कोविड हॉस्पिटलला खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली भेट

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या सिव्हिल हॉस्पिटलला अहमदनगर दक्षिण चे खासदार डॉ, सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. कोरोनच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी याठिकाणी करण्यात आलेल्या वैद्यकीय उपाययोजनांची तसेच इतर सर्व बाबींची पाहणी केली व आढावा घेतला. अहमदनगर मधील नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापन सुसज्ज … Read more

आता राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा जास्त प्रसार झाला आहे. सर्वात जास्त रुग्ण राज्यात आहेत. याच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री … Read more

कोठडीतून पळून गेला,आणि मंदिरात जावून लपला.. अखेर पोलिसांनी अटक केलीच !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस कोठडीतील पळून गेलेला आरोपी प्रविण पोपट गायकवाड यास गुरूवारी पहाटे पाच च्या दरम्यान महादेवाच्या मंदीरातून झोपलेला अवस्थेतच अचानक छापा टाकून ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री पारनेर ग्रामीण रूग्णालयातुन पोलिसांच्या हाताला झटका देवुन पळालेला आरोपी प्रविण उर्फ मिठु पोपट गायकवाड याला वडनेर हवेलीच्या डोंगरावरील महादेव मंदिरातुन गुरूवारी … Read more

आता महाराष्ट्रात तैनात होणार सशस्त्र दल

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिति आणखीनच बिकट होत चालली आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल , अर्ध सैन्य बलाच्या तुकड्या तैनात होणार आहेत. 20 तुकड्या महाराष्ट्रात तैनात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत केंद्राकडे मागणी केली होती. त्याचा बहुतेक सकारात्मक विचार केंद्राकडून … Read more

दहशत निर्माण करणार्‍या ईडी, सीबीआय संस्थांचे लॉकडाऊन करा.. वाचा सविस्तर

मुंबई – पंतप्रधान यांनी आत्मनिर्भरतेकडे चला असा संदेश दिला आहे. परंतु उद्योग सुरू करून लाखोंचे कर्ज बुडवून उद्योगपतीनी पळून जाणे हे आता भारताला परवडणारे नाही. उद्योजक, व्यापारी यांना टिकवून ठेवावे लागणार आहे. याकरता दहशत निर्माण करणार्‍या ईडी, सीबीआयसारख्या ‘राजकीय’ संस्थांचे काही काळ ‘लॉक डाऊन’ करावे लागेल अशी मागणी सामना अग्रलेखातून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली … Read more

धक्कादायक! शासनमान्य वस्तूंची वाहतूक करणार्‍या टेम्पोतून गुटख्याची तस्करी

मुंबई शासनमान्य वस्तूंची वाहतूक करणार्‍या साधंनांना सवलत पास दिले आहेत. अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होवू नये हा त्यामागचा उद्देश आहे. परंतु या पासचा दूरपयोग करत अत्यावश्यक सेवेचा पास चिकटवत त्यातून गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ही कारवाई बुधवारी साकीनाका परिसरात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १० ने केली. आकाश … Read more

महाराष्ट्रात उद्योगधंद्यासाठी महापरवाना ; राज्यसरकारचा निर्णय

औरंगाबाद : कोरोनामुळे जगभरातील उद्योगधंदे बंद पडले आहेत. जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी भारताला पसंती देण्यास सुरवात केली आहे. याचा फायदा घेत राज्यात लवकरच मोठी गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने डीएमआयसीअंतर्गत असलेल्या आॅरिक सिटीमध्ये परकीय गुंतवणूकदारांना सवलती असतील. गुंतवणूकदारांना तातडीने ‘महापरवाना’ देण्याचा निर्णय याच अनुषंगाने घेतल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी जाहीर केले. राज्याचा उद्योग विभाग अमेरिका, जर्मनी, जपान, … Read more

तिहेरी हत्याकांड! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

बीड: बीडमधील तिहेरी हत्याकांडाने सारा महाराष्ट्र हादरला आहे. शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातिल तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मांगवडगाव इथे घडली आहे. मांगवडगाव इथे शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला. या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी एकाच कुटुंबातील … Read more

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील अपडेट्स

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ९२२ झाली आहे. आज १४९५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ४२२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५५४७ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३० हजार ८५७ … Read more

जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या ११६ वर

अलिबाग, जि. रायगड, दि.13 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 13 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे- जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 13/05/2020) – 1 हजार 635, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा  incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 … Read more

परप्रांतीय मजुरांना मूळ गावी सोडण्यासाठी एस.टी. बसेस रवाना.!

अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) : कोकणातील श्रीवर्धन तालुक्यामधून परप्रांतीय मजूरांना घेऊन तीन एस.टी. बसेस बोर्ली पंचतन आगारातून बुधवारी, संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास रवाना झाल्या. सांगली-कराड लगत असणाऱ्या कर्नाटक सीमेवरील जत या ठिकाणी या एस.टी. बसेस मार्गस्थ झाल्या. श्रीवर्धन आगारातून एकूण तीन बसेस निघाल्या असून प्रत्येक गाडीत प्रत्येक 22 याप्रमाणे एकूण 66 प्रवाशी कर्नाटक सीमेच्या दिशेने … Read more

महाराष्ट्रने रोजीरोटी दी है, कैसे भुलेंगे?

चंद्रपूर,दि.13 : लॉकडाऊन खत्म होने के बाद फिर से आना.. जहॉं,काम किया है वहॉं काम मिलेगा अशा आश्वासक शब्दात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधत झारखंडच्या नागरिकांना निरोप दिला. यावर महाराष्ट्र के भरोसे हमारी रोजीरोटी है… हम लोग आपका प्यार कैसे भुला देंगे… असे भावपूर्ण उद्गार काढत  जिल्ह्यातील झारखंडच्या मजुरांनी आज चंद्रपूर शहराचा निरोप घेतला. वेळात वेळ … Read more

राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा

मुंबई, दि.१३ : कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढणाऱ्या पोलीस दलातील योद्ध्यांसाठी गृह विभागामार्फत विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी गृह विभागामार्फत घेण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोना विरुद्धच्या या युद्धात २४ तास कार्यरत आहे. कार्यक्षमतेच्या दुपटीने पोलिसांना काम करावे लागत … Read more

राज्यात ६५ हजार उद्योगांना परवाने, ३५ हजार उद्योग सुरू – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई, दि. १३ : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून सद्यस्थिती ६५ हजार उद्योगांना उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली असून त्यापैकी ३५ हजार उद्योगांनी उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. त्यात सुमारे नऊ लाख कामगार रुजू झाले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर श्री.देसाई यांनी ही माहिती दिली. … Read more

श्रमिक विशेष रेल्वे बिहारकडे रवाना

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयात संपर्क साधल्यानंतर रद्द केलेली तिकिटे रेल्वे प्रशासनाने पुन्हा वितरित केली. यानंतर ‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत बिहारमधील 1 हजार 320 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने आज सायंकाळी 7.20 वा. छपराकडे रवाना झाले. प्रशासनाने त्यांची केलेली सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद … Read more

नेहमीप्रमाणे आर्थिक पॅकेजची घोषणाही पोकळ ठरू नये !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-   कोरोनाच्या संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चार भाषणांमधील मोठ मोठ्या परंतु पोकळ शब्दांतून देशाच्या गरजेचा एक शब्द आज ऐकायला मिळाला तो म्हणजे आर्थिक पॅकेज. गेल्या सहा वर्षातील वेगवेगळ्या पोकळ घोषणांप्रमाणे या आर्थिक पॅकेजची घोषणा भविष्यात पोकळ ठरू नये हीच अपेक्षा” अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली. … Read more

अहमदनगर शहरातील ‘या’ रस्त्यासाठी 21 कोटी रूपयाचा निधी, आमदार म्हणाले विकासासाठी कटीबध्‍द …

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-नगर एमआयडीसीतील उदयोग धंदयांना चालना मिळावी यासाठी मी गेल्‍या पाच वर्षामध्‍ये राज्‍य शासनाकडे पाठपुरावा केला आहे. एमआयडीसीमध्‍ये पायाभूत सुविधा उपलब्‍ध झाल्‍यास मोठ मोठे उदयोग धंदे येण्‍यास तयार होतात. शहराचा विकास औदयोगिक वसाहतीवर अवलंबून असतो. यासाठी नगर एमआयडीसीमध्‍ये मोठमोठे उदयोग धंदे यावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच उदयोग धंदयामुळे बेरोजगारांच्‍या हाताला … Read more

मोठी बातमी : राज्यातील ‘या’पदांच्या निवडी होणार !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतीची बैठक घेण्यास संमती देण्यात आली आहे. या बैठका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी … Read more