गोविंदाने ४९ व्या केले होते ‘हिच्या’ सोबत दुसरे लग्न

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-गोविंदाने हिंदी सिनेमासृष्टीवर चांगलेच वर्चस्व गाजवले. गोविंदाचे चाहता वर्गही खूप मोठा आहे. परंतु चाहत्यांना धक्का बसेल अशी एक बातमी समोर आली आहे. गोविंदाने ४९ व्या वर्षी दुसरे लग्न केले होते. पण गोविंदाने दुसरे लग्न दुसरे कोणासोबत नव्हे तर त्याच्या पत्नीसोबतच केले होते. त्यामुळे जास्त आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गोविंदाचे … Read more

मोठी बातमी : बाळासाहेब थोरात यांचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात !

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकीय स्थित्यंतरे होण्याचे संकेत आहेत. नाना पटोले यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तर विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांना विराजमान करण्याचा विचार काँग्रेस गोटामध्ये सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सध्या मंत्रिमंडळातही आहेत. महसूलमंत्री पद त्यांच्याकडे आहे. शिवाय काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे. … Read more

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आज २५९८ ने वाढली, वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज  ६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ हजार ५४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे … Read more

केंद्राकडून निधीच आलेला नाही; महाविकास आघाडीचे प्रत्युत्तर

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-कोरोनाच्या संकटाच्या काळात मदतीवरून रकजीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने राज्याला कशी मदत केली, याची माहिती दिली. परंतु आता सत्ताधाऱ्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणताही स्वतंत्र निधी आला नाही फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे. फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीला उत्तर … Read more

धक्कादायक! पोलिसठाण्यात मुलीने केली आईविरोधात मारहाणीची तक्रार

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-सानपाडा सेक्टर -१९ परिसरात रहाणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीने आपल्या आईविरोधातच मारहाणीची तक्रार सानपाडा पोलिसांत दिली आहे. या घटनेतील ११ वर्षीय पीडित मुलगी आई-वडील व लहान बहिणीसह सानपाडा सेक्टर-१९मध्ये राहण्यास आहे. ही मुलगी सहावीत असून तिने तकरारीमद्धे म्हटले आहे की, आई विनाकारण मारहाण करत असल्याची तक्रार तिने सानपाडा पोलिसांकडे केली. … Read more

डॉक्टरांना ठेवण्यात आलेल्या हॉटेलला भीषण आग

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-मुंबईतील धोबी तलाव परिसरात असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये 25 डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या हॉटेललाच मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही. परंतु स्थानिक लोकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन … Read more

‘देशातील तीस टक्के रुग्ण महाराष्ट्रात तरी मंत्री म्हणतायेत सगळं आलबेल’

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सर्वांत उत्तम कोरोना हाताळणी झाली असे म्हणत आहेत. परंतु ‘देशातील तीस टक्के रुग्ण महाराष्ट्रात तरी मंत्री म्हणतायेत सगळं आलबेल आहे असे कोणत्या आधारावर म्हणतायेत ते अद्याप कळाले नाही. अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास अघाडीच्या मंत्र्यांनी घेतलेल्या … Read more

नव्या लॉकडाऊनबाबत जयंत पाटलांचे सूचक विधान; ते म्हणतात…

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत आला आहे. आता पाचव्या टप्प्यात लॉकडाऊन वाढवण्याबाबत जयंत पाटील यांनी सूचक विधान केले आहे. २९ तारखेला आम्ही लॉकडाऊनच्या स्थितीचा आढावा घेऊ. बरीच स्थिती आटोक्यात असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जिथे कोविड रुग्ण नाहीत किंवा अगदी कमी आहेत, तिथेले व्यवहार सुरळीत करण्याबाबत विचार करू असे पाटील म्हणाले. पण … Read more

लॉकडाऊन 5.0 चे संकेत; ‘ही’अकरा शहरे राहू शकतात बंद

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याने देशभरात जवळपास चार टप्प्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. चौथ्या टप्प्यात बऱ्यापैकी सूट देण्यात आली. परंतु आता महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता पाचवा लॉकडाऊन करण्याचे संकेत केंद्राने दिले आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्येही साथ आटोक्यात आलेली नसल्याने हा पाचवा लॉकडॉऊन राज्याच्या स्वयंस्फूर्तीने करण्याचा निर्णय … Read more

