24 तासांत 544 पॉझिटिव्ह व पाच जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ६२६ झाली. त्यातील ७ हजार २६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, मंगळवारी नगर शहर व जिल्ह्यातील आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. २४ तासांत ५४४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्हा रुग्णालयात ९३, अँटीजेन चाचणीत १७१ आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये २८० बाधित आढळले. जिल्हा … Read more

बिग ब्रेकिंग : संजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाची लागण

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-काही दिवसांपूर्वी अभिनेते संजय दत्त यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आता एक वाईट बातमी समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याच्या उपचारासाठी संजय दत्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मंत्री प्राजक्त तनपुरेंचे फेसबुक पेज झाले हॅक !

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तथा राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत त्यांनी तसे कळविले आहे. तसेच या पेजवरून कोणतीही पोस्ट आली, तर ती ग्राह्य धरू नये, असे तनपुरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या पेज वरून त्यांचे दौरे, व कामा संदर्भातील अपडेट्स … Read more

मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दीष्ट- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-  देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शंकरराव गडाखांचा शिवसेनेत प्रवेश, म्हणाले पक्ष प्रवेशामुळे…

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी शिवबंधन बांधून गडाख यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला. अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर आता गडाखांवर या जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.शिवसेनेकडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज तब्बल ६१६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- आज तब्बल ६१६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. आतापर्यंत सात हजाराहून अधिक रुग्ण झाले बरे! मनपा ३०० संगमनेर २० राहाता ६ पाथर्डी २४ नगर ग्रा.१८ श्रीरामपूर२६ कॅन्टोन्मेंट२१ नेवासा १७ राहुरी१९ श्रीगोंदा ३७ पारनेर ३८ अकोले २ शेवगाव३३ कोपरगाव २० जामखेड ७ कर्जत २७ मिलिटरी हॉस्पीटल १ बरे झालेले एकूण रुग्ण:७२६३ आमच्या … Read more

एका शववाहिकेत 12 कोरोनाबाधितांचे मृतदेह होते, इतका भयंकर प्रकार पाहिल्यावर मन …

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी मृतदेहांची प्रचंड अवहेलना व हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार नगरच्या जिल्हा रूग्णालयात उघडकीस आला आहे. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले असून मानवतेला काळीमा फासणारे प्रकार सध्या सुरु असल्याचे म्हटले आहे. या व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईल आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा बोराटे यांनी … Read more

माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- गणेश उत्‍सवात आयोजि‍त करण्‍यात येणारा प्रवरा सांस्‍कृतीक व क्रिडा महोत्‍सव कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर यावर्षी रद्द करण्‍यात आला असुन, कुटुंबाच्‍या, समाजाच्‍या व राष्‍ट्राच्‍या आरोग्‍य रक्षणासाठी यावर्षीचा गणेश उत्‍सवही घरगुती पध्‍दतीने साजरा करावा असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्राव्‍दारे गणेश मंडळांना केले आहे. गेली अनेक वर्षे आ.राधाकृष्‍ण विखे पाटील … Read more

नागरिकांनी घाबरून जाऊ नये : सत्यजित तांबे यांचे प्रतिपादन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून यावर मात करणे सहज शक्य आहे. अशा वेळी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने हाती घेण्यात आलेला मिशन पॉझिटिव्ह सोच  हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांनी केली आहे.  ते स्वतः या उपक्रमामध्ये सोशल मीडियाच्या … Read more

अहमदनगर मध्ये शिवसैनिकांनी जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा ! जाणून घ्या कारण…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  कर्नाटक राज्यातील बेळगावमधील मनगुती या गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून समस्त महाराष्ट्र वासियांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. या प्रकरणी नगर शहरात शिवसेनेकडून कर्नाटक शासनाचा जाहीर निषेध म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा ‘शिवसेना स्टाईल ने जाळुन’ निषेध व्यक्त करण्यात आला. बेळगावमधील मनगुती … Read more

आज मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार पैसे; ‘असे’ चेक करा आपले नाव आहे कि नाही

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली.  या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेगा कार्यक्रमात पंतप्रधान किसान योजनेचा सहावा हप्ता जाहीर करणार आहेत.  या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर!

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर! आज मिळाला ३८४ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १७२ संगमनेर २३ राहाता ३ पाथर्डी २७ नगर ग्रा.१६ श्रीरामपूर १८ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा २१ श्रीगोंदा १८ पारनेर १० अकोले ४ शेवगाव १४ कोपरगाव ३९ जामखेड ५ मिलिटरी हॉस्पीटल १ आता पर्यंत कोरोनातून बरे … Read more

सुजय विखे झाले आक्रमक म्हणाले माझी ६ कोटी रखडलेली उधारी आधी द्या !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- भाजप सरकारच्या काळात ५ वर्षे चांगली सुरू असलेल्या महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेची विमा कंपनी विद्यमान महाविकास आघाडी सरकारने का बदलली याचे उत्तर आधी दिले जावे तसेच ही कंपनी आल्यापासून माझ्याच विखे हॉस्पिटलची सुमारे ६ कोटीची रखडलेली उधारी आधी द्यावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी शनिवारी येथे … Read more

मुलीच्या वाढदिवसाला येण्याची त्यांची इच्छा शेवटी अधुरीच राहिली

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील भूदल सेवेत आसाम मधील तेजपुर येथे सेवा बजावत असणारे भरत लक्ष्मण कदम हे प्रात्यक्षिक करत असताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत पावले आहेत. कदम हे २००३ पासून देशसेवेचे व्रत हाती घेऊन आर्मी मध्ये सेवा बजावत होते. ते सध्या आसाम येथे नायक पदावर कार्यरत होते. शुक्रवारी … Read more

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७ टक्क्यांवर – आरोग्यमंत्री राजेश टोपे

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आजदेखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. … Read more

शारीरिक शिक्षणाचा समावेश दिक्षा अॅपमध्ये करणार- शिक्षण संचालक दिनकर पाटील

संदीप घावटे सर श्रीगोंदा, अहमदनगर :- कोरोना सारख्या विचीत्र परिस्थितीला जग सामोरे जात असताना रोगप्रतिकारक शक्ती माणसाला तारते आहे . ही रोगप्रतीकारक शक्ती योगा, प्राणायम, सूर्यनमस्कार, एरोबिक्स तसेच इतर व्यायाम प्रकारातून निर्माण होते. या सर्व बाबी शारीरिक शिक्षणात येत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक शिक्षणातील तंत्रशुद्ध व्यायाम प्रकाराची माहिती विद्यार्थ्यां समवेत शिक्षक, पालक व समाजासाठी अत्यंत … Read more

कोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.  सर्व विभागीय आयुक्त, … Read more

कोरोना बाबत अहमदनगरसह या १० प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.  सर्व विभागीय आयुक्त, … Read more