अहमदनगर ब्रेकिंग : अनिल राठोड यांच्यावर बहिष्कार ! ‘त्या’प्रकरणाबाबत कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- प्रभाग क्र. 15 चे नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्याबद्दल माजी आमदार यांनी अपशब्द वापरुन फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील जनतेचा अपमान केल्याचा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. प्रशांत गायकवाड हे दलित चळवळीतील एक कार्यकर्ते आहेत. माजी आमदार राठोड यांच्या डोक्यातील जातीय मानसिकता बाहेर पडली आहे. चुकीच्या पद्धतीने गलिच्छ भाषा वापरत माजी … Read more

बिअर बारमालकाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  औरंगाबादच्या पुंडलिकनगरातील रहिवासी प्रसिध्द बिअर बार मालकाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पोटाच्या आजारास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलसांनी व्यक्त केला आहे. गारखेडा परिसरातील पुंडलिकनगरमधील शैलेश बिअर बारचे मालक अशोक पांडुरंग जाधव (५९) यांनी रविवारी रात्री परिवारासह जेवण घेतले. त्यानंतर त्यांनी रात्री दोनच्या सुमारास … Read more

आता पोल्ट्री व्यवसायिकांना सुगीचे दिवस येणार ! 

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- चिकन तसेच अंड्डयांना मागणी वाढत चालली आहे. सध्या उत्पादन कमी असल्याने हे दर अधिक वाढण्याची शक्­यता आहे. चिकनमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होतो, या गैरसमजाचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला. भीतीपोटी चिकन खाणाऱ्यांची संख्या रोडावली होती परिणामी विक्रेत्यांनी दर कमी करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही केला परंतू तो निष्फळ ठरला. सोशल … Read more

अजानला परवानगी कशी दिली? शिवसेना-भाजपने प्रशासनाला केला सवाल

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  रमजानच्या काळात अजानला परवानगी देण्यात आली. यामुळे कोरोनाच्या संसर्ग वाढू शकतो. काही समाजातील सण घरात साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मशिदीतून अजान करण्यास परवानगी का दिली. मात्र या निर्णयामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, असा नगर शहरातील शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेचे … Read more

राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी

मुंबई, दि. 5: लॉकडाऊन कालावधीत करण्यात आलेल्या वाढीच्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (एमएमआर), मालेगाव महानगरपालिका, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयातील उपस्थिती 5 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 22 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (एमएमआर) … Read more

राज्यात कोरोनाचे २४६५ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि.४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज  ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी … Read more

धनंजय मुंडेंचे बीड जिल्ह्यासाठी मिशन १००% ग्रीन झोन!

बीड, दि. 4 : बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला मदत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या 550 होमगार्ड्सच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न श्री. मुंडे यांनी … Read more

लॉकडॉऊनच्या काळातही जनतेला नागरी सेवा उपलब्ध करुन देणार – डॉ.नितीन राऊत

नागपूर, दि.4 :  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात तसेच जिल्हयातही लॉकडाऊन सुरु असून तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून जनतेचेही सहकार्य मिळत आहे. या काळात जनतेला अत्यावश्यक सेवेसोबतच नागरी सेवा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली लॉकडाउनच्या तिसऱ्या … Read more

पवार घराण्याला विरोधासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी ?

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राम शिंदे मंत्री असताना जिल्ह्यात भाजपचे पारडे जड होते. आता पक्षाचे तीन आमदार आहेत, परंतु राज्यातील सत्ता जाताच जिल्ह्यातील भाजप दिसेनाशी झाली आहे. जिल्ह्यात भाजपला ऊर्जितावस्था आणण्यासाठी व पवार घराण्याला प्रबळ विरोधासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांची जुळवाजुळव सुरू आहे. शिंदे यांच्यासह … Read more

जिल्ह्याबाहेर अडकलेल्या ३ हजार ५५३ नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी

जळगाव, दि.3 – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी केंद्र शासनाने अटी शर्तीवर परवानगी  दिली आहे. त्यानुसार आता राज्य शासनानेही अडकलेल्या नागरिकांना बाहेरील राज्यातून, जिल्ह्यातून त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्याने परराज्य, जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल 3 हजार 553 जणांना जिल्ह्यात येण्याचे परवाने  देण्यात आले आहे. … Read more

नाशिक शहरातील मद्य विक्रीची दुकाने बंदच; आदेशाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द

नाशिक दि. 4 मे 2020 (जिमाका): सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये मद्य विक्रीस शासनाने परिपत्रकाद्वारे 3 मे 2020 रोजी परवानगी दिली. नाशिक शहर रेड झोनमध्ये असूनही मद्यविक्री दुकाने सुरू करण्यात आली. परंतु बऱ्याच मद्य विक्री दुकानांवर सुरक्षित वावराच्या नियमांना पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांना … Read more

पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर

पुणे, दि.4 : पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्राकरिता प्राधिकृत अधिकारी असणारे पुणे व पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजल्यापासून आदेशात नमूद महापालिका क्षेत्र हे हॉटस्पॉट/ कंन्टेटमेंट झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. तसेच कोरोना प्रभावग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 7 तालुके प्रतिबंधित … Read more

पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे, दि. 4: पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 364 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 681 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात 2 हजार 364 बाधित रुग्ण असून 125 … Read more

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : दि. ४-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि.१५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यामध्ये 33 टक्के ते 100 टक्के पर्यंत सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी … Read more

मंत्रालय नियंत्रण कक्षात संपर्कासाठी आणखी दोन दूरध्वनी क्रमांक उपलब्ध

मुंबई, दि. 4 – मंत्रालय नियंत्रण कक्षात संपर्कासाठी नवीन दोन दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षात संपर्कासाठी एमटीएनएलचे चे ०२२-२२०२७९९० व ०२२-२२०२३०३९ हे दोन क्रमांक कार्यरत असून या दोन दूरध्वनी शिवाय ९३२१५८७१४३, ९३२१५९०५६१ हे दोन नवीन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे मंत्रालय नियंत्रण कक्षाने कळविले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ‘महापारेषण’कडून साडेपाच कोटी

मुंबई, दि. 4 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने चांगला प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणने सुमारे साडेपाच कोटी रूपये जमा केले आहेत. ‘कोरोना’ विरोधी लढ्यामध्ये केलेल्या आर्थिक योगदानाबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणचे कौतुक केले आहे. कोरोना संकट निवारणासाठी करण्यात येत … Read more

कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमा आणखी काही दिवस बंदच

मुंबई, दि. 4 – राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता  उपाययोजना करण्यात येत असताना हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोनमधील बाधितांची संख्या कमी करण्यावर भर देणे आवश्यक असल्यामुळे आंतर जिल्हा  प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत. जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहतील, असे आज राज्य शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात … Read more

बुलढाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

बुलढाणा, (जिमाका) दि. 4 : कोरोनाने जगभर थैमान घातले असताना जिल्ह्यामध्ये कोरोनाने शिरकाव करीत 24 रूग्ण बाधित केले. कोरोना फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध कडक उपाययोजनांची अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना निवळण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले. आज चिखली येथील एका रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू … Read more