तक्षिला स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के 24 विद्यार्थी 90 टक्क्यांच्या पुढे

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या यंदाच्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहिर झाला असून, तक्षिला स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. 24 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांच्या पुढे गुण मिळवले असून, गरिमा गोपलानी हिने 99 टक्के गुण … Read more

अहमदनगर लॉकडाऊनबाबत खा. सुजय विखे यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने खूपच हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता हजाराच्याही पुढे गेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस डॉ. विखे यांच्यासोबत … Read more

धक्कादायक : अहमदनगर जिल्ह्यात 24 तासांत वाढले 114 कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 (10.56 AM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी 32 कोरोना रुग्ण आढळले आहेत, धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात अहमदनगर जिल्ह्यातील 114 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 16, संगमनेर 11, आणि श्रीगोंद्यामधील पाच जणांचा समावेश आहे. सकाळच्या 32 जणांच्या अहवालानुसार नगर शहरातील पाईपलाईन रोड, भराडगल्ली, बालिकाश्रम … Read more

तुरुंगात कैद्याचा औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- राहुरी पोलिस ठाण्यातील तुरुंगात कैद असलेल्या कोल्हार खुर्द कैदी असलेला अल्लाउद्दीन शेख (वय ३०) याने पायाला लावायचा मलम खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री केला. त्याला लगेच राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी या घटनेला दुजोरा दिला. मात्र, पोलिस प्रशासनाने या बाबतीत गुप्तता पाळली आहे. गेल्या काही … Read more

भेळ विक्रेत्याचा मुलगा झाला आरटीओ!

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जामखेड तालुक्यातील खर्डा जवळील दिघोळ गावचे सुपुत्र रमेश सावंत यांची आरटीओ म्हणून नुकतीच निवड झाली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी हे यश मिळवले आहे. येथील रहिवाशी छगन सावंत यांनी गावात कावडीने पाणी  वाहिले नंतर शेव चिवडा व भेळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याला अशोक सावंत यांच्या मोठ्या मुलाने साथ दिली. … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ क्वारंटाइन ! ‘हे’ आहे कारण !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुक्रवारपासून (दि. १७) सोमवारपर्यंत (दि. २०) हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे या आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. या आठवड्यात ते कुणालाही भेटणार नाहीत, असे त्‍यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मंत्री मुश्रीफ यांचा … Read more

दंड भरणार नाही! तर केस चालविणार… सुहास मुळेंचा निर्धार!

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-  नगर शहरात लॉकडाऊन बाबत फेक मेसेज व्हायरल केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या सुहास मुळें यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भादंवि १८८ अन्वये पाचशे रुपयांपैकी पाच रुपयेही दंड भरणार नाही. तर यासंदर्भात आवश्यक ते सर्व पुरावे असल्याने ही केस चालविण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते सुहास मुळे यांनी ‘अहमदनगर लाईव्ह २४. कॉम’शी … Read more

कोरोना ब्रेकिंग : पुन्हा पाच महिला कोरोना बाधीत

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 (11.13 AM) :- संगमनेरमध्ये आज पुन्हा पाच महिला कोरोना बाधीत आढळुन आल्या आहेत. त्यामुळे संगमनेरमध्ये कोरोनाची दहशत सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. आज सकाळी शासकीय रुग्णालयातुन मिळालेल्या अहवालानुसार निमोण येथील 45 वर्षीय महिला तर कसारा दुमाला येथील 19 वर्षीय युवतीला व 30 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. गुंजाळवाडी येथील … Read more

माजी आमदार राठोड झाले आक्रमक म्हणाले ज्यांचे हात बरबटले त्यांच्याच माथी हे पाप….

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- दुरवस्था झालेल्या तपोवन रस्त्याचे काम होण्यासाठी शिवसेनेने वेळोवेळी आंदोलन करून पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री निधीतून हा रस्ता मंजूर होऊन साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला. या निधीतून दर्जेदार काम होणे अपेक्षित होते, परंतु, ठेकेदाराने कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केला. गैरव्यवहाराने ज्यांचे हात बरबटले त्यांच्याच माथी … Read more

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते विश्‍वासाचे ! कोरोनावर मात केलेल्या 11 वर्षीय मुलाच्या आईची भावनिक पोष्ट

