अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी निर्घृण खून, प्रचंड खळबळ

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अतिशय क्रूरतेने हा खून करण्यात आला आहे. मुकूंद वाकडे ( रा. आढळगाव, ता. नगर) हे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, आढळगाव येथील मुकुंद वाकडे यांचा मृतदेह शेतात … Read more

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घराबाहेर पडायला हवे : खा.डॉ.सुजय विखे

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- कोरोना रोगाच्या काळजीसाठी गर्दी जमवु नये व सरकारी नियमांचे पालन केले पाहीजे. परंतु जनतेत फिरलेच पाहीजे जनतेचे इतरही प्रश्न समजावुन घेवुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घराबाहेर पडले पाहीजे. पिण्याचे पाणी, शेतीमालाला भाव, शेतीचेपाणी, मालवाहतुक आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी लोकामधे जावे लागेल. मी गेल्या महीनाभरापासुन रोज फिरतोय आणि साठ … Read more

लॉकडाऊन काळात राज्यात व राज्याबाहेर जाण्यासाठी मिळणाऱ्या परवानगी संदर्भात

मुंबई, दि.२ : लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकून पडलेले यात्रेकरू, कामगार, मजूर वर्ग, विद्यार्थी, तसेच अन्य नागरिक यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भातील पोलीस आयुक्तालय हद्दीतील अधिकार आता संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आलेले आहेत. पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची  परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. मुंबई, … Read more

‘तनपुरे’च्या कामगारांच्या थकीत वेतनासंदर्भात थेट पंतप्रधान मोदींनी घातले लक्ष

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न खूप काळापासून प्रलंबित असून या कामगारांची अक्षरशः उपासमार होत आहे. या संदर्भात कामगाराच्या एका मुलाने दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टलवर तक्रार करून लक्ष वेधले होते. त्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालत शनिवारी नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त … Read more

मालेगाव कोरोनामुक्तीसाठी अकरा मोबाईल व्हॅन सज्ज : कृषीमंत्री दादाजी भुसे

मालेगाव : नॉन कोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’, या संकल्पनेतून मालेगावकरांच्या सेवेत एकाचवेळी अकरा मोबाईल व्हॅन दाखल झाल्या आहेत. या व्हॅनच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात जाऊन तेथील रुग्णांची त्याच ठिकाणी मोफत तपासणी व औषधोपचार करणार आहेत. या तपासणी मोहिमेत सारी व कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर प्रथमोपचार करुन त्यांना शासकीय … Read more

शेतकऱ्यांना पतपुरवठ्यासाठी बँकांबाबत कठोर धोरण आवश्यक – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अमरावती : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना नियमित पतपुरवठा होणे आवश्यक आहे. सध्याच्या संकटकाळात शेती व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी काही कठोर पावले उचलावीच लागतील. त्यामुळे बँकांनी पतपुरवठ्यात टाळाटाळ करू नये, यासाठी कठोर धोरण आवश्यक असल्याची मागणी पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. जिल्ह्यातील स्थितीबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महसूल मंत्री श्री. थोरात यांच्याशी विविध विषयांवर … Read more

राज्यात कोरोनाबाधित २००० रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि. २ : राज्यात आज १२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २००० रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत ७९० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर एकूण ९७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ … Read more

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी उपविभाग करून सूक्ष्म नियोजन आवश्यक

अमरावती : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ज्येष्ठ नेते व माजी शिक्षक आमदार बी. टी. देशमुख यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घेतले.  \त्यानुसार कंटेन्मेंट झोन व जोखमीच्या क्षेत्रात उपविभाग तयार करून सर्वेक्षण, तपासणी यांची संख्या वाढविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिले. … Read more

लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई, दि. 2 : राज्यात लॉकडाऊनचा कालावधी 17 मे 2020 पर्यंत वाढविणे तसेच या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात आज राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला. रेड (हॉटस्पॉट),ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील धोक्यांची तीव्रता लक्षात घेऊन या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. काही भागांमध्ये कामांसाठी परवानगी देण्यात आली असली तरी त्यांना कोविड १९ प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठीचे नियम … Read more

