कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिका वाढवणार

पुणे दि.२६: कोरोना साथीमुळे रुग्णांची वाढती संख्या व रुग्णवाहिकांची मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकांची संख्या व उपलब्धता वाढवणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. पी एम पी एल व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पी एम पी एल च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती नयना गुंडे, सह व्यवस्थापक … Read more

५ जूनपूर्वी सर्व नोंदणी धारकांचा कापूस खरेदी करणार – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी लॉकडाऊन कालावधीत 20 ते 30 एप्रिल 2020 दरम्यान कापूस विक्री नोंदणी केली होती. त्यापैकी शिल्लक असलेल्या एकूण 17 हजार 500 वैध नोंदणी धारकांचा कापूस 5 जून 2020 पूर्वी खरेदी केला जाईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीनंतर झालेल्या आढावा बैठकीत … Read more

खरीप हंगामासाठी खते, बियाण्यांची कमतरता भासणार नाही – कृषिमंत्री दादाजी भुसे

जळगाव.दि.26 (जिमाका)  राज्य शासनाने राज्याच्या कृषी विभागाकडे त्यांच्या मागणीपेक्षाही जास्त खते तसेच बियाणे पुरवठा केला असल्याने शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी खते तसेच प्रमाणित बियाण्यांची कमतरता भासणार नाही  एवढेच नाही तर  शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खते तसेच बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. कोणत्याही खते आणि बियाणे विक्रेते दुकानदारांनी खतांचा किंवा बियाण्यांचा तुटवडा आहे … Read more

शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना कागदपत्रांचा अडथळा नको

चंद्रपूर, दि. 26 : या वर्षीच्या कोरोना संकटात संपूर्ण राज्याचे अर्थकारण, जीवनावश्यक अन्नधान्याची उपलब्धता ही खरीपातील पिकावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना कागदपत्राचे कारण पुढे करून त्यांची बोळवण करण्यात येऊ नये. प्रसंगी महसूल विभाग आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करेल. त्यामुळे शंभर टक्के कर्जवाटप झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन … Read more

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३० हजार पास वाटप

मुंबई, दि.२६ – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४,३०,६७० पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५६५,७२६ व्यक्तींना क्वॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २५ मे या कालावधीत कलम १८८ नुसार ११५,२६३ गुन्हे नोंद झाले असून २३,२०४ व्यक्तींना अटक करण्यात … Read more

तातडीच्या द्वितीय अपील, तक्रारी दाखल करण्याबाबत अर्जदारांना आवाहन

मुंबई, दि.२६ : कोविड – १९ विषाणूच्या संसर्गामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अर्जदारास जीवित वा स्वातंत्रसंदर्भात अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यासंदर्भात राज्य माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘महत्त्वाची पत्र’ या सदरात दि.२१.०५.२०२० रोजीच्या सूचनेन्वये करावयाची प्रक्रिया प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या अर्जदारांना तातडीच्या द्वितीय अपील / तक्रारी दाखल करावयाच्या असतील त्यांनी दि.२१.०५.२०२० च्या सूचनेतील प्रक्रियेचा अवलंब करावा, असे … Read more

परदेशातील २५९४ नागरिक महाराष्ट्रात परत

मुंबई दि. २६ :  वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत २५९४ नागरिक आले असून या सर्वांच्या क्वारंटाईनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात  आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. वंदे भारत अभियानांतर्गत २० फ्लाईटसच्या … Read more

राज्यात मे महिन्यात आतापर्यंत ६५ लाख ८० हजार ३३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई, दि. २६ :  राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 ते 25 मे पर्यंत राज्यातील 1 कोटी 44 लाख 75 हजार 735 शिधापत्रिकाधारकांना 65 लाख 80 हजार 330 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच 27 लाख 28 हजार 502 शिवभोजन थाळ्यांचे  वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा … Read more

पारनेर मध्ये पुन्हा मुबंईहुन आलेल्या व्यक्तीचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील जामगाव येथे मुबंईहुन आलेल्या वृद्ध व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा वृद्ध व्यक्ती संपूर्ण कुटुंबासह दि 12 रोजी मुंबई येथून आपल्या गावी आला होता. काल दि 25 रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने खासगी दवाखान्यात दाखल केले … Read more

रेड झोनमधून येणाऱ्या लोकांमुळे कोरोना वाढतोय

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-मुंबईसारख्या रेड झोनमधून येणाऱ्या लोकांमुळे नगर तालुक्यातील वाकोडी, निंबळक या गावांत सोमवारी कोरोना रुग्ण सापडले. पत्नीला भेटायला वाकोडीला आलेली ४२ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली. ही व्यक्ती छुप्या मार्गाने आली. गावात आल्यानंतर क्वारंटाइन न होता घरी वास्तव्यास होती. मुंबईमधून निंबळक येथे आलेली ३० वर्षीय गरोदर महिलाही बाधित असल्याचे निष्पन्न झाले. … Read more

