू आहेत.  तर Bharat Biotech च्या Covaxin आणि  Zydus Cadilaच्या ZyCoV-D या लशींच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. … Read more

‘वाघ’ म्हणून घेणार्‍यांची एका महिलेपुढे शेळी झाली…

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणे गैर आहेच, पण या गोष्टीचा निषेध करुन कंगनाचा संबंध भाजपाशी जोडणारे पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याबाबत अपशद्ब काढले जात होते, त्यावेळी कोणत्या बिळात लपून बसले होते, असा प्रश्न भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष ऍड.अभय आगरकर यांनी उपस्थित केला. … Read more

पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्या : कोल्हे

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-  कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पोहेगाव आणि परिसरातील गावांमध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नहेलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, महसूलमंत्री आणि पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली. मतदारसंघातील पोहेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापूर, सोनेवाडी, चांदेकसारे, घारी आदी गावामध्ये १० सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्याचा … Read more

केंद्र सरकारच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा – मा. खा. दिलीप गांधी

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-  देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदीजी यांनी आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पथक पुरवठा योजनेची अंमलबजावणी केली असून या योजने अंतर्गत पथविक्रेते, फेरीवाले यांच्यासाठी खेळते भांडवल म्हणून रु. १०,०००/- एवढे खेळते भांडवल कर्ज रूपाने सर्व सरकारी बँकेत उपलब्ध करून … Read more

वास्तू टिप्स: नवीन फ्लॅट खरेदी करताना ‘ही’ घ्या खबरदारी; येईल समृद्धी

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- प्रत्येकाच्या आयुष्यात वास्तू शास्त्राला विशेष महत्त्व असते, प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर विकत घ्यायचे असते. प्रत्येकाची इच्छा असते की त्याचे घर असे असावे की तो आपल्या कुटुंबासह शांततेत जगू शकेल. वास्तुच्या मते घर केवळ राहण्याची जागा नसते, परंतु त्याच्या सभोवतालची शक्ती माणसाच्या जीवनावरही परिणाम करते, म्हणूनच घर किंवा फ्लॅट खरेदी … Read more

व्हिडिओ व्हायरल करणे पडले महागात !

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-  कोविड रुग्णांना योग्य ती सेवा मिळत नसल्याचा व्हिडिओ अहमदनगर शहरातील एका मोठ्या हॉस्पिटलचा असल्याचे सांगून समाज माध्यमांवर व्हायरल करणे चांगलेच महागात पडले आहे. व्हाटसअ‍ॅपमधील एका ्ग्रुपच्या अ‍ॅडमिनवर गुन्हा दाखल झाला आहे. अभिजीत चिपा, असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तारकपूर येथील एक मोठे हॉस्पिटलमधील प्रकार असल्याचे सांगून तेथील … Read more

उपचार सुरु तरीही कार्यरत; मंत्री तनपुरे यांचे कौतुकास्पद काम

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. तनपुरे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असताना देखील ते आपलं कर्तव्य बजावत असल्याच पाहायला मिळत आहे. आजारी असताना देखील मंत्री तनपुरे हे राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात अंतिम परीक्षा होणार असून त्यादृष्टीने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! त्याचे संशयाचे खूळ तिच्या जीवावर उठले

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- सात फेरे घेत साताजन्माची साथ देण्याची त्यांनी शपथ घेतली, मात्र केवळ संशयाची सुई त्यांच्या आयुष्यात अशी टोचली कि तिला आपला जीव गमवावा लागला. पत्नीचे पुण्यातील कोणाशीतरी सूत जुळले असल्याच्या संशयावरून पतीने आपल्या पतीचा निर्घृण खून केला असल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती … Read more

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोककलावंत ‘तमाशा पंढरीमध्ये’ करणार ‘असे’ काही….

