मुंबई ,पुण्यातील स्थलांतरितांनी वाढविली ग्रामीण भागाची भीती

बुलडाणा 18 मे 2020 :-लॉक डाऊन सुरु झाल्यानंतर आता अनेक नागरिक आपल्या घराकडे प्रवास करत आहे. परंतु पुणे आणि मुंबई मध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला असल्यामुळे  या ठिकाणावरून ग्रामीण भागात येणाऱ्या  लोढ्यांमुळे ग्रामीण भागात दहशत निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भाग आता कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मुंबईहून आलेल्या … Read more

आता एक्स-रे मार्फत होईल कोरोनाव्हायरसचं निदान

नाशिक 18 मे 2020 :-कोरोनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सध्या प्रशासन सज्ज आहे. संशयितांची घसा आणि नाकातील स्वॅब नमुने घेतले जातात आणि त्यांची चाचणी करून सध्या कोरोनाचे निदान केले जात आहे. आता याला एक्स-रे चा पर्याय येऊ शकतो. यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचेल. नाशिकमधील ईएसडीएस या आयटी कंपनीनं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे. ज्यामुळे फक्त एक्स-रे … Read more

मुंबईतील रेड झोनमधून परतले चालक आणि प्रशासनास केले ‘असे’ सहकार्य !

मुंबई 18 मे 2020 : लॉकडाऊनमध्ये अडकले नागरिक सध्या मिळेल त्या साधनाने आणि असेल त्या परिस्थितीमध्ये गावाकडे चालले आहेत. परंतु त्यांच्या अशा बेकायदेशीर प्रवासामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. अनेक नागरिक प्रशासनाला सहकार्य करताना दिसत नाही. परंतु नवादामधील कोशी गावात राहणाऱ्या चालकांनी एक आदर्श निर्माण केला आहे. हे 10 चालक मुंबईतील रेड झोनमधून आल्यानंतर आपल्या … Read more

मजुरांच्या बसला अपघात;3 ठार 22 जखमी

यवतमाळ 18 मे 2020 :- कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे देशातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे रोजंदारीवर जगणा-या स्थलांतरित मजूरांनी गावचा रस्ता धरला आहे. असाच गावी जाण्यासाठी निघालेल्या मजुरांच्या बसचा यवतमाळमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 प्रवासी जागीच ठार झाले असून 22 व्यक्ती जखमी झाल्या आहेत मजुरांना त्यांच्या गावाला … Read more

चिंताजनक: मुंबईत एका दिवसात वाढतायत हजार रुग्ण

मुंबई 18 मे 2020 :- मुंबईत कोरोनाने चिंताजनक परिस्थिती केली आहे. अनेक उपाययोजनांच्या अम्मलबजावणीनंतरही कोरोना आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. मागील २४ तासांमध्ये १ हजार १८५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत मृतांची एकूण संख्या आता ७५७ इतकी झाली आहे. मागील २४ तासांत तब्बल ५०४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने आरोग्ययंत्रणेला काहीसा हुरूप आला आहे. मुंबईत करोना … Read more

चिंताजनक! कोरोनाने कोट्यवधी लोक होऊ शकतात बेरोजगार

वॉशिंग्टन: कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. मागेपुढे यावर लस येऊन हा आजार बारा होईलही. परंतु याह परिणाम दीर्घकाळ जगाला भोगावा लागणार आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अमेरिकेतील कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. यामुळे जवळपास कोट्यवधी लोक बेरोजगार होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सद्य … Read more

आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, दि.१८ :-  कोरोना विषाणू प्रादुर्भावा नंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेही नियमित शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशा रितीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा. शाळा सुरु झाल्या नाही. तरीही शिक्षण सुरूच राहील. यासाठी शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन करा, … Read more