पूरपरिस्थिती अभ्यासासाठी नेमलेल्या वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर

मुंबई दि.२७:- गतवर्षी भीमा व कृष्णा खोऱ्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचे विश्लेषण करणारा वडनेरे समितीचा अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला. पूरप्रवण भागात पूर नियंत्रणासाठी व भविष्यकालीन उपाययोजनांसाठी नक्कीच या अहवालाचा उपयोग होईल. असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी समितीचे अध्यक्ष जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्री वडनेरे,अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी,  सचिव राजेंद्र … Read more

राज्यात कोरोनाच्या ३७ हजार १२५रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई, दि.२७: राज्यात आज कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५६ हजार ९४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत … Read more

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी युनियन बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे ३० लाख

मुंबई दि.27: ‘कोरोना’च्या लढ्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे 30 लाख रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19’साठी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे क्षेत्रीय सरव्यवस्थापक एम. व्यंकटेश यांनी आज मंत्रालयात मदतीचा डिमांड  ड्राफ्ट सुपूर्द केला.  यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक राजीव मिश्रा, मुंबईचे उप महाव्यवस्थापक अशोक दास उपस्थित होते. ‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध … Read more

नागवडे नेमके कुणाचे? थोरात की विखेंचे?

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- एकेकाळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे व वडिलांनी त्यांची हयात काँग्रेसमध्ये घालवली अशा राजेंद्र नागवडे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यांचा हा निर्णय समर्थकांना रुचला नाही. त्यांचे वडील बापूंनी ज्याच्याविरोधात राजकारण केले, त्याच व्यक्तीचा विधानसभेत प्रचार केल्याने निष्ठावंतांनी त्यांना काहीसे दूर केले होते. तेव्हापासून संभ्रमात … Read more

क्वारंटाईन केलेले रात्री घरी झोपायला जातात,अहमदनगरच्या ‘या’ नेत्याने केले विधान

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- क्वारंटाईन केलेले लोक फक्त म्हणण्यापुरतेच क्वारंटाईन झालेले आहेत. प्रत्यक्षात रात्री ते झोपायला आपापल्या घरी जातात, असे विधान खासदार सुजय विखे यांनी केले. कर्जत तालुक्यातील राशीन येथे आयोजित आढावा बैठकीत डॉ. विखे बोलत होतो. त्यांनी डॉक्टर म्हणून सल्ला देत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासकीय गोष्टींवरही भाष्य केले. कोल्हापूरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांच्या … Read more

कोरोना : कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून १० लाख रुपयांची मदत

जळगाव, दि. 27 (जिमाका) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून 10 लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार अनिल पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा पोलीस … Read more

लॉकडाऊन शिथिल करताना विषाणूचा पाठलाग अधिक गांभीर्याने करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि २७:  आज ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ज्या जिल्ह्यांत रुग्ण नव्हते तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एकीकडे राज्याचे अर्थचक्र सुरु करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते आहे हे लक्षात घेऊन विषाणूचा पाठलाग जास्त गांभीर्याने करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

कापूस खरेदीला वेग देण्याचे पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे निर्देश

अमरावती : कापूस खरेदीला वेग देण्यासाठी ८ खरेदी केंद्रांवरील जीनची संख्या १८ वरून २५ पर्यंत वाढली असून त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाला जिल्हा प्रशासनाकडून पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला वेग येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेऊन कापूस खरेदी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी … Read more

कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली माहिती

पुणे – विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या, प्रतिबंधित क्षेत्र सद्यस्थिती, रुग्णसंख्या लक्षात घेता बेड क्षमता नियोजन व सोलापूर जिल्ह्यातील रुग्णवाढ व उपचार व्यवस्था, संस्थात्मक विलगीकरण व्यवस्था तसेच प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली. राज्यातील कोरोना बाबत शासनाच्या वतीने सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता … Read more