आमच्यावर पुन्हा अन्याय होणार असेल, तर रस्त्यावर उतरावे लागेल !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदे व इतर शेवटच्या भागात उशिरा पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन पाणी टंचाई दूर करण्यासाठी कुकडी डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाचे आवर्तन तातडीने सोडावे. कोरोनाच्या संकट काळात शांत बसावे लागत आहे. म्हणून आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. आमच्यावर पाण्याच्या बाबतीत पुन्हा अन्याय होणार असेल, तर प्रसंगी रस्त्यावर … Read more

शनी जयंती साजरी करणाऱ्या उपस्थितांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिजयंती उत्सव पार पडला. परंतु तेथील शनिजयंती ही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाली नसून त्या देवस्थान प्रशासनाने जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन करून त्याची सीसी टीव्ही फुटेज तपासून कारवाईची मागणी देवस्थानचे विश्वस्त यांनी उपविभागीय पोलिस अधीक्षक शेवगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. शनिशिंगणापूर येथील शनिजयंती साडेसातीच्या फेऱ्यात सापडली आहे. … Read more

रस्त्यावर सापडलेले मांडूळ पुन्हा निसर्गात मुक्त

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल इंद्रायणी जवळ औरंगाबाद रस्त्यावर सापडलेले मांडूळ पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आले. सागर गायकवाड, नीलेश गुंजाळ, अक्षय सातपुते यांना रस्त्यावर एक मांडूळ साप आलेला दिसला. त्यांनी त्यास तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये आणले. एपीआय किरण सुरसे व पोलिस नाईक अविनाश वाघचौरे यांनी या बाबत वन विभागाचे फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी … Read more

पाहुण्यांमुळे अहमदनगर कोरोनामुक्त होऊ शकलेले नाही…

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. परंतु हा आजार शहरी भागात होता. ग्रामीण भागात याचा शिरकाव झालेला नव्हता ही समाधानकारक बाब होती. परंतु मजुरांच्या स्थलांतरानंतर मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अनेक गावांनी तर शहरातून आलेल्यांना गावाबाहेरच विलगीकरणाची सोय केली आहे. नगर जिल्ह्य़ात कोरोनाग्रस्तांची संख्या ७५ झाली … Read more

तापमान पोहोचले ४५ अंशावर; जाणून घ्या शरीरावर काय होईल परिणाम

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-देशातील काही राज्यांत उष्णतेची भयंकर लाट आली आहे. तापमानाचा पारा आता चाळीशी पार करू लागला आहे. परंतु हे तापमान वाढलं की त्याचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो हेही जाणून घेणे गरजेचे आहे. मानवी शरीराचं सामान्य तापमान 98.4 डिग्री फारेनहाइट म्हणजे 37.5 से 38.3 डिग्री सेल्सियस असतं. याचा अर्थ 40 … Read more

संतापजनक! शिक्षकांना ‘डिलिव्हरी बॉय’चं काम;संघटना आक्रमक

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-लॉक डाउनच्या काळामध्ये शिक्षकांना प्रशासनास सहकार्य करण्याच्या हेतूने विविध कामे करण्यास दिली होती. अगदी रेशन दुकानावरील नोंदीचे काम ते चेक पोस्टवर ड्युटी असे विविध कामे शिक्षकांनी केली. परंतु आता बीडच्या शिक्षकांना किराणामालाची होम डिलिव्हरी देण्याचे काम देण्यात आल्याने संघटना आक्रमक झाली असून हे काम मागे घेण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. … Read more

राज्यात कोरोनाने थैमान,राज्यपालांच्या भवनात राजकीय हालचालीना वेग !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. ठाकरे सरकार या विरुद्ध चांगलेच कंबर कसून लढत आहे. परंतु याच काळात काहीतरी राजकीय शिजत असल्याचा वास येत आहे. त्याच कारणही तसेच आहे. कारण राज्यपालांच्या भवनात राजकीय हालचालीना वेग आला आहे. विविध नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी … Read more

ठाकरे सरकारचे खरे फिल्ड मार्शल हे अजित दादाच !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी अजित दादा कुठं आहेत? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार कायम प्रशासनाच्या संपर्कात आहेत. बैठका, चर्चा आणि उपाययोजनांसाठी पराकाष्टा करत अजित पवार आपल्या कामात स्वत:ला झोकून देत आहेत, अजित पवार हेच खरे सरकारमधील फिल्ड मार्शल आहेत’ असे सांगत आमदार कपिल … Read more