वडिलांनी केली पाच महिन्यांच्या चिमुरडीची हत्या

पिंपरी : येथील बावधन येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्यानेच आपल्या पाच महिन्यांच्या चिमुरडीची हत्या केली आहे. पत्नीशी भांडण झाल्याच्या रागातून त्याने चिमुरडीचे तोंड व नाक दाबले. त्यामुळे गुदमरून मुलीचा मृत्यू झाला.शनिवारी पहाटे ही घटना घडली. बापुराव नामदेव जाधव (वय ३५, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) असे या आरोपीचे नाव असून हिंजवडी पोलिसांनी आरोपीला … Read more

शाळांनी शुल्कवाढ करू नये; शालेय शिक्षण विभागाचे ‘असे’ आहेत निर्देश

पुणे: लॉक डाऊनमुळे अनेकांचे काम बंद पडले आहे. त्यामुळे सर्वांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. याचा सारासार विचार करता येत्या शैक्षणिक वर्षांसाठी शुल्कवाढ न करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये काही शिक्षण संस्थांकडून शुल्क भरण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्या होत्या. त्याची दखल … Read more

१०० मीटर अंतरावर थांबली मालगाड़ी आणि रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती टळली

पुणे पुणे-दौंड रेल्वे मार्गावर उरळी-लोणी स्थानकादरम्यान चालाकाच्या प्रसंगावधानतेमुळे 40 लोकांचे प्राण वाचले आहेत. हे 40 लोक रेल्वे ट्रॅकवरून पायी निघाले होते. परंतु मालगाडीच्या ‘लोको पायलट’च्या (चालक) लक्षात आल्याने प्रसंगावधान दाखवून त्याने गाडी थांबवली. त्या वेळी गाडी आणि लोकांमध्ये केवळ १०० मीटर अंतर उरले होते. त्यामुळे खूप मोठी दुर्घटना टळली. जालना येथून औरंगाबादला जाण्यासाठी रेल्वे मार्गावरून … Read more

मटका किंग रतन खत्री यांचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- मटका किंग रतन खत्री यांचं मुंबईत राहत्या घरी निधन झाले आहे. शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षांचे होते.  गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.  RIP Mr. #RatanKhatri Matka King. Hole #Sattamatka user Cry today. I miss you sir. #matka owner and #satta play always finding you but … Read more

‘चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना बारामतीत आणावे’

पुणे कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे उद्योग मोडकळीस आले आहेत. याबाबत चीनला दोष देत अनेक उद्योग चीनमधून बाहेर पडणार असल्याचे चित्र आहे. देशाने ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांचे स्वागत करावे. ते उद्योग बारामतीच्या रिकाम्या भूखंडात आणावे, अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन ने केली आहे. बारामती, जेजुरी, कुरकुंभ येथील औद्योगिक … Read more

मुंबईत रहिवासी चाळ कोसळली, ढिगाऱ्याखाली नागरिक दबल्याची शक्यता

मुंबई रविवारी पाहाटे ६ वाजता मुंबईतीत कांदीवली (पश्चिम) भागात रहिवासी चाळ कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या ढिगाऱ्याखाली 5-6 नागरिक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचं (NDRF) एक पथक घटनास्थळी पोहोचलं असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. कांदीवली  (पश्चिम) गणेश नगरात ही घटना घडली आहे. सबरिया मशिदीच्या … Read more

भाजप निष्ठावंत माजी मंत्र्यांची श्रेष्ठींवर नाराजी !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील अनेकांनी विधानपरिषदेबाबत माझ्या नावाची शिफारस केली होती. 81 शिफारशी झाल्या होत्या. त्यामुळे श्रेष्ठींनी निर्णय घ्यायला हवा होता. आजी-माजी आमदारांनीही शिफारशी केल्या होत्या. तरीही श्रेष्ठींना विचार केला नाही, अशा शब्दांत भाजपचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी श्रेष्ठींबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे जाणाऱ्या शिंदे … Read more

मान्सून ११ जूनला होणार मुंबईत दाखल

मुंबई : यंदा मान्सून ११ जूनला कोलकाता आणि मुंबईत दाखल होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर दिल्लीत २७ जून रोजी मान्सून दाखल होईल. मान्सूनची मुंबईत दाखल होण्याची यापूर्वीची तारीख १० जून होती. मान्सून मुंबईतून ८ आॅक्टोबरला परतीचा प्रवास सुरू करेल. असा हि अंदाज वर्तवला आहे. १९०१ ते १९४० दरम्यान देशातील १४९ ठिकाणांहून गोळा करण्यात आलेल्या … Read more

राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने रविवार आणि सोमवारी राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर आणि दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता आहे तर त्यानंतर मंगळवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हे वातावरण कायम राहू शकते. रविवारी ठाण्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ढगांच्या द्रोणीय स्थितीमुळे पावसाची शक्यता निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मुंबई … Read more

काय आहे ‘वंदे भारत मिशन’;जाणून घ्या याविषयी

मुंबई: संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक भारतीय परदेशांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांना भारतात आणण्यासाठी व त्यांच्या कोरोना टेस्ट पासून सर्व सुविधा उपल्भ करून देण्यासाठी ‘वंदे भारत मिशन’ राबविण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटात भारतातील सुमारे 2 लाख लोकं परदेशात अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचे काम सरकारने … Read more

कपाशीची पूर्व हंगामी लागवड करु नका

अकोला : कपाशी पिकावर शेंद्री (गुलाबी) बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कपाशीची पूर्व हंगामी लागवड करू नये, असे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे. अकोला जिल्ह्यामध्ये १.६० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगाम २०२० मध्ये कपाशी पिकाचे लागवडीचे लक्ष ठेवण्यात आले असून त्यापैकी ७०% कोरडवाहू व ३०% ओलित क्षेत्र आहे. शासनाने जिल्ह्यासाठी आठ लाख बियाणे पॅकेटसचे आवंटन दिले आहे. … Read more

खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा – पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषी विभागाने करावे. कृषी निविष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, जास्त  दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांनी दिल्या. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या पिकांचे नियोजन, बी-बियाणांची उपलब्धता, रासायनिक खते, औषधे आदी बाबींच्या पूर्वतयारीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली, यावेळी ते … Read more

उत्तर प्रदेशातील सुमारे बाराशे कामगार लखनौकडे रवाना

अमरावती, दि. 9 : अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या उत्तर प्रदेशातील 1 हजार 239 कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस आज अमरावती रेल्वे स्थानकावरून लखनौकडे रवाना झाली. जिल्ह्यात अडकलेल्या इतरही नागरिकांना स्वगृही पोहोचविण्यासाठी नियोजन केले असून, सर्वांनी संयम ठेवावा. कुणीही पायी जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले. अमरावती विभागात अडकलेल्या … Read more

लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांसाठी सोमवारपासून एसटी सेवा

चंद्रपूर : राज्यात अडकलेल्या  नागरिकांना आपआपल्या गावी जाऊ द्यावे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत  निधीची व्यवस्था करण्यात येईल,  या पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून सोमवारपासून विद्यार्थी नागरिक व प्रवाशांच्या मोफत एसटी बसला सुरुवात होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्यात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना व प्रवाशांना आपापल्या मूळ गावी पोहोचण्यासाठी राज्य शासनाने … Read more

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सुक्ष्म नियोजन

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. एक चांगली बाब म्हणजे मृत्युचे प्रमाण खूपच कमी आहे. आरोग्य विभागाबरोबरच प्रशासन व पोलीस चांगले काम करीत असून  आणखी रुग्ण वाढणार नाहीत यासाठी सर्वांनी सुक्ष्म नियोजन करुन संसर्गाची साखळी तोडण्याचे काम करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या. कराड येथील विश्रामगृहात कोरोना … Read more

नियमाची अंमलबजावणी करुन जिल्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा

हिंगोली : कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत राज्यात सातत्याने वाढ होत आहे. परंतू जिल्हा  प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील प्रमाण सद्यस्थितीत नियंत्रणात आहे. पंरतू आपला जिल्हा लवकरात-लवकर ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा, असे पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे … Read more

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा

मुंबई, दि.९ – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर राज्यातील  विविध भागांमध्ये अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी ,भाविक, यात्रेकरू अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने  काही अटी-शर्तींच्या अधीन राहून एसटीने मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा … Read more

जीवनावश्यक सेवा देणाऱ्या पारंपारिक व्यावसायिकांना पालकमंत्र्यांची मदत

चंद्रपूर : नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या ऑटोचालक, रिक्षाचालक, केशकर्तनालय व लॉन्ड्री व्यवसायात काम करणाऱ्या बारा बलुतेदारातील नाभिक व धोबी समाजातील व्यावसायिकांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व सिंदेवाही येथील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये शनिवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनच्या दीर्घ काळामध्ये नियमित व पारंपारिक व्यवसायाचा देखील खोळंबा झाला आहे. … Read more