‘थँक्यू थोरात साहब’ म्हणत परप्रांतीय मजुरांकडून कृतज्ञता व्यक्त

शिर्डी,दि.20 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजुरांची कामे बंद झाली. यामुळे या बंद काळात अनेक मजुरांनी गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. या सर्वांना मदत व्हावी यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या जेवण व प्रवासाची व्यवस्था केली. संगमनेर येथून 1662 परप्रांतियांनी त्यांच्या गावी पोहोचल्यानंतर तेथून ‘थँक्यू थोरात साहब’ असे म्हणत महसूलमंत्री बाळासाहेब … Read more

कोरोना लढाईत मनोरंजन क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

मुंबई दि २०: शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते, कलाकार यांच्याशी ते आज संवाद साधत होते. … Read more

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सर्व विभागप्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी – पालकमंत्री

ठाणे दि. 20 – ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू दर लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व मनपा क्षेत्रात व ग्रामीण भागात  लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे  यांनी दिले. ठाणे  जिल्हाधिकारी  कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक … Read more

यंदाचे वर्ष ‘कृषि उत्पादकता वर्ष’ म्हणून साजरे करणार; शेतीसाठी खते, बियाणे व पीक कर्ज थेट उपलब्ध करुन देणार

नाशिक दि. 20 मे : येणाऱ्या काळात कृषी मालाची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार असून कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ती अधिक तीव्रतेने जाणवणार आहे, त्यामुळे 2020 वर्ष हे ‘कृषी उत्पादकता वर्ष’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. तसेच खते, बियाणे व त्याच बरोबर शेतकऱ्यांना लागणारे पीक कर्ज थेट उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री … Read more

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामे करा – पालकमंत्री

अमरावती, दि. 20 : क्वारंटाईन सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या नागरिकांना परिपूर्ण सुविधा मिळाव्यात. क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरेशी स्वच्छता, आवश्यक साधने उपलब्ध असली पाहिजेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामे करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज … Read more

कोरोनाविरुध्द लढाईत माजी सैनिकही सरसावले

देशाच्या सीमेवर लढताना आपला नेमका शत्रू कोण हे सैनिकांना माहीत असते. परंतु देशात एका अदृश्य शत्रुने आक्रमण केले आहे, त्यांचे नाव कोरोना.. गेल्या दोन महिन्यापासून डॉक्टर्स, पोलीस, महसूल विभाग, सफाई कामगार या कोरोनाविरध्दच्या लढाईत अहोरात्र झटत असताना देशाच्या रक्षणासाठी ज्या सैनिकांनी लढा दिला, ते माजी सैनिकही अदृश्य शत्रुरुपी कोरोनाविरुध्दच्या लढाईत पुढे सरसावले आहेत. पुणे ग्रामीणचे … Read more

‘त्या’ मूकबधीर भगिनीला घरी पोहोचविण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्र्यांची धडपड

अमरावती, दि. 20 : जिल्हा रूग्णालयात दाखल एका मूकबधीर महिलेचे घर शोधून काढण्यासाठी आधार प्रणालीचा व आवश्यक त्या सर्व पर्यायांचा वापर करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. या महिलेच्या व्यथेची दखल घेत श्रीमती ठाकूर यांनी आज इर्विन रुग्णालयाला भेट देऊन तिचे मूळ घर शोधण्याच्या प्रयत्नांना … Read more

क्वारंटीनसाठी खासदारांनी दिले स्वत:चे घर

कोल्हापूर, दि. २० : निगेटिव्ह अहवालानंतर कराड येथून रुकडीत परतणाऱ्या विद्यार्थ्याला खासदार धैर्यशील माने यांनी स्वत:चं घर देवून ‘आपुलकी गृह’ या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून आज केली. आपुलकी गृहाच्या माध्यमातून गावातील भाऊबंदकीतील कडवटपणा संपवून बंधूभाव वाढीस लागेल हा संदेश या निमित्ताने खासदार श्री. माने यांनी दिला. प्रत्यक्ष कृतीतून स्वत:चं घर देणारे देशातील पहिले खासदार असतील. रेड … Read more

उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक

मुंबई, दि. २०: राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले असून त्यांनी आज नाशिक आणि ठाणे येथे बैठक घेऊन खरिपाचा आढावा घेतला. दरम्यान, उद्या दि. २१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी १२ वाजता ही बैठक होईल. … Read more

राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध

मुंबई, दि.२०: राज्यात यापुढे आठ ते दहा दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. कोविड-१९ या विषाणूच्या झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपुरवठा, पीपीई कीट, मास्क याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी उत्पादकांसोबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते. या … Read more

