‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या तत्पर प्रयत्नामुळे आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला

मुंबई दि:२४- महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या तत्पर प्रयत्नामुळे पश्चिम बंगालमधील एका आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला असल्याची घटना नुकतीच घडली. याबाबतची अधिक माहिती अशी, महाराष्ट्र सायबर विभाग हा २४ तास covid-19 संदर्भात समाज माध्यमावर निगराणी ठेवून आहे. यादरम्यान त्यांना इन्स्टाग्रामवर  एक मुलगी आत्महत्या करणार असल्याची पोस्ट आढळून आली. ही बाब … Read more

लॉकडाऊनच्या काळात ४१३ सायबर गुन्हे दाखल; २२३ जणांना अटक

मुंबई दि.२४- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४१३ गुन्हे दाखल झाले असून २२३ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र … Read more

रमजान ईदनिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई, दि. 24: ईद-उल-फितर तथा ‘रमजान ईद’ आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करणारा पवित्र सण आहे. आज आपला ‘कोरोना’विरुद्ध लढा सुरु आहे, तो आपण अजून जिंकला नसला तरी निर्णायक टप्प्यावर आहे. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करावी आणि गळाभेटीऐवजी फोनवरुन नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान … Read more

राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ६०० रुग्णांना घरी सोडले

मुंबई, दि.२४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा!

मुंबई, दि. २४ : इस्लाममध्ये पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आणि स्थान आहे. परंतु यावर्षीचा रमजान कोविड-१९  संकटाच्या सावटाखाली आल्यामुळे महिनाभर मुस्लिम बांधवांनी घरीच प्रार्थना करुन सरकारी नियमांचे पालनही केलेले आहे. आता रमजान ईदलासुद्धा घराबाहेर न पडता घरातच ईद साजरी करावी आणि समाजापुढे एक आदर्श घालून द्यावा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. … Read more

महाराष्ट्रातून ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले

मुंबई दि.२४-महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आज दि.२४ मेपर्यंत सुमारे ७ लाख ३८  हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ५२७ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने कामानिमित्त महाराष्ट्रात आलेले देशातील … Read more

कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे निर्देश

अमरावती, दि. 24 : अमरावती शहरात कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. त्यानुसार महापालिकेकडून कंटेनमेंट व इतर परिसरासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत.   सद्यःस्थितीत कोविड-19 या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात, विशेषत: अमरावती शहरात वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेकडून … Read more

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख १५ हजार पास वाटप

मुंबई दि.२४ –  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख १५ हजार ५९१ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख १९ हजार १६८ व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २३ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ … Read more

सीएसआर निधीतून जे.जे. रुग्णालयाला पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते ५० व्हेंटिलेटर सुपूर्द

 मुंबई. दि. २४ : औद्योगिक समूहांच्या औद्योगिक सामाजिक बांधिलकी (C.S.R)निधीच्या माध्यमातून वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातोय. याचाच एक भाग म्हणून ‘ अमेरिकन इंडिया फाऊंडेशन’ ने दिलेले ५० व्हेंटिलेटर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते आज जे. जे. रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आले. पालकमंत्री श्री.शेख यांच्या प्रयत्नांतून जे.जे. रुग्णालयाला हे व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. याविषयी पालकमंत्री … Read more

ईद-उल-फित्रनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील  नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.   राज्यातील सर्व नागारिकांना, विशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना ईद-उल-फित्रनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना व परोपकाराला महत्त्व दिले आहे. यंदा कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत परोपकाराचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. यावर्षी ईद घरी राहून तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन करतो. ही … Read more

संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे

मुंबई दि. २४: संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. हा संस्कार आपण पाळत असून त्यावर अधिक भाष्य न करता आपण आजघडीला जनतेच्या आरोग्यावर आलेले संकट दूर करण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना जनहितासाठी कृषी, शिक्षण, उद्योग  आणि अर्थ या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

पाच वर्षांच्या ‘गुडिया’ची कोरोनावर मात!

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : लहान असो वा वयस्क सर्वांचाच कोरोनाने पिच्छा पुरविला आहे. मोठ्या शहरांमध्ये, तर कोरोनाचे साम्राज्य आहे. अशा परिस्थितीत मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील पाच वर्षाच्या ‘गुडिया’ ने कोरोनाशी चिवट झुंज दिली. मुंबई येथून गावाकडे आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली ही मुलगी बुलडाणा येथे कोविड केअर सेंटरला दाखल होती. या गुडियाने कोरोनावर मात करीत आज सर्वांना सुखद धक्का … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज

मुंबई, दि.24: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज  मिळणार आहे. याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय देखील जारी केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना सहकारमंत्री श्री. पाटील म्हणाले,  … Read more

रमजान ईदनिमित्त राज्यातील जनतेला मंत्री नवाब मलिक यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४: राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ईद-उल-फितर (रमजान ईद) निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच पठण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मंत्री श्री. मलिक म्हणाले, कोरोना विषाणूच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी राज्यात मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. या … Read more

चिंताजनक! मुंबई-पुण्यात 4.85 लाख लोक होम क्वारंटाइन

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढतच चालले आहे. प्रशासनाने विविध उपाययोजना योजूनही रुग्ण वाढतच आहे. मुंबई, उपनगरं आणि पुण्यात तर हे प्रमाण वाढते आहे. धक्कादायक म्हणजे काल दिवसभरात तब्बल २ हजार 608 रुग्ण नव्याने वाढले आहेत. मुंबई-पुण्यात 4 लाख 85 हजार 323 लोक होम क्वारंटाइन करण्यात आली आहेत. तर महाराष्ट्रात … Read more

धक्कादायक: चौथ्या मजल्यावरुन सरपटत येऊनही कोरोनासंशयितास मिळाली नाही रुग्णवाहिका

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-कल्याण पूर्वेतील भागात धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना संशयितांची कशापद्धतीने हाल सुरु आहेत हे यातून अधोरेखित होते. येथील कोरोना संशयित वृद्ध दवाखान्यात जाण्यासाठी चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली आला परंतु त्यास येईपर्यंत आलेली रुग्णवाहिका निघून गेली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महापालिकेकडे 33 रुग्णवाहिका आहे. त्यापैकी काही रुग्णवाहिका महापालिकेच्या आहे. … Read more

मुंबईच्या तरुणाने दिली मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी मुंबई उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. 8828453350 या क्रमांकावरून गुरुवारी रात्री 12.32 वाजता उत्तर प्रदेश 112 हेल्प डेस्कच्या 7570000100 या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. पोलिसांनी तातडीने चौकशी करत धमकी देणाऱ्यास अटक केली आहे. … Read more

अजित पवारांविषयी संजय राऊत यांनी वापरले ‘हे’शब्द

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- विधानपरिषद निवडणुकीवेळी झालेल्या शाब्दिक युद्धामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन या कटुतेला तिलांजली दिली. या भेटीमुळे संजय राऊत चांगलेच चर्चेत होते. या भेटीनंतर संजय राऊत यांनी अजित पवारांविषयी केलेल्या एका उल्लेखाने … Read more