‘बारामती पॅटर्न’नुसार पुण्यातील वाढत्या रुग्ण संख्येला आळा घाला – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. बारामती पॅटर्न नुसार कडक निर्बंध पाळून येथील रुग्णसंख्येला आळा घाला, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले. येथील सर्व अधिकाऱ्यांनी मिळून समन्वयाने सुक्ष्म नियोजन करुन आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवून कोरोनाचा फैलाव थांबवावा, … Read more

महाराष्ट्रात एका दिवसात १००८ कोरोना रुग्ण वाढले ! वाचा तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती …

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- राज्यात आज १०६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधित १००८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली आहे. तर एकूण  ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात … Read more

टाळेबंदीसंदर्भात ३ मे नंतर सतर्कता बाळगून मोकळीक देण्याचा प्रयत्न

मुंबई, दि. १ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात 3 मे नंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून करावा लागणार आहे. रेड झोन मध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही. रेड झोन मधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील परंतु ऑरेंज झोन … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण

परभणी दि. 1 : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60वा वर्धापन दिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूर, दि. 1 : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिले होते.   त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलीस महा निरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, पोलीस … Read more

‘लॉकडाऊन’ मुळे शेतमाल विक्रीचे तंत्र शिकलो

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा काळ हा आमच्यासाठी बंदी नाही तर संधी म्हणून लाभला आहे, कृषि विभागाच्या मार्गदर्शनाने लॉकडाऊनमध्ये आम्ही शेतमाल विकीचे तंत्र शिकलो. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पिंपळगांव हरेश्वर, ता. पाचोरा, जि. जळगाव येथील मोसंबी उत्पादक शेतकरी शरद पाटील यांनी… कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढू लागला आणि देशभरात लॉकडाऊन … Read more

मोठी बातमी : स्वस्त झाला सिलेंडर, वाचा काय असेल नवीन किंमत ?

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात लॉकडाउन सुरू आहे. यादरम्यान घरगुती गॅस (एलपीजी) वापरणाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा सरकारने दिला आहे. शुक्रवार 1 मेपासून विना सब्सिडी असलेले एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 162 रुपयांनी घट केली आहे. हे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत.  दिल्लीमध्ये विना सब्सिडी वाले सिलेंडर 162.50 रुपयांनी कमी झाले आहे. … Read more

महत्वाची बातमी : राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये ! वाचा अहमदनगर कोणत्या झोनमध्ये ?

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- केंद्रीय आरोग्य सुरक्षा सचिव प्रीती सुदान यांनी शुक्रवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. त्यामध्ये या राज्यांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत वर्गीकरण करण्यात आले आहे.  यामध्ये राज्यातील १४ जिल्हे रेड झोन मध्ये आहेत. तर ऑरेंज झोनमध्ये एकूण १६ … Read more

अतिशय सावधतेने पाऊले टाकणार- मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात ३ मे नंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून करावा लागणार आहे. रेड झोन मध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही, रेड झोन मधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील परंतू … Read more

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

सातारा दि. 1 (जि.मा.का.) : महाराष्ट्र दिनाच्या 60 व्या वर्धापनदिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात  पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी महराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहणा प्रसंगी  गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राचे … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

अलिबाग, जि.रायगड, दि.1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाली असून या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे  यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण

बुलडाणा, दि.1 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा अत्यंत साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात 1 मे 2020 रोजी पार पडला.  यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील–भुजबळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन यांची उपस्थिती होती. … Read more

मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न

बीड, दि. १ मे : महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.  यावेळी श्री.मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.  संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत कामगार चळवळीतील प्रत्येकाच्या योगदानाचेही यावेळी संस्मरण केले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजचा समारंभ अत्यंत साधेपणाने … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन

सिंधुदुर्ग, दि. 01  : महाराष्ट्र दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री व मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज ध्वजवंदन … Read more

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई दि 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केले. या ध्वजारोहण समारंभाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,आमदार भाई … Read more

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते राजभवनात ध्वजारोहण

मुंबई, दि. १ – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत झाले व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहण कार्यक्रमाला राजभवनातील अधिकारी व कर्मचारी, मुंबई पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांचा संदेश बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठाव्या वर्धापन … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे ध्वजारोहण

पुणे,दि.१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रम संपन्न झाला. Maha Info Corona Website जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड चे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, … Read more

परराज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थी लवकरच स्वगृही परतणार

मुंबई,दि.  ३० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात अडकलेले विशेषतः आंध्रप्रदेश, तेलंगणात अडकलेले मजूर तसेच राज्यातील विद्यार्थी यांना स्वगृही आणण्यात यावे,  अशी वारंवार मागणी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अप्पर मुख्य  सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडे केली होती. तसेच आपत्ती व्यवस्थापन … Read more