‘त्या’ खुनातील आरोपीस जामीन मंजूर

पुणे : कुख्यात वाळू माफिया गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे.अप्पा लोंढे वाळू तस्करीत सक्रिय होता. २०१५ मध्ये लोणीकाळभोरमध्ये त्याचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात विष्णू यशवंत जाधव यास अटक केली होती. परंतु सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून किरकोळ तसेच गंभीर गुन्ह्य़ातील आरोपींना जामीन देण्यात … Read more

पिंपरी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक खुशखबर आहे. या लोकांना आता सातवा वेतन अयोग्य लागू होणार आहे. राज्य शासनाने विविध अटी, शर्तीसह सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भात दिलेली मंजुरी विचारात घेऊन पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुधारित वेतनश्रेणी व भत्ते लागू करण्यास मंगळवारी मान्यता दिली. पिंपरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातवा आयोग लागू करण्याची मागणी केली होती. … Read more

शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविणारे अमृतराव गोंदकर यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  शिर्डीच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व श्री. अमृतराव मुरलीधरराव गोंदकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. सध्याच्या आरोग्यविषयक राष्ट्रीय आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत त्यांचा अंत्यविधी निवडक नातेवाईक, स्नेही मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला. शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविण्याचा त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यात सर्वप्रथम ज्या दोन स्थानिक … Read more

दयावान खाकी ! गरजूंसाठी देतात १५ लाख जेवणाची पाकिटे

पुणे : पोलीस प्रशासन सध्या स्वतःच्या जीवावर उदार होऊन कोरोनाग्रस्तांचे संरक्षण करत आहेत. या खाकीचा आणखीन एक कौतुकास्पद मुद्दा समोर आला आहे. पोलिसांनी गरजूंना आतापर्यंत जेवण तसेच खाद्यपदार्थ मिळून १५ लाख १७ हजार ७८८ पाकिटांचे वाटप केले आहे. ‘सोशल पोलिसिंग सेल’ या कक्षाच्या माध्यमातून हे जेवण पुरविले जाते. आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या संकल्पनेतून या … Read more

श्रमिकांना पोहोच करण्यासाठी पुण्यातून दररोज ११ रेल्वे निघणार

पुणे : लॉकडाऊनमुळे संबंध महाराष्ट्रात परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून आलेले मजूर अडकून पडले. या मजुरांनी घरी जाण्यासाठी पायी जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर शासनाने श्रमिकांना परराज्यात पाठवण्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली. शासनाने यातील नियमावलीत आणखीन सुधारणा करत संबंधित राज्याची पूर्वपरवानगी घेण्याचा मुद्दा कॅन्सल केला आहे. त्यामुळे आता पुण्यात अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी दररोज ११ रेल्वे गाडय़ा … Read more

संतापजनक! खासगी कोविड रुग्णालयांकडून रुग्णांची लूट

नवी मुंबई एकीकडे प्रशासन, महापालिका कोरोनारुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटत असताना एक संतापजनक गोष्ट समोर आली आहे. नवी मुंबईत खासगी कोविड रुग्णालये कोरोना रुग्णांची अवाजवी लूट करत आहेत. या रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांना किमान दीड ते दोन लाख रुपये खर्च येत आहे. कोरोना उपचारांसाठी राज्य सरकार तसेच मुंबई-ठाणे या पालिकांनी दरनिश्चिती केली असतानाही नवी मुंबई महापालिका … Read more

मुंबईत कोरोनाचा कहर: रुग्णसंख्या 22 हजार 563 वर

मुंबई महाराष्ट्रात मुंबई आणि पाठोपाठ पुणे या शहरांमध्ये रुग्ण संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. अनेक उपाययोजनेनंतरही मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ होताच आहे. आणखी 1411 नव्या रुग्णांची भर पडली असून मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 22 हजार 563 वर पोहोचला आहे. मुंबईत मृत झालेल्या 43 जणांमध्ये 29 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. यातील 32 रुग्णांना … Read more

धक्कादायक! 100 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण गायब

मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट निवारण्यासाठी सध्या प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. कोरोनाची चाचणी घेताना संबंधित व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता इत्यादी गोष्टी घेतल्या जातात. परंतु काहींनी चुकीची माहिती दिल्याने ज्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याला सोधण्याचं आव्हान मुंबई महापालिका प्रशासनासमोर आहे. एकीकडे मुंबईत कोरोनाग्ररस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. यामुळे आधीच महापालिका प्ररशासनासमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं … Read more