अखेर ठरलं: अंतिम वर्षाची परीक्षा १ ऑक्टोबरपासून

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक तयार केले असून १ ते २२ ऑक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी सहमती दर्शविली आहे. या परीक्षांचे वेळापत्रक, नियोजन तसेच आराखडा तयार करण्यासंदर्भात विद्यापिठांना सांगण्यात आले आहे. *ओणालीअं ऑफलाईन पर्याय खुला* :- विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घरी बसून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ८६७ नवे रुग्ण,वाचा तुमच्या भागातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६७ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३४४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८२, अँटीजेन चाचणीत ३२२ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६३ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट … Read more

धक्कादायक! कोरोनाने घेतले आणखी ‘इतके’ बळी ; मृतांची संख्या @ ३३९

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला आहे. रिकव्हरी रेट जरी चांगला असला तरी मृत्यूचे प्रमाणवाढले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार काल सायंकाळी ६ ते आज दुपारी १२ वाजेपर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्या ३३९ झाली आहे. त्याआधीच्या अहवालानुसार त्यामागील २४ तासांत २४ जणांचा … Read more

आज नव्या १७० बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर*: जिल्ह्यात आज तब्बल ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५१० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७० ने … Read more

मंदिरे उघडण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. कोरोनारुग्णांचा रिकव्हरी रेट जरी चांगला असेल तरी वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे. अशा परिस्थितीमध्ये अनलॉकच्या चौथ्या टप्प्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली. या दरम्यान, मंदिरे, धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत आग्रही मागणी केली जाऊ लागली. यावर बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अशी मागणी अनेकांनी … Read more

बिल वाढवण्यासाठी धक्कादायक प्रकार;मृत्यूनंतरही कोरोना रुग्णाला 2 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  हॉस्पिटलचं बील वाढविण्यासाठी धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे, असे वृत्त एका मीडियाने दिले आहे. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हुगळी जिल्ह्यातल्या एका कोरोना रुग्णाबाबत हा प्रकार घडला आहे. या रुग्णास कोलकत्यातल्या … Read more

रेस्टॉरंट सुरू करा; खा.सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केल्यानंतर अनेक उद्योगधंदे बंद झाले. त्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. परंतु हॉटेल, रेस्टॉरंट मात्र बंद आहेत.  आता केवळ पार्सल सुविधा सुरु आहे. परंतु  पार्सल सेवा सुरू करून रेस्टॉरंटचा व्यवसाय सावरणार नाही तर रेस्टॉरंट पूर्णपणे सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार … Read more

शरद पवारांचा मोदी सरकारला सुरक्षेबाबत मोठा इशारा; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोणतेही संकट असो सदैव कर्तव्य तत्पर असतात. नैसर्गिक आपत्ती, कोरोना या काळातही त्यांनी व्यापक दौरे करून जनसामान्यांच्या प्रश्नांना हात घातला.  आता त्यांनी मुंबईत चीन प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांना आमंत्रित करून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मोदी सरकारला चीन भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत … Read more

पत्रकार रायकरांना न्याय द्या

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- आरोग्य विभागाच्या अनास्थेचा बळी ठरलेल्या पत्रकार पांडुरंग रायकरांना न्याय मिळवा. मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी आश्वी प्रेस क्लब व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने आश्वीचे पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना निवेदन दिले. सीताराम चांडे, संजय गायकवाड, योगेश रातडीया, रवींद्र बालोटे, अनिल शेळके, संकेत कचेरिया आदी पत्रकार यावेळी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ मुलीला हवीय तुमची मदत !

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-राहुरी : आर्थिक परिस्थितीती जेमतेम…तिच्या घरातील परिस्थिती बिकट, तरीही तिने हार मानली नाही. संकटांसोबत ती दोन हात करीत वडिलांच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी झटत आहे. रेणुका राहुल डोंगरे (रा. केंदळ बु., ता. राहुरी) असे संघर्ष कन्येचे नाव आहे. ती दहावीला आहे. घरात आहे वृद्ध आजी- आजोबा, आई. भाऊ आहे. भाऊ … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष : 3433 जागा पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक (इतर) : 226 पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक) : 243 पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स) – महिला : 1944 शैक्षणिक अर्हता : 12 वी पास, वैध … Read more

कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३३० झाली आहे. ६३२ नवे रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोविड चाचणीसाठी नागरिकांची फरफट अजूनही कायम आहे. नगर शहरातील रामकरण सारडा वसतिगृहातील चाचणी केंद्रात सकाळपासूनच लोक येतात. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांची चाचणी केली जाते. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ३०६ जणांचा मृत्यू झाला … Read more

‘ह्या’ गावच्या सरपंचानी जे काम केलय ते वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल !

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे ग्रामीण भागातील जनता अडचणीत असून हाताला काम नसल्यामुळे खेड्यातील गरीब जनता आर्थिक संकटात आहे.  अशा परिस्थितीमध्ये आधार म्हणून वडुले खुर्द ता. शेवगावचे  लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब सोपान आव्हाड यांनी स्वतः च्या खिशातून माहे. एप्रिल व में २०२० या दोन महिन्याची पाणीपट्टी स्वतः भरण्याचा निर्णय घेऊन … Read more

कोरोना इफेक्ट! शारीरिक संबंध ठेवताना मास्क घाला

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- जगभर कोरोनाचे संकट पसरले असून दिवसेंदिवस वाढता धोका लक्षात घेता मास्क घालणे सर्वांना बंधनकारक झाले आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेत मास्क घालणे हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. कोरोना पसरण्याबाबत अनेकांनी तर्क वितर्क लावले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच अनेकांना कोरोना व्हायरस सेक्समुळे … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षा घर बसल्या देता येणार

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरु समीतीची बैठक पार पडली. या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य व बाजार समितीचे संचालक एकमेकांना भिडले ! आणि….

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर  ग्रामपंचायतीमध्ये आज परंपरागत विरोधक असणारे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले आणि बाजार समितीचे संचालक सुधीर नवले या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली.  ग्रामपंचायतीत झालेल्या वादाचे पडसाद नंतर बाहेर उमटत दोघांच्याही नातेवाईकांमध्ये मारामारीचा प्रकार घडला. स्थानिक पोलीस वेळीच पोहल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे गावकरी सांगतात. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झेडपी सरसावली; कर्मचाऱ्यांसाठी आखली ‘ही’ योजना

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. जून महिन्यापासून कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने सापडत आहेत. नगर जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असले तरी अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण महापालिकाहद्दीत सापडले आहेत. शहरातील करोनाचा वाढता … Read more

कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी साधी पाण्याची सुविधा नाही; प्रशासनाचे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर शहरात कोरोना बाधित पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरातील कोरोना हॉस्पिटलवर ताण येत होता यासाठी प्रशासनाने कोविड सेंटरची संख्या वाढण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पुढाकारातून केडगावमध्ये कोव्हिड सेंटर सुरू झाले होते. केडगाव उपनगरात सुरू झालेल्या कोव्हिड केअर सेंटरची दुरवस्था झाली आहे. या … Read more