खासदार लोखंडे म्हणतात, आम्ही चार बायकाही सांभाळू शकतो

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- दूध आंदोलनावरून आता राजकारण तापू लागले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. खा. लोखंडे यांनी  ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,’ असं जहरी उत्तर माजी मंत्री राम शिंदे यांना दिलं आहे. दूध दरासाठी भाजपनं आज पुकारलेल्या आंदोलनात माजी मंत्री व भाजपचे … Read more

शेतक-यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काॽ

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही, मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतक-यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काॽ असा सवाल उपस्थित करतानाच सरकार पाडण्‍यात आम्‍हाला रस नाही, तुम्‍ही जनतेच्‍या मनातून केव्‍हाच पडले आहात, आता केवळ बैठकांचा फार्स करू … Read more

Live Updates : दूध उत्पादकांचा एल्गार, अहमदनगर जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात

शेतकरी संपाचे गाव असलेल्या पुणतांबा येथे शनिवारी दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीसमोरील बळीराजाच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून शेतक-यांनी दूध आंदोलन केले.   राज्यात आज दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे.दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघर्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज वाढले इतके कोरोना रुग्ण, वाचा दुपारपर्यंतचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४ ने वाढ झाली. दरम्यान, आज जिल्ह्यातील २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६३९ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९ (सिव्हिल हडको ०१, निर्मल नगर ०१, माळीवाडा ०१, पाईप … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज २७९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील २७९ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३६३९ झाली आहे मनपा ११७ संगमनेर ३८ राहाता १८ पाथर्डी १४ नगर ग्रा.२१ श्रीरामपूर ०५ कॅन्टोन्मेंट २३ नेवासा १ श्रीगोंदा १ पारनेर १० अकोले १२ राहुरी ७ शेवगाव ४ कोपरगाव ५ कर्जत ३ अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ता लागणार नाही !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्यात माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालीही भाजपने आक्रमक आंदोलन करून दूध दरवाढ करून शेतकर्‍यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा अशी मागणी केली.  दूधाची खरेदी अतिशय कमी दराने होते, त्याचवेळी विक्री 50 ते 60 रुपयाने होते. याबाबत सरकारला अर्ज विनंत्या करूनही निर्णय घेतला नाही. सरकार सर्वच … Read more

‘हे’आमदार झाले नाराज, पोलिसांबाबत केली थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- तालुक्यातील विविध भागात पोलिस चौक्या उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले असतानाही पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला अंधारात ठेवत चौक्यांचे उद्घाटन केल्याने आमदार लहू कानडे नाराज झाले. त्यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. दरम्यान, यात राजकारण न करता सहकार्य केले पाहिजे, असे माजी सभापती दीपक पटारे म्हणाले. मागील महिनाभर आमदार कानडे मुंबईत … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले नेत्यांना चांगले वाटावे म्हणून सुजय विखे…..

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- आज अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात रोहित पवार यांनी भेट देत कोरोनाच्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर वक्तव्य केले. यावेळी त्यांनी खा.सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. खा. सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी राम मंदिर भूमिपूजनवरून भाजपवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला होता. ते म्हणाले होते ‘अहमदनगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडचे आमदार … Read more

राज ठाकरेंवर बाळासाहेब थोरात बरसले; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज्यातील राजकीय स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करत त्यांनी, राज्य सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, असा टोला लगावला होता. सरकारमधील तीन पक्षांमध्ये एकोपा नाही, असेही त्यांनी नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना प्रतिसवाल केला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल 411 रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज.

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ४०८ कोरोना रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३५७ झाली आहे. मनपा २२३ संगमनेर ५३ राहाता १८ पाथर्डी २ नगर ग्रा.२५ श्रीरामपूर २३ कॅन्टोन्मेंट १ नेवासा १० पारनेर ७ राहुरी १० शेवगाव १ कोपरगाव ३ श्रीगोंदा १५ कर्जत १४ अकोले ५ जामखेड१ … Read more

ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब न दिल्यानं आत्महत्या केलेल्या अभिषेकला दहावीत 81 टक्के

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- बीड: जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भोजगाव इथल्या अभिषेक राजेंद्र संत या विद्यार्थ्यांने ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी पालकाने टॅब घेऊन दिला नाही. म्हणून नाराज झालेल्या अभिषेकने 19 जून रोजी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अभिषेक दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता, काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अभिषेकने 81 टक्के गुण मिळवून … Read more

संतापजनक घटना, कोरोना संशयीत युवतीचा गुप्तांगातून घेतला स्वॅब

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :-कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कातील २४ वर्षीय तरुणीचा कोविड लॅबमध्ये गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बडनेरा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा बलात्कारासह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. अल्पेश अशोक देशमुख (३०, रा. पुसदा, जि. अमरावती), असे आरोपीचे नाव असून तो बडनेरा चयेथील लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून काम … Read more

अहमदनगरच्या ‘ह्या’ मुलाने बोर्डाच्या परीक्षेत केला अनोखा विक्रम !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- काल दहावीचे निकाल जाहीर झाले. कोणी 100 टक्के गुण मिळवले तर कोणी काठावर पास झाले. मात्र तेजस विठ्ठल वाघ (रा. हनुमानवादी, सोनई) या विद्यार्थ्याने सर्व विषयात ३५ मार्क मिळवून उत्तीर्ण झाला आहे. शंभर पैकी शंभर पैकी गुण मिळवणे जेवढे अवघड त्यापेक्षा सर्व विषयात 35 गुण मिळवणे म्हणजे एक दिव्यच. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तृरुंगातील तब्बल १५ कैदी बाधित !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी कोठडीतील आणखी १५ कैदी बाधित झाले. त्यामुळे बाधित कैद्यांची संख्या १९ झाली आहे. तीन पोलिसही अँटीजन रॅपिड चाचणीत बाधित आढळले.    इतर नऊ अशा २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एक खासगी डॉक्टरच्या डॉक्टर पत्नीलाही बाधा झाली आहे. तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या २२७ झाली. एका महिलेचा मृत्यू झाला, … Read more

मोठी बातमी : 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-  राज्यात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच असून राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. नुकतंच याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र या आदेशात काही नियमही शिथील करण्यात आले आहेत. यानुसार राज्यातील मॉल्स येत्या 5 ऑगस्टपासून पुन्हा सुरु केले … Read more

महत्वाची बातमी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी दि. ३१ जुलै २०२० असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी बँक … Read more

आनंदाची बातमी : ऐतिहासिक अहमदनगरच्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अखेर नगरच्या बहुर्चित, बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला आज (२९ जुलै) सुरवात होणार आहे. दुपारी एक वाजता साधेपणाने हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली. विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : २४ तासात वाढले १६१ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६१ ने वाढ झाली.  यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९०, अँटीजेन चाचणीत २६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या ४५ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५२ इतकी झाली आहे. … Read more