अहमदनगर ब्रेकिंग : 3 कोरोनाबाधित झाले कोरोनामुक्त,आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज …

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली असून आज १५ व्यक्तीचे घशातील स्त्रावांची तपासणी करण्यात आली. त्यातील १० अहवाल निगेटीव आले असून एका अहवालाचा निष्कर्ष निघाला नसून उर्वरित ०४ व्यक्तींचे अहवाल पुन्हा तपासले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान, आज … Read more

अभिनेते अनिल कपूर यांची ‘अशी’ आहे भन्नाट लव्हस्टोरी

मुंबई बॉलिवूड वर आपल्या आवाजाने आणि अभिनयाने अधिराज्य गाजवणारे अभिनेते अनिल कपूर यांची १९ मे ला मॅरेज अँनिव्हर्सरी होती. या निमित्ताने त्यांनी त्यांची व त्यांच्या पत्नी सुनीता कपूर यांची केमिस्ट्री कशी जुळली अर्थात त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल माहिती दिली. ते म्हणतात, त्यांच्यासाठी वेडिंग अॅनिव्हर्सरीपेक्षा प्रपोजल अॅनिव्हर्सरी अधिक महत्वाची आहे. आम्ही वेडिंग अॅनिव्हर्सरीसोबतच प्रपोज केलेला दिवस प्रपोजल … Read more

पुण्यात कोरोनाचा कहर: रुग्ण संख्या 5 हजारांवर

पुणे: महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाने जास्त धुमाकूळ घातला आहे. मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यात कोरोनाचा जास्त प्रसार झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात सर्वाधिक नवे कोरोनाबधित आढळले. ३५८ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांचा आकडा आता ५ हजार 167 झाला आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता आणल्याबरोबर पुण्यात रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. दिवसभरात पुण्यात तब्बल 291 रुग्णांची वाढ झाली. 15 … Read more

आज आकाशात काळे कावळेसुद्धा दिसले नाहीत; संजय राऊतांची भाजपवर बोचरी टीका

मुंबई/प्रतिनिधी सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार चांगल्या पद्धतीचे कार्य करत आहे. कोरोनाशी खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र लढत आहे. परंतु कोरोना व्हायरसशी लढण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याचा आरोप करत भाजप महाराष्ट्र बचाव आंदोलन करत आहे. संजय राऊत यांनी यावर बोचरी टीका करत म्हटले आहे की ” भाजपचे हे आंदोलन पूर्णत: फसलेलं आहे. हे फक्त भाजप … Read more

कोरोनाशी लढणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरचा बळी

पुणे सध्या वैद्यकीय पथक कोरोनाशी लढण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहे. परंतु आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला. हे 56 वर्षीय डॉक्टर गेले काही दिवस कोरोनाशी लढत होते. पण त्यांची झुंज अपयशी ठरली.पुण्यात डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू होण्याची पहिलीच घटना आहे. ते ससून रुग्णालयात होते भरती होते. … Read more

जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची कोरोनाच्या भितीने आत्महत्या

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- माजी खासदार डॉ दत्ता सामंत यांचे वडील बंधू, कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष दादा सामंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. शुक्रवार (22 मे) रोजी बोरीवलीत त्यांची मोठी मुलगी गीता प्रभू यांच्या घरी त्यांनी आत्महत्या केली.शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या … Read more

राज्यभरात आतापर्यंत १२ हजार ५८३ रुग्णांना घरी सोडले

मुंबई, दि.२२ : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ८५७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात … Read more

राज्यात ५ हजार ९७५ अनुज्ञप्ती सुरू

मुंबई, दि. 22 : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजूरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5 हजार 975 अनुज्ञप्ती सुरू सुरू आहेत. आज दिवसभरात 30 हजार 624 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

पुणे, दि.22 : कोरोना संकटासंदर्भातील सर्व शक्यतांचा अभ्यास करून भविष्यातील उपाययोजनांचे काटेकोर नियोजन करा. ‘कोरोना’शी लढण्यासाठी योग्य नियोजन करत सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. … Read more

