राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा विचार !

मुंबई देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून महाराष्ट्रात कोरोनाने आपले थैमान सुरूच ठेवले आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा विचार सुरु केला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे ,पुणे, औरंगाबाद व इतर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 25,922 रुग्णसंख्या होती. … Read more

लाजिरवाणे! लॉकडाऊनच्या काळातही मुंबईत वाढल्यात वाहन चोऱ्या

मुंबई मुंबईचा आजपर्यंतचा संकटांचा इतिहास पहिला तर असं दिसून येत की कोणतंही संकट असो मुंबईकर एकमेकांना साथ देत या संकटातून बाहेर पडलेले आहेत. परंतु या कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनच्या काळात मुंबईत लाजिरवाणी गोष्ट घडली आहे. या काळात मुंबईत वाहनचोरीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात वाहनचोरीच्या घटनांमध्ये जास्त वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार ‘ही’ शपथ !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवार, दि. १८ मे रोजी दुपारी १ वाजता विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ … Read more

माजीमंत्री राम शिंदेनी सांगितले उमेदवारी न मिळाल्याचे कारण !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- पक्षांतर्गत कोणत्याच वादावर कधीही जाहीर भूमिका न घेणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी देखील या विषयावर सोशल मिडीयातून आपली नाराजी व्यक्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत वेळी पक्षाने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे आदी नेत्यांना उमेदवारी डावलण्यात आली होती तेव्हापासून पक्षांमध्ये अंतर्गत वाद … Read more

श्रमिक विशेष रेल्वे १४५६ मजुरांसह उत्तरप्रदेशकडे रवाना

कोल्हापूर, दि. 14 : उत्तरप्रदेशकडे 1 हजार 456 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने आज दुपारी 1 वाजता कोल्हापुरातून रवाना झाले. भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! चा नारा देत या मजुरांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. उत्तरप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने करवीर (ग्रामीण) मधील 1276, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 114, हातकणंगले तालुक्यातील 60 आणि … Read more

सेवा अधिग्रहित केल्यानंतर गैरहजर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

मालेगाव : कोरोना विषाणूमुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असल्याने त्याला प्रतिबंध घालण्यासाठी विविध अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करून उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. परंतु सेवा अधिग्रहित करूनही गैरहजर कर्मचाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्याचे निर्देश इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत. … Read more

‘कोरोना’मुक्तीच्या ‘आशा’ !

हल्ली दिवस उजाडायचा आधीच ‘ती’ उठलेली असते…घरादारातील सारं आवरून ‘ती’ घराबाहेर पडते…तोंडावर मास्क…पर्समध्ये आणखी जास्तीचे मास्क ठेवते कारण…कोणाकडे नसला तर ती मास्कही देतेय…सोबत पेन आणि नोंदवही…पाण्याची बाटली असते…होय, ‘ती’ हल्ली पहाटेच घर सोडतेय…अनेक उंबरे झिजवतेय…भाऊ, दादा, ताई, अक्का म्हणत…जनजागृती करतेय…कधी गावातल्या गावात…तर कधी कोस-दोन कोस दूरच्या वाड्या-वस्त्यांवरहीगावातही जाते…स्वच्छतेचा, स्वत:सह परिवाराचा बचाव करण्याचा आणि एकूणच जगण्याचा … Read more

धक्कादायक : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ, वाचा जिल्हानिहाय तपशील

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. आज १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत … Read more

गरिबांच्या स्वयंपाकाला ‘उज्ज्वला’चा गॅस..!

