लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३४१ गुन्हे दाखल

मुंबई, दि. २ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३४१ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक, फेसबूक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  ज्या ३४१ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे … Read more

आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था होणार कामाच्या ठिकाणीच

अलिबाग : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात संपूर्ण लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन काळात पनवेल व नवी मुंबई येथून मुंबईत अत्यावश्यक सेवा कर्तव्यावर असलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स,  नर्सेस, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय करण्यात येणार आहे. राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासनाला याबाबत विनंती केली होती. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूबाधित व्यक्तींची माहिती घेतली असता … Read more

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा : पाटण तालुक्यात २९ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी पावसामुळे डोंगरपठारासह सकल भागातील गावामधील घरांच्या तसेच शेडवरील पत्रे उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  त्याचबरोबर पिकांचे आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण प्रांताधिकारी, तहसीलदार व कृषी विभागाला दिल्या. वादळी पावसामुळे गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांनी तारळे परिसरातील नुकसान झालेल्या गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांनी नुकसानग्रस्तांना … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तरुणांना केले ‘हे’आवाहन

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  आपण कायम राज्यघटनेच्या तत्त्वाशी निगडित अशा काँग्रेसचा विचार जपला आहे. आणि तो शाश्वत आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय चांगले काम करत असून आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपण घराबाहेर पडणे टाळून सरकारला सहकार्य केले पाहिजे. सोशल डिस्टन्स पाळणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असून तरुणांनी स्वत:च्या जीवनात सकारात्मकता … Read more

कोरोना मुक्त ठाणे जिल्ह्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचा संकल्प – पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. १ : कोरोनाला हरवण्यासाठी त्याच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणं हाच एकमेव उपाय असल्यानं टाळेबंदीचं पालन करा. कुणीही घराबाहेर पडू नका. घरात रहा, सुरक्षित रहा. स्वयंशिस्त पाळून जिल्हा आणि राज्य कोरोना मुक्त करण्याचा संकल्प करा, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त … Read more

प्रत्येकाला जिल्ह्यात आणण्यासाठी मदत करणार : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि 1 मे : राज्य शासनाने 30 एप्रिल रोजी राज्याबाहेरच्या व राज्यातील इतर ठिकाणच्या नागरिकांना जिल्ह्यामध्ये आणण्याची परवानगी दिल्यानंतर प्रशासन गतीने कामी लागले आहे. ही प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार असून नागरिकांनी एकाच वेळी गोंधळ न करता ज्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत त्या जिल्ह्याच्या प्रशासनाची संपर्क साधण्याचे आवाहन पालकमंत्री  विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. अन्य राज्यात अडकून … Read more

परराज्यातील, राज्यांतर्गत अडकलेल्यांना मूळ गावी जाण्यासाठीचे नियोजन सुरू

मुंबई, दि.1 : परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले आहेत, त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत  शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. राज्या राज्यांमधील समन्वयातून या सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात  सुखरूप पाठवले जाईल व त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, आणि राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनासुद्धा मूळ गावी … Read more

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण

सांगली, दि. 1 : कोविड-19 विरूद्धच्या लढाईत सांगलीकरांनी अत्यंत उत्कृष्ट साथ दिली. याबद्दल सांगलीकरांना धन्यवाद देत पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्हा वासियांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा … Read more

कोरोनाच्या महासंकटावर निश्चितपणे मात करू – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 15 : महाराष्ट्रभूमी ही शूरवीर आणि संतांची भूमी आहे. यापूर्वीच्या प्रत्येक संकटावर या भूमीने मात केली आहे. आपण सर्वजण धैर्य, संयम, शिस्तीचा अवलंब करून कोरोनाच्या महासंकटावरही निश्चितपणे मात करू, असा विश्वास पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरकमहोत्सवी (60वा) वर्धापनदिन समारंभानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते … Read more

सर्व नगरपालिकांचे धोरण सुसंगत असावे – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग, दि. 01  : कोरोना प्रादुर्भाव रोखण्या संदर्भात व लॉकडाऊन विषयी घेण्यात येणाऱ्या निर्णयांमध्ये सर्व नगरपालिकांमध्ये एकवाक्यता असावी, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या समवेत आज पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, जिल्हाधिकारी … Read more

‘राज्य उत्पादन शुल्क’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटींची मदत

मुंबई, दि. 1 : ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यातर्फे स्वयंप्रेरणेने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 ‘साठी 1 कोटींच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सुपूर्द केला. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या लढ्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील 2 हजार … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, … Read more

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

पालघर, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभूवन, पोलीस अधीक्षक गौरव सिंह उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आणि साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाचे हे निर्देश पाळत येथील … Read more

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि. १: महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.  या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी राजीव निवतकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी बन्सी गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर,  उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत आणि साधेपणाने … Read more

हमको डटकर रहना है.. क्योंकि करोना को हराना है..!

रायगड-अलिबाग मधील रितेश घासे, आशिष पडवळ, पंकज वावेकर, समाधान चंदू, आरती पाठक, धनंजय साक्रूडकर, केतन भगत, नवीन मोरे या आठ जणांचं संगीत वेडं तरुण मित्र मंडळ. सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड, उमेद, जिद्द. सर्वांनी मिळून “बास कर” नावाचे प्रॉडक्शन हाऊस 2017 या वर्षी सुरू केले. हळूहळू लोकांकडून त्यांच्या कामाची पावती मिळू लागली आणि “झी म्युझिक” सारख्या आघाडीच्या म्युझिक … Read more

खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा

पुणे दि.१ :- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे. कृषि निविष्ठांबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी भरारी पथके नेमून जादा दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

जळगाव, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, प्रांताधिकारी दिपमाला चौरे, … Read more

बियाणे व खते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पुरविण्याचे नियोजन – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. 1 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी शेतकरी गट/उत्पादक कंपन्यांमार्फत बी-बीयाणे व खते बांधापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बीयाणे व खते वेळेवर या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असली तरी त्यांनी बागायती कापसाची लागवड 25 मे नंतरच करावी. तसेच बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज तातडीने उपलबध करुन द्यावे. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील … Read more