रत्नाकर मतकरींच्या निधनाने महाराष्ट्राने बहुआयामी ‘रत्न’ गमावले! : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. 18 : ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक बहुआयामी ‘रत्न’ गमावले आहे. त्यांच्या निधनाने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत. मतकरी हे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकारही होते. त्यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, … Read more

महाराष्ट्राचं साहित्य, कला, सांस्कृतिकविश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्व हरपलं

मुंबई, दि. 18 :- ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्व हरपलं असून साहित्यिक, रंगभूमी, सांस्कृतिक क्षेत्रातलं रत्नाकर मतकरी यांचं योगदान चिरंतन राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणाले, रत्नाकर मतकरी यांच्या … Read more

कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १० हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.१८- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १०  हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४० घटना घडल्या. त्यात ८१९ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १७ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख १० हजार १४० गुन्हे नोंद … Read more

महाराष्ट्राचे साहित्य’रत्न’ निखळले

मुंबई, दि. 18 :- महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अमूल्य असे साहित्य ‘रत्न’ निखळले अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे. ते साहित्य विश्वातले अमूल्य असे रत्न होते.  त्यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ … Read more

मानवतेच्या जाणिवेतून राबवित असलेला ‘डिक्की’चा उपक्रम स्तुत्य

णे, दि. 18 : कोरोनाच्या संकटामुळे टाळेबंदीमध्ये अडकलेले मजूर, कामगार, बेघर नागरिक तसेच विद्यार्थी यांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत, या मानवतेच्या जाणिवेतून  ‘डिक्की’ तर्फे गरीब गरजूंसाठी करण्यात आलेल्या अन्न वितरण व्यवस्थेचा उपक्रम हा स्तुत्य असल्याचे अपर पोलीस आयुक्त डॉ.अशोक मोराळे यांनी सांगितले. यावेळी  दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष डॉ.मिलिंद कांबळे, राजेश बाहेती, भारत आहुजा, राजू वाघमारे, महेश राठी, चेतन पटेल हे उपस्थित … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे ‘नगरसेतू ॲप’ विकसित

सोलापूर, दि.18:- मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन किराणा, भाजीपाला फळे तसेच  औषधे, मिनरल वॉटर, हॉस्पिटल उपचार इत्यादी माहितीसाठी व खरेदीसाठी नगरसेतू मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांची व ग्राहकांची चांगली सोय होत आहे. नगरसेतू मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेणे एकदम सोपे आहे. अँड्रॉइड मोबाइल फोनच्या माध्यमातून ॲप डाऊनलोड करून घेऊन ग्राहकांना आवश्यक … Read more

क्वारंटाईनचा कोल्हापुरी पॅटर्न : निगेटिव्ह अहवालानंतर घरीच सोय; घरचे सदस्य राहणार भावकीत

कोल्हापूर, दि. 18  : रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरणात राहावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. यावर उपाय म्हणून खासदार धैर्यशील माने हे गावच्या सुरक्षिततेसाठी आणि गावच्या सहकार्यातून नवा कोल्हापुरी पॅटर्न विकसित करत आहेत. निगेटिव्ह अहवालानंतर संबंधितांची त्यांच्या घरीच राहण्याची सोय करायची आणि घरातील सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी … Read more

दुध उत्‍पादक शेतक-यांच्‍या प्रश्‍नांबाबत आ.विखे पाटील यांचेे मुख्‍यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- सहकारी आणि खासगी असा भेदभाव न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रति लिटर ५ रुपये अनुदान देवून दिलासा द्यावा अशी मागणी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांकडे केली आहे. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्य़ातील दुध संकलन केंद्रचालक आणि दूधसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांच्या … Read more

कोरोना प्रतिबंध : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाणून घेतली केरळची यशोगाथा

मुंबई, दि. १८: कोरोना प्रतिबंधासाठी केरळ राज्याने कशा प्रकारे उपाययोजना राबविल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केरळच्या आरोग्यमंत्री  के. शैलजा यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. केरळमधील लोकसंख्येची घनता तेथील भौगोलिक, सामाजिक रचना आणि महाराष्ट्राची रचना यात बऱ्यापैकी अंतर आहे. मात्र केरळच्या आरोग्य विभागाकडून जे काही अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले … Read more

शहीद धनाजी होनमाने यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

पंढरपूर, दि.18 : गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तालुक्यातील पोरयकोटी- कोरपर्शी  जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने शहीद झाले. त्यांच्यावर आज मूळ गावी पुळूज येथे शासकीय इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुळूज ग्रामस्थांनी व उपस्थितांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. कोरोना विषाणूमुळे सामाजिक अंतराचे पालन करीत गावकरी अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. आज … Read more

