ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन

मुंबई, दि. 29 : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२०–२१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारीत वेतन न देता त्यांना निश्चित किमान वेतन देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. गावांमधील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना चालू वर्षी करवसुलीशी निगडीत वेतन न देता किमान वेतन देण्याचा … Read more

पुणे विभागात ३२ हजार ७९१ क्विंटल अन्नधान्याची आवक

पुणे, दि.30 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 32 हजार 791 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 49  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 2 हजार 418 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 17 हजार 350 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक … Read more

कामगार नोंदणी नूतनीकरणाची अट शिथील करण्याची वनमंत्री संजय राठोड यांची मागणी

मुंबई  दि. ३० :  यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. यातील बहुतांश बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड १ जून २०१८ पासून नूतनीकरण करण्यात आलेले नाही.  त्यामुळे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या नोंदणी कार्ड  नुतनीकरणाची अट शिथिल करण्यात यावी  व यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम मजुरांना दिलासा द्यावा, अशी विनंती राज्याचे वने, भूकंप पुनर्वसन मंत्री तथा यवतमाळ … Read more

राज्यात आज ५८३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १० हजार ४९८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. ३० : राज्यात आज कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ४५ … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई, दि. १: संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिन तथा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा चौक येथील त्यांच्या स्मारकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव अजोय मेहता,प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तरुणाने टाकाऊ वस्तूपासून बनवले व्हेंटिलेटर !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- जगभरासह देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दररोज हजारो कोरोना बाधितांचे मृत्यू होत आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. प्रत्येक व्यक्ती आपआपल्यापरीने काम करत आहेत. जामखेड शहरातील सोहेल इब्राहिम सय्यद या युवकाने व्हेंटिलेटर तयार केले असून त्या व्हेंटिलेटरला JIVA (जीवन आणि वायू प्रदान करणारा) असे नाव दिले आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य,म्हणाले …

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-  केंद्र व राज्याच्या आदेशानुसार लॉकडाऊन तीन मे रोजी उठेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र, जिल्ह्यात करोनाची विद्यमान परिस्थिती पाहता आणि नव्याने एकही करोना जिल्हा 10 मे नंतर ग्रीन झोनमध्ये येईल. मात्र नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. करोनावर अद्यापही लस … Read more

‘अन्नपूर्णा आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ

गडचिरोली : जिल्हा प्रशासनाकडून शहरातील गोर-गरीब, गरजूंना सकाळी नास्ता व रात्रीचे जेवण मील ऑन व्हील योजनेतून ५ रूपयांमध्ये देण्यात येत आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मधून एकूण जमा रकमेच्या ३० टक्के निधी कोविड-१९ करिता खर्च करण्याचे आदेश केंद्र तसेच राज्य शासनाने नुकतेच प्रशासनाला दिले आहेत. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर गडचिरोली शहरातील गरजू लोकांसाठी जेवणाचे २५० … Read more

खते, बियाणे बांधावर देण्यासाठी प्रयत्न करा

सोलापूर दि. 30 :   खते आणि बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कृषी विभागाला दिल्या. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली. व्हिडिओ कॅान्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात … Read more

संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या ताकदीनं लढलो त्याच ताकदीने ‘कोरोना’विरुद्ध लढू व जिंकू – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

मुंबई, दि. ३० :- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्रानं ज्या ताकदीनं लढवला त्याच ताकदीनं आज ‘कोरोना’विरुद्ध लढू आणि जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरुन संघर्ष केला होता, यावेळी प्रत्येकानं आपापल्या घरातंच थांबूनंच कोरोनाविरुद्ध लढायचं … Read more

दिव्यांग कृष्णाकडून ‘खाऊचे पैसे’ मुख्यमंत्री सहायता निधीस

यवतमाळ, दि. 30 : कोरोना विरुध्दची लढाई शासन, प्रशासन, सर्व यंत्रणा, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आपल्या परीने लढत आहेत. या लढाईत प्रत्येक सुजाण नागरिक आपापल्या परीने शासनास मदत करीत आहेत. यवतमाळमध्येसुध्दा एका दिव्यांग मुलाने वर्षभर जमविलेले ‘खाऊचे पैसे’ चक्क मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन आपला वाढदिवस साजरा केला. येथील वडगाव रोड भागातील जयसिंगपुरे ले-आऊटमध्ये राहणारा कृष्णा … Read more

रहिमतपूर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ

सातारा दि. 30 :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये म्हणून  शिवराज हॉटेल, रहिमतपूर येथे शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे.  या शिवभोजन केंद्राचे उद्धाटन आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कोरेगावच्या प्रांताधिकारी किर्ती नलावडे, तहसीलदार शुभदा शिंदे, रहिमतपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी,  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल … Read more

विद्यापीठ माध्यम संकुलातील मीडिया स्टुडिओमुळे कुशल पत्रकार घडतील – पालकमंत्री

नांदेड, दि. 30 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात  तयार होत असलेला मीडिया स्टुडिओ अत्याधुनिक व आगळावेगळा व्हावा. यामध्ये तांत्रिक शिक्षण घेत असलेला विद्यार्थी उद्याच्या पत्रकारिता क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा विभाग ठरावा अशी अपेक्षा पालकमंत्री  अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.  काल पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना  तपासणी प्रयोगशाळेस भेट देण्यापूर्वी माध्यम संकुलास भेट दिली. या विभागातील मीडिया  स्टुडिओ उभारणीचे  सुरू … Read more

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षा पुढे ढकलल्या

लातूर, दि. ३० : कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उन्हाळी २०२० च्या परीक्षा घेण्यासंदर्भात गठीत केलेल्या समितीने तशी शिफारस केली असल्याची माहिती वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिली. विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर … Read more

जिल्ह्यात कापूस खरेदीचा तिढा सुटला

यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी भारतीय कापूस निगम (सीसीआय), कापूस पणन महासंघ (कॉटन फेडरेशन) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी करून कापूस खरेदीचा तिढा सोडविला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व जिनिंगची बैठक घेऊन त्यांना कापूस खरेदीच्या सूचना केल्या. जिनिंगच्या प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता जिल्ह्यात जिनिंगमध्ये कापूस … Read more

आता नागपूर कारागृहात सुद्धा लॉकडाऊन – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि.३० – कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील सात कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यात आता आठव्या नागपूर मध्यवर्ती कारागृहाची भर पडली असून, हे कारागृहही तातडीने लॉकडाऊन करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. यापूर्वीच्या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, कल्याण … Read more

लॉकडाऊन : वेळेचा नियोजनपूर्वक उपयोग आणि सकारात्मक संवाद हवा

अमरावती, ३० : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या कालावधीतील वेळेचा उपयोग जागरूकपणे करावा, या परिस्थितीला संयमाने सामारे जावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे मानसोपचार विभागाचे प्रमुख आणि अमरावती विभागाच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश साबू यांनी दिला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचे पाऊल … Read more

महाराष्ट्राला कोरोनामुक्त करुन राज्य सतत प्रगतीपथावर ठेवू या !

मुंबई, दि.३० : संत आणि विचारवंतांची तसेच क्षात्र पराक्रमाची भूमी अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्राने देशासाठी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. लोकहिताची जाण असलेल्या आणि बदलत्या परिस्थितीचे आव्हान पेलण्याची क्षमता असलेल्या स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचेसह अनेक मान्यवरांचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले. हा समर्थ वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. कोरोना सारख्या संकटावर सर्वांनी एकत्र येत मात करायची … Read more