बुलडाणा, दि. 14 : कोरोना विषाणूच्या थैमानानंतर सर्वत्र खळबळ उडाली. शासनाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे अनेक नागरिकांचा रोजगार थांबला, परिणामी दोन वेळच्या जेवनाचे काय? असा प्रश्न उभा राहिला. त्याची झळ गरीब कुटूंबांना बसत असल्याचे लक्षात येताच शासन उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या मदतीला धावून आले. शासनाने एप्रिल, मे व जून महिन्याकरिता योजनेच्या … Read more

विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका … Read more

मान्सूनपूर्वी कापूस खरेदी करण्याचे नियोजन करा

नागपूर, दि. 14 : कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील लांबलेल्या कापूस खरेदीला सुरुवात करण्यात यावी. जून महिन्यात सुरु होणाऱ्या मान्सूनच्या आगमनापूर्वी कापूस खरेदीचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, कापूस पणन महासंघाचे सरव्यवस्थापक जे. पी. महाजन उपस्थित होते. यावेळी सूर्यलक्ष्मी कॉटन मिलमधील कामगारांचे  वेतन व भत्ते अदा करण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश … Read more

जिल्हा ‘कोरोना’मुक्त राहण्यासाठी नियोजन करा : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

चंद्रपूर, दि. 14  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुदैवाने कोरोना आजाराचा अधिक प्रादुर्भाव नाही. त्या दृष्टीने आपले नियोजनही उत्तम आहे.मात्र सध्या मोठ्या प्रमाणात मजूर, कामगार, विद्यार्थी यांचे रेड झोन मधून येणे-जाणे होत आहे. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी. जिल्हा कोरोना मुक्त राहील अशा प्रकारचे आपले नियोजन असावे, अशी सूचना राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, … Read more

ऑनलाईन बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि. १४: बालकांचे ऑनलाईन लैंगिक शोषण हा अतिशय संवेदनशील विषय असून याबाबत सर्वांनी एकत्रितरित्या काम करून बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची आणि ऑनलाईन महाजालातील बालकांच्या लैंगिक विषयाशी संबंधित बाबींना कायद्याच्या चौकटी खाली आणण्याची आवश्यकता महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’ यांच्या … Read more

‘अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ मोहिमेचे सर्वेक्षण अचूक करा – पालकमंत्री

अमरावती :  कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी संपूर्ण जिल्ह्यात  ‘अमरावतीकर, मात करुया करोनावर’ ही मोहीम राबविण्यात येत असून, मोहिमेचा तिसरा टप्‍पा  सुरु करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण अचूक असावे व त्यातून एकही व्यक्ती सुटणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. त्याचप्रमाणे, जिल्ह्यात रूग्णालये व आरोग्य सेवा अद्ययावत व सुसज्ज करण्याबाबत परिपूर्ण आराखडा करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. मोहिमेत घरोघरी जाणाऱ्या … Read more

बच्चू कडू चेहरा लपवून चालले होते प्रतिबंधित क्षेत्रात,पोलिसांनी केले असे काही…

राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शहरातील फतेह चौकातून प्रतिबंधित क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस शिपायांनी बच्चू कडू यांना अडवून आतमध्ये जाण्यास विरोध केला. नंतर लक्षात आले की, बच्चू कडू यांनी हे ‘स्टिंग ऑपरेशन’ केलं आहे. झालं अस, अकोल्यातील कमटेन्मेंट झोनमध्ये फिजिकल डिस्टसिंगचा बोजवारा उडाल्याचं चित्र गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्यात पहायला मिळालं. या … Read more

लॉकडाऊनच्या काळात ३७९ गुन्हे दाखल २०७ लोकांना अटक

मुंबई दि. १४ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३७९ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या ३७९ गुन्ह्यांची नोंद … Read more

पोलिसांवर हल्ल्यांच्या २१८ घटना ७७० व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि.१४ :  राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ६  हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २१८ घटना घडल्या. त्यात ७७० व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १३ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,०६,५६९ गुन्हे नोंद झाले असून २०,१९५ … Read more

रुग्णांना सर्वोत्तम सेवा द्या – पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला,दि.१४(जिमाका)-  कोविडबाधीत  रुग्ण हा मनाने खचलेला असतो.  त्या रुग्णाला  उत्तम उपचार देतानाच जेवण, औषधे, सेवा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक बळ देऊन  सर्वोत्तम सेवा द्या,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले. अकोला जिल्ह्यातील कोरोना फैलावाबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज … Read more