राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८ हजार १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळातील असून ७ हजार ३३ रुग्णांना घरी सोडण्यात … Read more

प्रियंका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भेदरलेल्या भाजप सरकारचे हीन राजकारण – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : मोदी सरकारने प्रियंका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे हे दुर्देवी आहे. प्रियंका यांनी आपली आजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा भयानक मृत्यू पाहिला आहे. आजही गांधी कुटुंबावरील हा धोका टळलेला नसताना सुरक्षा व निवासस्थान काढून घेणे हे भाजपचे हीन राजकारण आहे. प्रियंका गांधी यांच्या … Read more

सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :   यंदाच्या आर्थिक वर्षात पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत केंद्राकडून राज्यातील ग्रामपंचायतीना येणारा निधी २० टक्क्याने कमी करुन तो जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे दहा दहा टक्क्याने वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय पारित करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री लागली. आयोगने राज्याला १४५६ .७५ कोटी रुपयाचा दिलेला पहिला हप्ता जिल्हा … Read more

उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्याकडून कर्जत च्या जनतेचा विश्वास घात

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांच्या चौक सुशोभीकरण व विकास कामात भ्रष्टाचार व काही कामे न करता पैसे खर्च दाखवून उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी कर्जत च्या जनतेचा विश्वास घात केल्याचा आरोप नगरसेवक सचिन घुले यांनी पत्रकार परिषदेत केला.  या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेत्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आंनदाची बातमी : ही बँक देणार तीन लाखापर्यंतचे पिक कर्ज शुन्य टक्के व्याजदराने !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  जिल्हयातील शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकेमार्फत मोठया प्रमाणावर पिक कर्ज वाटप होत असुन बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या पिक कर्जासाठी रूपये १ लाखापर्यंत पिक कर्जासाठी रूपये ० टक्के तर रूपये १ लाखाचे पुढे ते रूपये ३ लाखापर्यतच्या पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना रुपये २ टक्के व्याज भरावे लागत होते. केंद्र सरकार व राज्य … Read more

ग्रामीण भागातील ५ कोटी जनतेला अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषध मोफत

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषध ग्रामीण भागातील सुमारे 5 कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

थोडंस मनातलं : धार्मिक स्थळे , शाळा आणि काॅलेज अजुनही बंदच पण दारू व्यवसाय सुरू ….

नमस्कार मित्रांनो, आज पासुन अनलाॅकडाऊन भाग 2 सुरू होतो आहे. सध्या अहमदनगर जिल्हा नाॅन रेड झोन आहे. महाराष्ट्रा बरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णाची संख्या दररोज वाढतच आहे. दोन तीन दिवसात जास्त प्रमाणात कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. परंतु कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी कठोर भूमिका घेतली आहे. तसेच पोलिस … Read more

आत्महत्या करण्यापूर्वी सुशांत राजपूतने केले होते हे काम .. मोबाईलच्या फॉरेन्सिक रिपोर्टमुळे माहिती समोर !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : अभिनेता सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर काहींनी सुशांतची हत्या केल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. सुशांतच्या मोबाईलचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार आत्महत्येपूर्वी जवळपास १० वाजता सुशांतने गुगलवर स्वत:ला सर्च केलं होतं. आत्महत्या केली त्यादिवशी म्हणजेच 14 जूनला सकाळी … Read more

महाराष्ट्रात भाजपाचं सरकार असतं तर यापेक्षा चांगलीच परिस्थिती असती – खासदार डॉ.सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  राज्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असून रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे,याबाबत बोलताना खासदार डॉ.सुजय विखे यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.  मंत्र्यांचा ब्रेन लॉक झाला आहे. त्यामुळे अनलॉक काय करावं हे त्यांना कळेना झालं आहे. राज्यातील मंत्रीच लॉक झाले आहेत आणि जनता अनलॉक. अशी परिस्थिती निर्माण … Read more

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार देणाऱ्या अल्पवयीन मुलास बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लिपिकाच्या विरोधात तक्रार देणाऱ्या अल्पवयीन मुलास बुधवारी दुपारी बेदम मारहाण झाली. याप्रकरणी मुलाने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुलाला त्याच्याच घरात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये मुलाच्या आईचाही समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन दोन दिवस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या डॉक्टरसह तिघे कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कोपरगाव शहरातील दोन, तर टाकळी येथील एक रुग्ण कोरोनाबाधित आढळला. खडकी रोड येथील ४५ वर्षीय डॉक्टर व डॉक्टरांच्या ७२ वर्षीय वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे दोघेही नाशिक येथे जाऊन आले होते. टाकळी येथे सासरी आलेल्या मुंबईत वास्तव्य असलेल्या ४६ वर्षीय जावयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी कृष्णा … Read more

लग्नाला गेले अन् कोरोना घेऊन आले…संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरजवळ असलेल्या केसापूर येथील दाम्पत्य मुलासह मुंबईतील विवाह समारंभासाठी गेले होते. खैरी येथील युवती अस्तगाव येथे लग्नाला गेली होती. येताना ते कोरोना घेऊन आले. कोरोना लग्नाच्या माध्यमातून प्रवास करतो हे लक्षात आले असूनही नियम धाब्यावर बसवून लग्नांचा धुमधडाका सुरूच आहे. मागील आठवड्यात २३ वर्षीय युवतीसह अनेकजण … Read more

थोडंसं मनातलं : ऑनलाईन शिक्षण किती विद्यार्थ्यांचे बळी घेणार ? ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रांनो, सध्या देशात करोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय. कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत आणि त्यामुळेच कोरोना आटोक्यात येत आहे. सरकारने 31जुलै 2020 पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. असे असले तरी जनतेच्या अडचणी सुटाव्यात म्हणून छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. परंतु गेले दोन महिन्यांपासून लोकांना काहीही कामधंदा नसल्याने अर्थिक … Read more

राज्यात ९३ हजार रुग्ण कोरोनामुक्त व ‘इतक्या’ रुग्णांवर उपचार सुरू !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २२४३ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९३ हजार १५४ झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख  ९२ हजार ७२३ नमुन्यांपैकी  … Read more

कोरोनाबाधीतांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत आज आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. अधिग्रहीत केलेले रुग्ण वाहक वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात … Read more

बिग ब्रेकिंग : कोहिनूर मध्ये 9 कर्मचारी कोरोनाबाधित ! खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचाही शोध….

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारातील ’कोहिनूर’ मधील आतापर्यंत तब्बल 9 कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मागील तीन-चार दिवसांत आढळलेल्या शहरातील कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल 8 रुग्ण हे कोहिनूर या दुकानात काम करणारे कर्मचारी आहेत. तर आणखी 1 व्यक्ती त्यांच्याशीच संबंधित आहे. सिध्दार्थनगर, सारसनगर, मुकुंदनगर, तोफखाना अशा विविध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज दुपारी वाढले पुन्हा २५ कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये एकूण २५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले आहेत. यात नगर शहरातील १४, राहुरी तालुका ०४, बीड जिल्हा-०१, पाथर्डी तालुका ०१, कोपरगाव ०३, राहाता तालुका ०१आणि श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बाधित आढळले आहेत. नगर शहरातील तोफखाना भागातील १०, ढवणवस्ती येथील ०२ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 36 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : अकोले तालुक्यातील कृषीउत्पन्न बाजार समिती या परिसरात राहणार्‍या एका 36 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. काल मंगळवार दि. 30 रोेजी कोरोनाशी लढा देत असताना या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या मृत कोरोनाबाधित व्यक्तीच्या सानिध्यात … Read more