इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक

मुंबई दि २७:- सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात आपली फसवणूक होऊ नये यासाठी सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केले आहे. अनेक जण बऱ्याचदा चुकून किंवा अन्य कुतूहलापोटी पोर्नोग्राफिक वेबसाईटवर क्लिक करतात व कालांतराने त्यांना एक मेसेज वा धमकीवजा ई-मेल येतो की, ज्यात … Read more

लॉकडाऊनच्या काळात ४३३ सायबर गुन्हे दाखल; २३४ जणांना अटक

मुंबई दि.२७-लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबरसंदर्भात ४३३  गुन्हे दाखल झाले असून २३४ व्यक्तींना अटक केली आहे़, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली. राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४३३ गुन्ह्यांची (ज्यापैकी २६ N.C आहेत) … Read more

पावसाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांची कापूस खरेदी करा

वर्धा : आणीबाणीच्या  काळात शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण शासन अवलंबित असून लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा बराच कापूस शिल्लक राहिलेला आहे. हा सर्व कापूस पावसाळा सुरु होण्यापुर्वी विक्री होणे आवश्यक आहे. यासाठी कापूस खरेदी केंद्राने रोज किमान १०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा. पणन महासंघाने ग्रेडर उपलब्धता वाढवून संकलन केंद्रावर असलेल्या कापूस गाठी व सरकीची उचल करावी, अशा सूचना पालकमंत्री … Read more

महाराष्ट्रातून ६९६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय कामगार स्वतःच्या राज्यात

मुंबई दि.२७- महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दि.२७ मे पर्यंत जवळपास ९ लाख ८२  हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ६९६ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन … Read more

मजूरांना रोहयोची कामे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा

यवतमाळ : अडकलेल्या नागरिकांना स्वगृही जाण्याची परवानगी मिळाल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक आले आहेत. यात मजूरांचाही समावेश आहे. ‘ मागेल त्याला काम’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तसेच बाहेरून आलेल्या मजूरांना रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासून योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मग्रारोहयोच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. … Read more

खते, बियाणे थेट बांधावर उपलब्ध करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अकोला –  खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात खते, बियाणे व अन्य कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत ह्या निविष्ठा पोहोच करण्यासाठी शेतकरी गटांमार्फत यंत्रणेने पोहोच करुन द्यावी,  शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत बियाणे खतांची कमतरता भासू देऊ नका, असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यंत्रणेला दिले. अकोला येथे खरीप हंगाम २०२० च्या विभागीय जिल्हा … Read more

कृषी निविष्ठा थेट बांधावर

अकोला – कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अकोला अंतर्गत कोरोना विषाणूच्या संकटकाळी ‘कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या दारी’ या ब्रीद वाक्यानुसार,  शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे कृषी निविष्ठा थेट पुरवठा बाबत खते व बियाणे वाटप राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कृषी  निविष्ठा वाहनास कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे कृषी निविष्ठा थेट पुरवठा … Read more

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.२७- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २५४ घटना घडल्या. त्यात ८३३ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २६ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख १५ हजार ७२३ गुन्हे नोंद … Read more

राज्यात मे महिन्यात आतापर्यंत २८ लाख ३७ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई,दि.२७ :-  राज्यात १ ते २६ मे पर्यंत ८३० शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २८ लाख ३७ हजार ७९४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून १ ते २६ मेपर्यंत  राज्यातील १ कोटी ४६ लाख १५ हजार १७० शिधापत्रिका धारकांना ६७ लाख ४५ हजार ४००  क्विंटल … Read more

राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना

मुंबई दि. 27:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या सर्व दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही कापूस खरेदी दि. 15 जूनपर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. आज मंत्रालयातून राज्यातील कापूस खरेदीबाबत जिल्हाधिकारी, डीडीआर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे आढावा  घेऊन संवाद साधला, त्यावेळी सहकारमंत्री श्री. … Read more

बचत गटांचे ‘मास्क’ देताहेत सुरक्षित श्वास!

कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क गरजेचा आहे. आज घराबाहेर पडणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो. मात्र मास्क वापराची जनजागृती करीत असताना जाणविले की ग्रामस्तरावर मास्कचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यामुळे तालुकास्तरावरुन बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देऊन त्यांची उपजीविका साधण्याचा सुवर्णमध्य जिल्हा परिषदेने साधला. प्रबोधन करणाऱ्या वर्गाला मास्कची आवश्यकता : कोरोनापासून बचाव कसा करावा याबाबत प्रबोधन करण्यासाठी … Read more

जैविक विविधता संवर्धन व विकास, मानव जातीसाठी भविष्यात तारणहार ठरणार

आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिन 22 मे रोजी जागतिक स्तरावर दर वर्षी साजरा करण्यात येतो. जागतिक स्तरावर कोविड -19 रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सामूहिक स्वरुपात न होता आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिन हा या वर्षी मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात आला आहे . या दिनाचे महत्त्व, वन विभागामार्फत राज्यात जैविक विविधता कायदा व नियम याची अंमलबजावणी व त्यानुसार … Read more

माता रमाईंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिवादन

मुंबई, दि. २७ – महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांची ‘सावली’, वंचित बांधवांची ‘माऊली’ माता रमाईंच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केले आहे. माता रमाई यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात,  माता रमाई म्हणजे दिनदुबळ्यांची आई, त्यागाची मूर्ती, माता रमाईंनी प्रचंड कष्ट, गरीबीचे चटके सहन करत डॉ. बाबासाहेबांना समर्थ साथ दिली. डॉ. … Read more

पंडित नेहरुंनी रचलेल्या भक्कम पायावरच आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई. दि. २७ – देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा हा पंडितजींनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर खंबीरपणे उभा आहे, याचं स्मरण करुन मी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं … Read more

वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांची अध‍िसूचना जारी

मुंबई, दि. 27 – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६  या कायद्यामध्ये  महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रासंदर्भात काही सुधारणा केल्या  आहेत. भारतीय संव‍िधानाच्या पाचव्या अनुसूचीमधील प्राप्त अधिकारांचा वापर करुन राज्यपालांनी  दिनांक १८ मे २०२० रोजी एका अधिसूचनेव्दारे उपरोक्त कायद्याच्या कलम ६ मध्ये या सुधारणा केल्या आहेत. वन … Read more

सत्‍तेत सहभागी असलेल्‍या कॉंग्रेसची अवस्‍था डबल ढोलकी सारखीच – विखे पाटील

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-  सत्‍तेत सहभागी असलेल्‍या कॉंग्रेसची आवस्‍था ‘डबल ढोलकी सारखीच’ झाली आहे. निर्णयाचे आधिकार नसतील तर सत्‍तेत राहाता कशाला? बाहेर पडण्‍याची हिम्‍मत दाखवा. राज्‍यातील निर्माण झालेल्‍या आवस्‍थेला शिवसेना, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस बरोबरच राज्‍यातील कॉंग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्‍याचा आरोप माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. कॉंग्रेस नेते खा.राहुल गांधी यांनी केलेल्‍या … Read more

महाराष्ट्रात २ जूनला बरसणार मान्सूनपूर्व पाऊस

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-हवामान खात्याने बळीराजाची सुखद बातमी दिली आहे.१ किंवा २ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचप्रमाणे यंदा राज्यात मान्सून सरासरीपेक्षा अधिक बरसणार आहे. सध्या महाराष्ट्र उष्णतेच्या लाटांनी होरपळून निघाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील कमाल तापमानाने ४५ अंशांचा आकडा गाठल्याने नागरिकांसाठी हे … Read more

चिंताजनक! रुग्णालयांची शवागृहे भरली; रुग्णांमध्ये भीतीचे सावट

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-मुंबईत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रुग्ण संख्या वाढतच चालली असून मृत्यू दरातही वाढ होत आहे. त्यामुळे आता एक वेगळीच चिंता उभी राहिली आहे. मृतांची संख्या वाढत असल्याने शवागृहे भरत चालले असून केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने रुग्णालय प्रशासनाला मृतदेह कॉरिडॉरमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. रुग्णांमध्ये भीती वाढत चालली आहे. केईएम रुग्णालयाच्या … Read more