रब्बी हंगामातील अट रद्द करून सरसकट मका खरेदीस परवानगी द्या

नाशिक, दि.18 (जिमाका) : किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदी करण्यासाठी खरीप-रब्बी अशी अट रद्द करून केंद्र सरकारने सरसकट सर्व मका खरेदीस परवानगी द्यावी,  अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला. … Read more

समग्र शिक्षा अभियान : मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणास शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. 18;  महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती मार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्‍या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या इ. १ ली ते इ. १२ वी च्‍या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्‍ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या वर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत 5कोटी 73 लाख 30 हजार269 पाठ्यपुस्‍तके आणि बाजारातील … Read more

चार दिवसांत ६२ हजार ९१६ ग्राहकांना घरपोच मद्य विक्री

मुंबई दि.18:  राज्यात 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत गेल्या चार दिवसात 62 हजार 916 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. 15 मे 2020 रोजी 5,434 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास आली. तर 16 मे 2020 रोजी 8,268 ग्राहकांना, … Read more

रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या सूचनेला यश; मनरेगासाठी देश पातळीवर अतिरिक्त ४० हजार कोटींची तरतूद

मुंबई दि.18 : शहरांमधून गावाकडे स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावात मागणीनुसार काम उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने त्यांची नोंदणी करणे, त्यांना रोजगार पत्रक उपलब्ध करून देणे व त्यांना मागणीनुसार काम देणे यासाठी नियोजन करण्याची सूचना राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केंद्र सरकारला सुचविले होते, या मागणीला यश आले असून  केंद्र सरकारने राष्ट्रीय … Read more

दोन हजार कुटुंबांची जेवण व पाण्याची व्यवस्था : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची सामाजिक बांधिलकी

मुंबई, दि.१८ : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाडहून आपापल्या राज्यांकडे निघालेल्या स्थलांतरित मजूर व त्यांच्या कुटुंबियांची जेवण व पाण्याची सोय करुन सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे. टाळेबंदीमुळे सध्या देशातील उद्योगधंदे ठप्प आहेत. रोजगाराच्या निमित्ताने देशातल्या शहरी भागांमध्ये स्थिरावलेल्या स्थलांतरित मजुरांपुढे त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येकाला … Read more

एकाच दिवसात कोरोनाचे ७४९ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि.१८: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. आज २०३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या … Read more

हरित उद्योगासाठी उद्योजकांनी पुढे यावे, अटीशर्तींशिवाय मान्यता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि. १८:   कोरोना विषाणूला प्रतिबंध करताना अर्थचक्र सुरु राहावे यासाठी रेडझोन वगळता ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही उद्योग व्यवसायांना मान्यता देण्यात आली आहे. आजघडीला ७० हजार उद्योगांना परवानगी देण्यात आली असून ५० हजार उद्योग सुरुही झाले आहेत. ५ लाख कामगार काम करत आहेत. हे चक्र अधिक गतिमान करताना महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नव्याने भरारी … Read more

CM Uddhav Thackeray Live Updates : लॉकडाऊन केला नसता तर काय झालं असतं याचा विचार करवत नाही…

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन – 4 ची कालपासून सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. Live Updates साठी पेज रिफ्रेश करा  रेड झोन हा लवकरात लवकर रेड झोन करणं ही दोन आव्हानं आहेत, ग्रीन झोन कोरोनामुक्त ठेवायचा आहे मनुष्यबळ कमी पडत असेल तर … Read more

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साधला कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी संवाद

जळगाव, (जिमाका) दि. 18 : कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचे 279 रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथील सामान्य रुग्णालयातून जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला व तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर या सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मनोधैर्य … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि.18 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.

रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे एका चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि 18: “बाल नाट्य ते भयकथा असा विस्तृत पट आपल्या लेखणीतून  साकारणारे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक,चित्रकार, आस्वादक, विज्ञानवादी रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे, एका चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. “मतकरी यांच्या रंगभूमीवरील बहुमूल्य योगदानाचा गौरव, राज्य शासनाच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराने करण्यासाठी, मार्च … Read more