साईनगर शिर्डी येथून रेल्वेने १ हजार १०४ कामगार कुटुंबियांसह बिहारकडे रवाना

शिर्डी, दि.22: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि कोपरगांव तालुक्यातील बिहार राज्यातील 1 हजार 104 कामगार व त्यांचे कुटुंबिय आज साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने बिहारकडे रवाना झाले. यामध्ये  राहाता व पिंप्री निर्मळ येथे शिक्षण घेणाऱ्या 86 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या कामगारांचा स्वगृही परतण्याचा खर्च राज्य शासनाने केला असून रेल्वे … Read more

रेशनकार्ड नसलेल्या गरीब,गरजू नागरिकांसाठी अन्न सुरक्षा योजनेत दहा टक्के कोटा वाढवून द्यावा – मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

नाशिक, दि. २२ (जिमाका) : देशात व राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर गरीब व गरजू नागरिकांना मोफत व स्वस्त अन्नधान्य देण्यात येत आहे. सध्याची  परिस्थिती व निर्माण होणारी बेरोजगारी पाहता येणाऱ्या काळात ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. रेशनकार्ड नसलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्राला दहा टक्के कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी … Read more

लॉकडाऊनमध्ये अडकलेले ४१ हजार ६९८ मजूर रेल्वेने स्वगृही रवाना

अलिबाग, जि.रायगड,दि.२२ (जिमाका) : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा व राजस्थान या राज्यातील तब्बल ४१ हजार ६९८ मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही सुखरुपपणे पाठविण्यात आले. आतापर्यंत उत्तरप्रदेशकरिता १०, मध्यप्रदेशकरिता ५, झारखंडकरिता-५, बिहारकरिता-५, ओरिसाकरिता व राजस्थानकरिता-१ रेल्वे सोडण्यातआल्या आहेत. स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या … Read more

वनमंत्र्यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांसोबत व्हीसीद्वारे चर्चा

यवतमाळ, दि.२२ : पश्चिम घाट जैव विविधता संरक्षण संदर्भात केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या या बैठकीला वनमंत्री संजय राठोड हे जिल्हाधिकारी कार्यालयातून उपस्थित होते. तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या व्हीसीद्वारे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पश्चिम घाटाचे … Read more

राज्य सरकारला बदनाम करण्याचा भाजपच्या नेत्यांचा डाव फसला

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी आटापीटा करणार्‍या भारतीय जनता पक्षाचे आज हसे झाले आहे. वारंवार राजभवनच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजपा नेत्यांनी आतातरी स्वत:च्या अंगणात म्हणजेच मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. भाजपाच्या फसलेल्या आंदोलनाचा समाचार … Read more

‘छुट्टीयों का मजा’ने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत

अमरावती, दि. 22 : कोरोना‍ विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आदिवासी विभागाच्या सर्व आश्रमशाळा बंद आहेत. शैक्षणिक कालावधी पूर्ण झालेला नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ  नये, यासाठी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने ‘छुट्टियों का मजा’ ही कार्यपुस्तिका तयार केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. सध्या राज्यातील विविध प्रकल्प कार्यालयातर्फे ई-लर्निंगच्या … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 22 : कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा संघर्षमय अध्याय संपला आहे. दादांचं नेतृत्वकौशल्य, संघर्षांची नोंद घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या कामगार चळवळीचा इतिहास अपूर्ण आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामगार नेते दादा सामंत यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवंगत कामगार नेते दादा … Read more

मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

मुंबई, दि. २२ : ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा कु.साईशाचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करतांना मुख्यमंत्री सहायता निधीत ११ हजार १११ रुपयांची मदत जमा केली आहे. श्री.परब यांनी मदतीचा हा धनादेश नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. कोरोना विषाणूविरुद्ध लढतांना राज्यातील व्यापारी, उद्योजक, कॉर्पोरेटर्स, स्वंयसेवी संस्था … Read more

मुलगा रुद्रप्रतापच्या वाढदिवसानिमित्ताने ललिता बाबर आणि डॉ.संदीप भोसले यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस केली ५० हजार रुपयांची मदत

मुंबई : भारतीय महसुली सेवेत कार्यरत असलेले डॉ.संदीप भोसले आणि रिओ ऑलिम्पिकची फायनल गाठणारी मराठमोळी धावपटू ललिता बाबर या दाम्पत्याने आपल्या मुलाच्या म्हणजे रुद्रप्रताप ऊर्फ शंभुराजे याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० हजार रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आभार आणि शुभाशिर्वाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुद्रप्रतापला त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभाशिर्वाद दिले आहेत तसेच भोसले-बाबर दाम्पत्याने … Read more