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद झाले आहेत. या परिस्थतीमुळे अनेक क्षेत्रे बंद आहेत. यात तमाशासारखे लोककला देखील बंद आहेत. त्यामुळे या लोककलावंतांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अशात राज्य सरकारने कसलीही मदत केली नसल्याने, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या दि. 21 सप्टेंबर रोजी तमाशा … Read more

‘लाळ्या खुरकत लसीकरण तातडीने करा’

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला. यातून सावरत नाही तोच जनावरांना लंपी स्कीन डिसीज नावाच्या विषाणूचे संकट उभे राहिले. या आजाराची साथ मराठवाड्यापाठोपाठ नगर जिल्ह्यातही पोहचली आहे. त्यातच आता लाळ्या खुरकत लसीकरण अद्यापपर्यंत सुरू न केल्याने पशुपालक पुन्हा अडचणीत आलेला आहे. आधीच मरणासन्न अवस्थेत असलेल्या पशुपालक शेतकर्‍यांचा … Read more

राहुरी शहरात लॉकडाऊन; नागरिकांचा स्वेच्छेने उदंड प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर, श्रीरामपूर हे तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील व्यापारी संघटना व सर्वपक्षीय नागरिकांच्यावतीने करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या लॉकडाऊनला काल राहुरी … Read more

आ. जगताप यांच्या मध्यस्थीने चिघळण्यापूर्वीच मिटला बुरूडगावकरांचा ‘तो’ प्रश्न

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-  बुरूडगाव ग्रामपंचायतीचे अनेक प्रश्न आणि समस्या अशा आहेत कि ज्याची अनेक वर्षांपासून वारंवार मागणी होऊनही त्या समस्या सुटताना दिसत नाहीत. आधी मनपात आणि पुन्हा ग्रामपंचायत यामध्ये भरडल्या गेलेल्या बुरूडगावच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे आता बुरूडगावकरांनी आक्रमक होत, ‘नगर शहरातील गटार गंगेचे पाणी सीना नदीत सोडले जाते.त्या पाण्यामुळे आमची शेती … Read more

‘ह्या’ आमदारांची पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जामखेड आणि कर्जत तालुक्यात तसेच राहुरी, श्रीरामपूर तसेच नगर शहरातही जोरदार पाऊस पडला. परंतु पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या काही भागात गुरुवारी रात्री वादळी वार्‍यासह जोरदार पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. … Read more

‘लॉकडाऊनला प्रतिसाद द्या अन आपल्या कुटुंबाचे रक्षण करा’

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून रविवार दि. 13 ते 20 सप्टेंबरपर्यंत होणार्‍या सर्वपक्षिय श्रीरामपूर लॉकडाऊनला प्रतिसाद देऊन आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे … Read more

हे आहेत आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कारार्थींच्या यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. दरवर्षीच शिक्षकदिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना असल्यामुळे पुरस्कारांचे वितरण झालेले नाही. या पुरस्कारांचे लवकरच वितरण करण्यात येणार … Read more

कोरोनाग्रस्त बँक कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  कोरोना महामारीत सेवा देणार्‍या बँक कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून, सदरील कर्मचार्‍यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी अहमदनगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांना पाठविण्यात आल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी दिली. बँकिंग सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सर्व … Read more

लवकर निर्णय घ्या, अन्यथा साईमंदिर खुले करू

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोना विरुद्ध सुरु असलेला लढा कधी कंगणा विरुद्ध होऊन गेला कळलंच नाही. कंगना विरुद्ध सुरु असलेल्या वादावरून जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकारने कंगनासोबत भांडण्याऐवजी साई मंदिर खुले करून येथील रोजीरोटी सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली आहे. या … Read more

आशा सेविकांना प्रतिदिन केवळ 33 रुपये

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या या महामारीत कोरोना योध्याबरोबरच आशा सेविका देखील सहभागी होऊन गावपातळीवर काम करत आहे. मात्र कामाच्या तुलनेत त्यांना दिला जाणार मोबदला ऐकला तर तुम्हाला देखील नवलच वाटेल. कोरोना सर्व्हेचा पुरेसा मोबदला न देता आशा सेविकांना प्रतिदिन केवळ 33 रुपये व आशा गट प्रवर्तकांना प्रतिदिन 16 रुपयात राबवून घेतले जात … Read more