शरद पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा एक्स्प्रेस वेवर अपघात

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीस पायलेटिंग मोटार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली पलटली. शरद पवार यांच्या वाहनाचा ताफा आज सकाळी मुंबईच्या दिशेने जात असताना ताफ्यात मागे असलेली पोलीस व्हॅन क्र. (एमएच 12 एनयु 5881) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले : वाचा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर ? Ahmednagar petrol price today

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत आज पेट्रोलच्या (Petrol Prices) दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ झाली असून डिझेलच्या (Diesel Prices) किंमतीत प्रतिलिटर 12 पैशांची वाढ झाली आहे. देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. अगोदरच लॉकडाऊन त्यात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. असे … Read more

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी : या ठिकाणी २० हजार जणांना नोकरी !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : भारतात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे,देशातीलआघाडीची ई-कॉमर्स सेवा देणारी Amazon India ही भारतात २० हजार तरुणांना नोकरी देणार आहे. या कंपनीत हंगामी तत्वावर २० हजार कर्मचारी भरती करणार आहे.१२ वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी, हिंदी आणि ज्या राज्यात काम करायचे आहे तिथल्या स्थानिक भाषेचे उत्तम ज्ञान असणाऱ्यांना … Read more

पंतप्रधान मोदी आणि चीनचे नेमके काय साटेलोटे आहे, याचा खुलासा सरकारने करावा

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :सीमेवर तणाव असताना अनेक चिनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर फंडाला कोट्यवधींचा निधी दिला. पंतप्रधान मोदी आणि चीनचे नेमके काय साटेलोटे आहे, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, मोदी अहमदाबादमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्याबरोबर चहा पीत होते, … Read more

खासदार सुजय विखे झाले आक्रमक, म्हणाले विघ्नसंतोषी लोकांकडून…

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तनपुरे साखर कारखान्याचे वाटोळे करून स्वत:च्या मालकीचा साखर कारखाना काढला. त्यांना कुणीही जाब विचारला नाही. मात्र, बंद पडलेला तनपुरे साखर कारखाना ज्यांनी सुरू केला, त्यांच्यात भांडणे लावण्याचे काम काही विघ्नसंतोषी लोकांकडून सुरू आहे, असे स्पष्ट करत साखर कारखान्याला आजवर मदत करत आलेल्या माजी आमदार शिवाजी कर्डिले … Read more

कोरोनाच्या केसेस पुन्हा वाढताना दिसल्या तर नाईलाज म्हणून काही भागांत पुन्हा लॉकडाऊन…

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : औषधोपचार आणि सुविधा देण्यात महाराष्ट्र कुठेही मागे नसून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान केल्यास अनेकांचे प्राण वाचतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला आवाहन केले. केवळ आर्थिकचक्र सुरु करण्यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरु केलं असलं तरी कोरोनाचं संकट टळलेलं नाही, धोका टळलेला … Read more

धक्कादायक : राज्यात एका दिवसात आढळले कोरोनाचे ५४९३ नवीन रुग्ण ! वाचा तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : राज्यात आज कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश … Read more

शेतकऱ्यांची अडवणूक सहन करणार नाही – खासदार सदाशिव लोखंडे

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : शेतकऱ्यांंची पिक कर्जासाठी अडवणूक करू नये, शेतकऱ्यांना बांधावर खते, बी-बियाणे देण्यात यावी. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक सहन करणार नाही, अशी तंबी खासदार सदाशिव लोखंडे यांनी तालुक्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांना दिली. अकोले येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर … Read more

खासदार सुजय विखे पाटलांनी लुटला पेरणीचा आनंद !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : खासदार सुजय विखे पाटलांनी आज जामखेड चुंबळी गावातील शेतकऱ्याच्या बांधावर जावून शेतकर्यांंशी संवाद साधला.यावेळी त्यांनी शेतात पेरणी करण्याचा आनंदही लुटला.  राज्यात अनेक ठिकाणी बोगस कृषी निविष्ठा मुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली असून आधीच आसमानी संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारच्या हलगर्जीपणामुळे सुलतानी संकटाला सुद्धा तोंड द्यावे लागत आहे. उच्च … Read more

तहसीलदार व आमदारांचे संभाषण झाले व्हायरल राजकीय क्षेत्रात खळबळ…

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  अकोल्यातील राजूर गावातील बाजारपेठेत ग्रामपंचायत कार्यालयाकडून त्यांच्या पातळीवर कधीही लॉकडाऊन करण्याचे निर्णय घेण्यात येतात. मात्र, यासंदर्भात व्यवसायधंद्यातील लोकांंचे मला फोन येतात. तेव्हा राजूर ग्रामपंचायतीला हे अधिकार आहेत काय? तसे अधिकार ग्रामपंचायत प्रशासनाला नसतील, तर तुम्ही त्यांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावून गुन्हे दाखल करावेत, असे आदेशच अकोल्याच्या लोकप्रतिनिधींकडून … Read more

उपनगराध्यक्ष नामदेव राऊत हे केवळ भ्रष्टाचार लपवण्यासाठी….

