अहमदनगर ब्रेकिंग : ७२ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील मालदाड रोड येथील एक ७२ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र हा मृत्यू कोरोनाने नव्हे तर ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपुर्वी मालदाड येथील एका ७२ वर्षीय महिलेस कोरोनाची लक्षणे आढळून येते होती. तिला श्वासोच्छवास … Read more

राज्य सरकार राज्यातील जनतेसाठी काहीही करत नाहीये…

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  महाराष्ट्रातले ताळमेळ नसलेले तीन पक्षांचे तीन तिघाडा, काम बिघाडा सरकार आहे. कोणाचाच कोणाला मेळ नसलेले हे अमर, अकबर, अँथनी आहेत, अशी टीका शनिवारी केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर केली. मंत्री रावसाहेब दानवे यांनी नगरला धावती भेट दिली. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवास्थानी ते … Read more

चुकीच्या कोरोना रिपोर्टमुळे नऊ महिन्याच्या गरोदर महिलेसोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा आणखी मोठा गलथान कारभार समोर आला असून याचा मनःस्ताप एका नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला सहन करावा लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये कोरोनाची टेस्ट केल्यानंतर या महिलेला पॉझिटिव्ह आला असल्याचा रिपोर्ट देण्यात आला. त्यामुळे घरातल्या सर्वानाच क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर त्यांना नायर हॉस्पिटलला पाठवण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत साधूचा मृतदेह सापडला

अहमदनगर Live24 ,13 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील पाझर तलावाजवळ देवस्थान समितीच्या विहिरीत बुधवारी सायंकाळी ६ वाजता भगवे कपडे घातलेल्या साधूचा मृतदेह आढळला. मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतातून घरी येणाऱ्या काही शेतकऱ्यांना ब्रह्मानंद शिवगिरी (राहणार बुलडाणा) यांचा मृतदेह कानिफनाथ देवस्थान समितीने खोदलेल्या विहिरीत तरंगताना दिसला. माहिती मिळताच … Read more

त्या खासगी शाळांची होणार चौकशी !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत, तरीही शैक्षणिक शुल्कासाठी पालकांकडे तगादा लावला जात आहे. अशा शाळांची चौकशी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. काही शैक्षणिक संस्था, शाळा पालकांना फी भरण्याची सक्ती करत असल्याच्या तकारी शासनाकडे आल्या. त्यामुळे महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियमानुसार शासनाने आदेश जारी केला आहे. शैक्षणिक वर्ष २०१५-२० व … Read more

देशातील सर्वात मोठ्या अखंड हरिनाम सप्ताहवर कोरोनाचे संकट !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : कोरोनामुळे  लाखो भक्तांच्या उपस्थितीच्या उच्चांकीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या गंगागिरी महाराज यांच्या यंदाच्या १७३ व्या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रशासनाकडून परवानगी मिळाली तरच सप्ताह होणार आहे. दरम्यान परवानगी मिळावी म्हणून सप्ताह कमिटीने अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. श्रीरामपूर शहराजवळ शिरजगाव हद्दीत ऑगस्ट महिन्यात हा धार्मिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आणखी ५ जण ‘कोरोना’ बाधित

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी ५ जण ‘कोरोना’ बाधित झाले आहे. आज जिल्ह्यातील १९ व्यक्तीना डिस्चार्ज. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १८६. आज आणखी नवीन ०५ रुग्णांची भर तर २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह . पाचही बाधित संगमनेर तालुक्यातील आहेत. या पाचपैकी ३ जण निमोण येथील एकाच कुटुंबातील. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सॅनिटाझरचा पळविलेला ट्रक अखेर सापडला !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारातुन रात्री 21 लाख रुपयांच्या सॅनिटायझर बाटल्या घेऊन जाणार्‍या ट्रक चार चोरट्यानी ड्रायव्हर ला मारहाण करून पळवून नेला होता मात्र कर्जत पोलिसांनी काही तासात हा ट्रक ताब्यात घेण्यात यश मिळविले असले तरी चारही चोर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या अहमदनगर सोलापूर महामार्गावरील … Read more

शिर्डी मतदारसंघात विकास कामातून लोखंडे यांचे ‘वलय’ !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून निवडून आल्यावर जनता हीच आपली कवचकुंडले मानून पक्ष विरहीत कामाचा झपाटा खासदार सदाशिव लोखंडे यांनी करून सांगेल त्याचे काम व मागेल त्याला निधी देऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकास कामे उभी करत आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या विश्रांतीतही आपल्या कार्यकर्त्यांची काळजी … Read more