क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय धावपटू कु.ज्योती चव्हाण हिला आर्थिक सहाय्य

नागपूर, दि. 18 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील आंतरराष्ट्रीय धावपटू कु.ज्योती चव्हाण या खेळाडू समोर उदरनिर्वाहचा प्रश्न उपस्थित झाला. तिला कुटुंबाचा निर्वाह करणे कठीण झाले. या परिस्थितीत तिला क्रीडा कौशल्य टिकवून ठेवण्यासाठी पोषक आहाराकरिता तातडीची मदत म्हणून नागपूर जिल्हा क्रीडा परिषद खात्यातून 25 हजार रुपयाचा धनादेश क्रीडा … Read more

मनरेगातून विकासकामांसह रोजगारनिर्मितीला चालना

अमरावती, दि. 18 : लॉकडाऊनचा पार्श्वभूमीवर विविध भागात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामांना सुरुवात केली असून, वैयक्तिक लाभाच्या तसेच सामूहिक विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. गत दोन आठवड्यात या मनुष्यबळ उपस्थितीत लक्षणीय वाढ झाली आहे. आजमितीला जिल्ह्यात 668 ग्रामपंचायतींमध्ये  तीन हजारांवर कामे सुरू असून, 67 हजार 27 मनुष्यबळ उपस्थिती आहे, असे … Read more

राज्यात ५ हजार १८९ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती सुरू

मुंबई दि.18 : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीपैकी 5 हजार 189 अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात … Read more

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनंतर तेलंगणात अडकलेले २८ कामगार स्वगावी रवाना

चंद्रपूर दि. 18 मे : लॉकडाऊनच्या काळामध्ये जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील अनेक कामगार तेलंगणामध्ये अडकलेले होते. त्यापैकी आज दुपारी 2 वाजता गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील 28 कामगार चंद्रपुरात दाखल झाले होते ते आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे सूचनेनंतर एसटी बसने त्यांच्या स्वगावी पोहोचविण्यात आले. तेलंगणा राज्यातून आलेले कामगार हे गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यातील असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या ठिकाणाहून त्यांच्या स्वगावी परत जाण्यासाठी एसटी बसची … Read more

लॉकडाऊन काळात ३९५ सायबर गुन्हे दाखल; २११ जणांना अटक

मुंबई दि. १८ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली असून राज्यात ३९५ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन … Read more

शून्य गाठलाय… आता हवा निश्चय!

आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून अखेरचा कोविड रुग्ण संसर्गमुक्त होऊन बाहेर पडत असताना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त आनंद दिसत होता आणि ते स्वाभाविक देखील होते. करोनाविरुद्धच्या या युद्धातील पहिल्या टप्प्यात त्यांनी यश मिळवून 19 रुग्णांना त्यापासून दूर नेत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले होते. साधारण एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात पहिला कोविड रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यात काळजीचे वातावरण निर्माण … Read more

सर्व-समन्वयाने-नाशिक-जिल

वर्धा, दि. 18  : एकाच दिवशी 3  कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या वर्धा जिल्ह्यात आज जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या संकल्पनेतून घरी रहा कोरोना  योद्धा व्हा हे  विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. यामध्ये  जिल्हाधिकारी यांच्याप्रमाणेच खासदार,  आमदारांसोबतच  इतर लोकप्रतिनिधींनी सुद्धा गृह विलगीकरणातील कुटुंबांच्या घरी भेट देऊन घरी रहा कोरोना योद्धा व्हा, असे आवाहन केले. इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती कोरोना बाधित आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर  गृह विलगीकरणातील व्यक्तींनी बाहेर … Read more

सर्व समन्वयाने नाशिक जिल्ह्याची स्थिती नियंत्रणात

नाशिक, दि. 18 : गेल्या दहा-पंधरा दिवसातील चांगल्या प्रयत्नांमुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. कोरोना विरोधातील लढाई ही दीर्घकाळ चालणारी आहे, येणाऱ्या काळात कोरोना रुग्ण दाखल होतील त्यासोबतच ते कोरोनामुक्त होत राहतील, ही निरंतर चालणारी प्रक्रिया असेल. त्यामुळे कोराना विरोधातील लढा त्यासोबतच सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन व्यवहार व अर्थकारण सुरु ठेवण्यासाठी … Read more