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : माझी व बहिणीची मुले, बहिण व भाउ मुंबईवरून भाळवणीत आले,दोन दिवसानंतर मुंबईत सासूबाईंची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. मी मुंबईत कॉरंटाईन झाले, गावी आलेल्यांची कोराना चाचणी करण्यात आल्यानंतर माइ-या 11 वर्षाच्या लहानग्यालाही कोराची बाधा झाल्याचा अहवाल आला. मी मुंबईत कॉरंटाईन, सासू हॉस्पिटलमध्ये व 11 वर्षांचा मुलगा नगरच्या बुथ हॉस्पिटलमध्ये दाखल … Read more

माजी आमदार राहुल जगताप झाले आक्रमक म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : नगर-दौंड महामार्गाचे सुमारे ६५० कोटींचे काम झाले. तथापि, या कामात दर्जा न राखल्याने कोळगाव व ठिकठिकाणी मोठे खड्डे व भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दिनेशचंद्र आर अग्रवाल या कंपनीच्या ठेकेदाराने त्वरित दुरुस्ती करावी; अन्यथा कोळगाव येथे रस्ता बंद करण्याचा इशारा माजी आमदार राहुल जगताप यांनी सोमवारी … Read more

थोडंसं मनातलं : जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर जिल्हा एकदा पुर्णपणे लाॅकडाऊन कराच….

महाराष्ट्रातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील. व शहरात दररोज नवीन नवीन तीस चाळीस रुग्ण सापडतात. त्यामुळे सध्याची कोविड-19 ची परिस्थिती भयानक निर्माण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे चारही बाजूचे असलेले पुणे,नाशिक,बीड आणि सोलापूर या जिल्ह्यातील मा .आयुक्त साहेब यांनी कोविड-19 ची वाढती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चोरी करण्यास विरोध केल्याने निर्घृण हत्या !

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :चोरी करण्यास विरोध केल्याने तिघांनी सुपा येथे एका व्यक्तीची कुर्‍हाड, भाला, लाकडी दांडक्यानी मारहाण करत धिसीम निचकी घिसाडी (वय 50) या इसमाची निर्घृण हत्या केल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे.  याबाबत पाशम धिसीम घिसाडी (वय 25, रा. सुपा) यांनी सोमवार 13 जुलै रोजी सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, … Read more

अहमदनगर महापालिकेचे कामकाज बंद !

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2020  :  महापालिकेतील एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर कर्मचारी युनियनने काम बंद केले. जोपर्यंत पर्यायी इमारत उपलब्ध होत नाही, तोपर्यंत काम बंदच राहील. प्रशासनाने प्रतिबंधात्मक साधने न पुरवल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केला. संपूर्ण शहरात कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांनाच बाधा झाली. आतापर्यंत … Read more

एक जण पॉझिटीव्ह आल्याने संपुर्ण गाव दहशतीखाली

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2020  : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील रहिवाशी असलेला जिल्हा परिषद कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने तहसीलदार सौ. ज्योती देवरे यांनी भाळवणी गाव तीन दिवस पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तर ग्रामपंचायतीच्या परिसरातील शंभर मीटरचा परिसर कॅन्टेन्मेंट झोन घोषित केला होता. व ‘त्या’ कर्मचार्‍याच्या संपर्कात आलेल्या ग्रामपंचायतीचे पाच कर्मचारी व इतर … Read more

म्हणजे मनपा प्रशासन अपयशी झाले आहे…

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2020  : नगर लॉकडाऊन करण्यास आमचा विरोध नाही, पण मनपा प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता. शहरात यापूर्वी तीन लॉकडाऊन झाले. त्यानंतरही रुग्ण वाढले, म्हणजे मनपा प्रशासन अपयशी झाले आहे, असा आरोप शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले, लॉकडाऊनबाबत आयोजित बैठकीला सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापाऱ्यांना बोलावणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तो’ संदेश खोटा…शेअर केल्यास होईल कारवाई !

अहमदनगर Live24 टीम (13 जुलै 2020  11.07 PM) :अहमदनगर शहरात आज एक संदेश व्हायरल होत असून यात 16 तारखेपासून जनता कर्फ्यू लागू होणार असल्याचे सांगितले आहे, मात्र तो संदेशच खोटा असून अश्या प्रकारचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले असून कोणीतरी खोडसाळ पणा केल्याचे समोर आले आहे. याबाबत अहमदनगर सायबर पोलिसांकडून फेक मेसेज ग्रुप वर … Read more

श्रीरामपूरमध्ये तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : श्रीरामपूरमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने कोविड १९ साठी येथील तत्काळ निदान तपासणी शिबीरात ७८ जणांच्या रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या.  त्यामध्ये तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याही याठिकाणीच तत्काळ तपासणी करण्यात आली. त्यामुळे आता कोरोना बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने येथील वार्ड … Read more