माझ्या नवऱ्याने अल्पवयीन मुलीशी लग्न केले…

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :   पतीने अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याची फिर्याद बायकोनेच दाखल केल्यामुळे नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे.पती,सासू,सासऱ्यासह नऊ जणांविरुद्ध बाल विवाह प्रतिबंधित कलमानुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नेवासा पोलीस स्टेशनला संगिता माहदु खेमनर ( वय 30 वर्षे) रा साकुर ता संगमनेर(हल्ली अमळनेर ता.नेवासा) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले ‘इतके’ करोना रुग्ण

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  नगर जिल्ह्यात आज आणखी ०६  रुग्ण वाढले आहेत. आज आढळले रुग्ण नगर शहर आणि रहाता तालुक्यातील आहेत. शहरातील रेल्वे स्टेशन येथील २८ वर्षीय महिला, शाहूनगर, केडगाव येथील ३४ वर्षीय महिला आणि गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर येथील ४८ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण. याशिवाय, राहाता येथील ४० वर्षीय, ५६ वर्षीय … Read more

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली की, त्यांना वाईट वाटतं

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 : कुठल्याही परिस्थितीत राज्यातील सरकार अडचणीत यावं, यासाठी ते देव पाण्यात घालून बसले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली की, त्यांना वाईट वाटतं, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी भाजपवर केली. कोरोना आढावा बैठकीनंतर मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, … Read more

संकट काळात राष्ट्रवादी पक्ष जनतेच्या पाठीशी

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : पुरोगामी विचार व विकासाचा अजेंडा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळे असतित्व निर्माण केले. संकट काळात जनतेच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच उभा राहिला आहे. कोरोनाच्या संकटकाळात कोकणात आलेल्या चक्रीवादळाने अनेक नागरिक उघड्यावर आले. त्यांचे आश्रू पुसण्यासाठी शरद पवार साहेब स्वत: त्यांच्या भेटीला गेले. जाणता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात होणार राजकीय भूकंप

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : शिवसेना नगरसेवक व काही प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पक्ष प्रवेश करणार असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. या वृत्तास आमदार नीलेश लंके यांच्या विश्वासू सहकाऱ्यानी दुजोर दिला आहे. जर काही कारणनामुळे   वर्धापनदिनी प्रवेश झाले नाही, तरी महिनाभरात  पारनेकरांना हि धक्कादायक बातमी ऐकण्यास जरूर  मिळेल, असेही … Read more

यापूर्वी  शेतक-यांना न मागताच पाणी मिळत होते !

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : माजी मंत्री प्रा.राम शिंदे हे १० वर्षे आमदार होते. पाच वर्षे आमदार असताना पाण्यासाठी संघर्ष केला आणि नंतरचे पाच वर्षे ते मंत्री होते आणि आमचे सरकार होते. त्या काळात कुकडीचे पाणी हे शेतक-यांना मागणी करण्यापूर्वीच मिळत होते. आणि पाचही वर्षे त्यांनी ते  सोडले. मात्र आता कुकडीचे आवर्तन न मिळाल्यामुळे कर्जत … Read more

आ.विखे पाटील यांच्‍यामुळे शेतक-यांना दिलासा !

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :  शासन निर्णयाप्रमाणे पुर्नगठीत झालेल्‍या कर्जावर सुरु ठेवलेली व्‍याजाची आकारणी माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी घेतलेल्‍या पुढाकारामुळे जिल्‍हा सहकारी बॅंकेस स्‍थगित करावी लागली. यामुळे कोरोना संकट आणि चक्रीवादळाचा फटका बसलेल्‍या शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टंचाईग्रस्‍त गावांमधील शेतक-यांना दिलासा देण्‍यासाठी शासनाकडुन पिककर्जाचे पुर्नगठन करुन समाना पाच हप्‍त्‍यात रुपांतर केले … Read more

‘त्या’ नुकसानीस आ.रोहित पवार जबाबदार

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कुकडीचे आवर्तन न मिळाल्यामुळे कर्जत तालुक्‍यातील शेतकर्‍यांच्या नुकसानिस  लोकप्रतिनीधी या नात्याने आमदार रोहित पवार जबाबदार आहेत. अशी टीका भाजपचे प्रमुख नेते अशोक खेडकर यांनी केली आहे. कुकडीचे पाणी न मिळाल्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी भरडला गेला आहे. स्थानिक आमदार नवखे असले, तर त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी एकाच तालुक्यातील 3 कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवशी एकाच तालुक्यातील ३ महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे. या तीनही महिला संगमनेर तालुक्यातील आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात आता कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे. या तीनही कोरोनाबाधीत महिलांचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला आहे. … Read more