जिल्ह्यात ३३ टक्के क्षमतेनेहॉटेल्स, लॉजेस आणि गेस्ट हाऊस ८ जुलैपासून सुरु करता येणार

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्स वगळता हॉटेल्स, लॉजेस, गेस्ट हाऊस आदी आस्थापना त्यांच्या ३३ टक्के क्षमतेने विविध अटी व शर्तींचे काटेकोर पालन करुन दिनांक ८ जुलैपासून सुरु करता येतील, असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. कन्टेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी या आस्थापना सुरु करता येतील, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी … Read more

धनंजय मुंडे कोरोना ब्रेकनंतर पुन्हा बॅक टू वर्क

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आज मंत्रालयात कामावर परत रुजू झाले. मंत्रालयातील त्यांच्या दालनात परतताच त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. श्री. मुंडे दर महिन्याला विभागामार्फत, पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात तसेच त्यांच्या परळी या मतदारसंघात केलेल्या कामकाजाचा आढावा पक्षश्रेष्ठी व जनतेसमोर मांडतात. रुग्णालयात … Read more

काही लोक आघाडीत बिघाडी करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत : मंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : सध्याचे राज्याचे राजकारण पहिले तर महाविकास आघाडी उत्तम कार्य करत आहे. जनताही या कार्यामुळे समाधानी आहे. परंतु काही लोक महाविकास आघाडीत बिघाडी करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे दंडकारण्य अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ते यावेळी बोलताना म्हणाले शिवसेना, राष्ट्रवादी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाने घेतला आणखी एका वृद्धाचा बळी !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून गेल्या सात दिवसांतच २१६ रुग्ण आढळले आहेत. आज संगमनेर शहरात मध्यवर्ती भागात राहणार्‍या 70 वर्षीय वृद्धाचा आज पहाटे मृत्यु झाल्याचा अहवाल नाशिक प्रशासनाने संगमनेर प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता संगमनेरात कोरोनाने बाधित होऊन मयत झालेल्यांची संख्या 12 वर गेली आहे. … Read more

३६ रुग्णांची कोरोनावर मात, ७५ वर्षांच्या आजीबाई आणि ०६ वर्षाच्या चिमुकलीचा समावेश

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : ७५ वर्षांच्या आजीबाई आणि ६ वर्षाच्या चिमुकलीसह आज ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या आजारातून बरे होऊन त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदनगर मनपा १७, राहाता ०५, नगर ग्रामीण ०५, पारनेर, जामखेड, आणि अकोले येथील प्रत्येकी ०२, शेवगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा येथील प्रत्येकी एक रुग्ण यांचा समावेश आहे. … Read more

शरद पवारांच्या भेटीनंतर राऊत म्हणतात, राजकारणात लवकरच खळबळ उडणार

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :मध्यंतरी झालेले काँग्रेस व शिवसेनेचे वाद, तसेच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीवेळी झालेली काँग्रेसची धुसफूस आणि आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या केलेल्या अंतर्गत बदल्यांना राज्य शासनाने रविवारी दिलेली स्थगिती यामुळे या सरकारमध्ये धुसफूस सुरु असल्याचे चीत्र निर्माण झाले आहे. आणि आता पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक … Read more

कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण गावच बंद ठेवण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  बेलापुरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर २०० मीटर परिसर पूर्ण सील करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिल्या. तथापि, चार दिवस संपूर्ण गावच बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. रविवारी रात्री एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्ण आढळलेल्या परिसरात नागरिक ये-जा करत असल्याचे … Read more

विधान परिषदेवर संधी मिळाली, तर सोने करून दाखवेन

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : विधान परिषदेसाठी शरद पवार यांनी संधी दिली, तर मी त्या संधीचे सोने करून दाखवेन. माझ्या आयुष्यातील तो टर्निंग पॉइंट असेल, असे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सलगर यांनी आमदार नीलेश लंके यांच्या कार्यालयास भेट दिली. सत्कारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधान परिषदेत … Read more

पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना निरोप !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पारनेर नागरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंना फार रुचलेले दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना दिल्याची माहिती मिळत आहे.आता राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  पारनेर तालुक्यात शिवसेनेला रामराम … Read more

महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत कलह उघड

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :पारनेर नगर पंचायतीच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या सुप्त तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या बड्या नेत्यांमध्ये मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई आदी उपस्थित होते. … Read more

‘ही’महाआघाडी सरकारची बनवेगेरी

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीचे शिवसेनेचे ५ नगरसेवकांसह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना जर राष्ट्रवादीत घेतले नसते तर ते भाजपच्या वाटेवर होते. असा खुलासा आ. लंके यांनी पक्षश्रेष्ठी व माध्यमांकडे केला आहे. तो चुकीचा आहे. ही महाआघाडी सरकारची बनवेगेरी आहे. असा आरोप तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केला आहे. सध्या राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस … Read more

थोडंसं मनातलं : लाॅकडाऊन असुनही मोबाईल मुळे “अबोल” झालीत “कुटुंब”…..

नमस्कार मित्रांनो सध्या देशात कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच 25 मार्च पासुन 31जूलै 2020 पर्यंत टप्पा पध्दतीने लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या लाॅकडाऊन च्या काळात पहिल्या तीन टप्प्यांत जवळपास सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली होती. त्यामुळे कुटुंबातील जवळपास सर्व माणसं घरीच आहेत. खरं … Read more

भाजीपाल्याची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळे, धान्य थेट बाजारात आणून नागरिकांना माफक दरात ते मिळाले पाहिजे या उद्देशाने कोपरगाव बाजार समितीने बैलबाजार येथील शेडमध्ये शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली. यामुळे शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने संत शिरोमणी सावता माळी शेतकरी बाजार अभियान राबवण्याचा … Read more

जग पाहण्याआधीच आईच्या पोटात बाळाला घ्यावा लागला अखेरचा निरोप …

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. तिला श्रीरामपूरला न्यायचे ठरले. मोटारसायकलीवरून तिला घेऊन नातेवाईक निघाले. पुढे केसापूर येथे श्रीरामपूरला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केलेला. त्यामुळे परत माघारी फिरून लोणी असा प्रवास करावा लागला. त्यामुळे विलंब होऊन मातेला बाळ गमवावे लागले. केसापूर येथे कोरोनाचे चार रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने हे गाव … Read more

या गावात एकाच दिवशी आढळले २२ कोरोना रूग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील कुरण गावात एकाच दिवशी २२ कोरोना रूग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६१८ झाली आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे तब्बल 22 व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना बाधित असल्याचे मिळून आला आहे. त्यामुळे तेथे कोरोनाने थैमान घातल्याचे आता दिसून येत आहे. यापुर्वी तेथे पहिल्यांदा दोन रुग्ण मिळून आले होते. त्यानंतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मोठ्या कापड दुकानाच्या मालकाचा कोरोनाने घेतला बळी !

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :   नगर शहरातील एमजीरोड येथील एका मोठ्या कापड दुकानाच्या मालकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे कापड बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली आहे. अहमदनगर शहरातील एका मोठ्या दुकानाच्या मालकाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.  या प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा दोन दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मृत व्यक्ती ही व्यावसायिक असून त्यांचा … Read more

राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले आहेत. नगर तालुक्यात नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१, श्रीरामपूर ०१, गवळी वाडा (भिंगार ) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१  या रुग्णांचा समावेश आहे. आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या … Read more