सर सलामत तो पगडी पचास म्हणून सतर्क रहा : पाचपुते

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. श्रीगोंदा येथील शासकीय यंत्रणेने गार, निमगाव खलु गावची पाहणी करत या गावांमधून दौंड व अन्य ठिकाणी होणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आ. बबनराव पाचपुते, तहसीलदार महेंद्र महाजन, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, विक्रमसिंह पाचपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. … Read more

अहमदनगर चा सुपुत्र कोरोनाशी पुण्यात लढतोय, कामाचं होतंय कौतुक !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  कोरोनाबाधितंच्या वाढत्या संख्येमुळे संपूर्ण पुणे शहर भयभित झाले असताना,याच पुण्यातील पश्चिम भागातील महापालिकेच्या दोन वॉर्डमध्ये कोरोनचा फैलाव मात्र होऊ शकलेला नाही.औंध-बाणेर व कोथरुड-बावधन या दोन वॉर्ड मध्ये मार्चच्या अखेरीस अनुक्रमे दोन व एक असे तीन रुग्ण आढळले होते. परंतू एक महिन्यांनंतरही येथील परिस्थिती जैसे थे च असुन जे तीन … Read more

परराज्यातील ५० प्रवासी त्यांच्या गावाकडे रवाना, आपुलकीने सांभाळ केल्याबद्दल मानले प्रशासनाचे आभार

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- केंद्र शासनाने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात अडकलेल्या विविथ स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, इतर नागरिक यांना त्यांच्या राज्यात पाठविण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी खास पथकाची स्थापना केली.जिल्ह्यात विविध ठिकाणी तसेच निवारागृहात अडकलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यात येत आहे. आज रात्री नगरहून राजस्थानसाठी प्रवासी बस रवाना करण्यात आली. लॉकडाउन काळात या … Read more

‘तो’ मुंबईत भाजी विकायला गेला आणि पाथर्डीत कोरोनाचा शिरकाव झाला !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता जिल्ह्यातील कोरोना … Read more

दिव्यांगांसाठी सर्व जिल्ह्यात संकेतस्थळ सुरू करण्याबाबत विचार

मुंबई, दि. 2 : दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी, प्रमाणपत्र याचबरोबर दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष योजनांचा लाभ मिळवून देणे सुकर करण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘दिव्यांगसाथी’ (divyangsathizpbeed.com) या विशेष संकेतस्थळाचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अशा प्रकारचे संकेतस्थळ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असावे या … Read more

लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यात ८९ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि. २ : लॉकडाऊनच्या काळात दि. २२ मार्च ते १ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ८९,३८३ गुन्हे दाखल झाले असून १७,८१३ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी १४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस … Read more

नाशिकहून उत्तर प्रदेशचे ८४७ मजूर विशेष रेल्वेने घराकडे रवाना

नाशिक दि. 2 मे (जिमाका) : परप्रांतीय मजुरांची नाशिकच्या प्रशासनाने कुटूंबाप्रमाणे काळजी घेतली. गेला दीड महिना सर्व यंत्रणा या मजुरांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी झटत होती. त्यामुळेच तर आज रेल्वे सुटतांना त्यांच्या डोळ्यात पाणी होते. गाडी सुटतांना या प्रवाशांनी महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र, अशा घोषणा देवून एकप्रकारे नाशिकच्या प्रशासनालाच धन्यवाद दिले, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ … Read more

आगीत घरांचे नुकसान झालेल्यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मदतीचे वाटप

नाशिक, दि. 2 मे (जिमाका) : नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत येथील 116 घरांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त नागरिकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मदतीचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात येऊन प्राथमिक स्वरूपात तीन नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत … Read more

विद्यापीठात कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित करण्यास मान्यता

अमरावती : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी संशयितांचे अहवाल तत्काळ मिळावे व उपचार, उपाययोजनांना गती मिळावी यासाठी अमरावतीत लवकरात लवकर लॅब सुरू करण्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित करण्यास मान्यता मिळाली असून, सोमवारपर्यंत ही लॅब कार्यान्वित होईल, अशी माहिती पालकमंत्री ॲड.ठाकूर यांनी दिली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने पाठवलेले मान्यतेचे पत्र … Read more