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : उपनगराध्यक्ष राऊत यांनी महापुरुषांचे नाव घेऊन आरोप केले, यात तथ्य नाही. त्यांना स्मारकच बांधायचे होते, तर त्यांनी दोन वर्षापूर्वी निधी मंजूर असताना का बांधले नाही. बाजारतळ येथे अनाधिकृत शॉपिंग गाळे बांधून किती बेरोजगारांना दिले? अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक जागा असताना का केले नाही. कापरेवाडी चौक सुशोभिकरण का … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुलीच्या नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्याने व्यवसायीकाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी परिसरातील रावसाहेब सखाराम औटी (वय २२) याने शाळेतील मुलांचे खेळण्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्या प्रेमाला विरोध केल्याने त्याने आत्महत्या केली असे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे. राहुल सखाराम औटी (वय २२, रा. औटेवाडी, श्रीगोंदा), … Read more

CM Uddhav Thackeray Live : बोगस बियाणं विकणाऱ्यांना शिक्षा,नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : राज्यातील कोरोनासंबंधीची माहिती तसेच लॉकडाऊन संबंधी माहिती देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला संबोधित  करत आहेत. बोगस बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार,बोगस बियाणं विकणाऱ्यांना शिक्षा अनेक ठिकाणांहून बोगस बियाणांच्या तक्रारी येत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आपल्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यासोबत आपण राहिलं पाहिजे – … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळू तस्करीने घेतला 3 मजुरांचा बळी !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारातील खंडोबा मंदिराजवळ आज पहाटे वाळू तस्करी करणारी टाटा पिकअप २०७ कॅनॉलच्या खड्डयांमध्ये उलटल्याने तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान अधिक माहिती अशी की, संगमनेर येथून रात्रीच्या वेळी( एमएच १४ ए एच १०७३ ) टाटा २०७ या पीकअप … Read more

अहमदनगरची संपूर्ण बाजारपेठ बंद नाही !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :अहमदनगर शहरातील एका भागातील व्यापाऱयांनी आपली दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संपूर्ण बाजारपेठेशी संबंधित नाही. कापड बाजार, मोचीगल्ली, सारडा गल्ली, गंज बाजार इत्यादी प्रमुख बाजारपेठ नेहमीप्रमाणेच सकाळी ९ ते सांयकाळी ५ ह्या वेळेत सुरू राहणार आहे. या भागातील वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान व सर्व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोहिनूरमधील दोन कर्मचारी कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  अहमदनगर शहरातील कापड बाजारातील कोहिनूर वस्त्रदालनातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी कोहिनूर दुकान शनिवारी दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दुकानात काम करणार्‍या सर्वच कर्मचार्‍यांची तपासणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर दुकान सुरू अथवा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. … Read more

१०२ वर्षांच्या पायी वारीत खंड, प्रथमच चारचाकीतून पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  वारकरी साप्रंदायातील थोर उपासक राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न श्रीसंत भगवानबाबा यांनी श्रीक्षेत्र भगवान गडाच्या स्थापनेपूर्वी श्रीक्षेत्र नारायण गडाहून सन १९१८ मध्ये सुरू केलेल्या पायी पढंरपूर दिंडी सोहळ्याला यावर्षी कोरोनामुळे १०२ वर्षांनंतर खंड पडला आहे. संत भगवानबाबा यांच्या पादुकांचे आषाढी एकादशीनिमित्त चारचाकी वाहनातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यंदाच्या प्रस्थान सोहळ्यासाठी पाश्चात्य … Read more

आ. निलेश लंके यांच्या प्रेमात पवार कुटुंबीय पडले… आ.लंकेंच्या रुपात दुसरे आर.आर. आबा !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  आमदार निलेश लंके यांच्या प्रेमात पवार कुटुंबीय पडले असुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शुक्रवारी पारनेर दौरा करून आ.निलेश लंके यांची राजकीय व सामाजिक काम करण्याची पध्दत त्यांनी समजावुन घेतली. पार्थ पवार यांनी दि. 26 जून रोजी अचानक दुपारी पारनेरला येऊन आमदार लंके यांच्या … Read more