कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रत्येकाने दिलेले योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल

बीड : उद्या शुक्रवार दि. १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना मी वंदन करतो; सध्या कोरोना या वैश्विक महामारीविरुद्ध सबंध महाराष्ट्र लढतो आहे. या लढाईमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला महाराष्ट्राचा इतिहास कायम स्मरणात ठेवेल अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र दिन … Read more

राज्यात ६९ लाख १६ हजार ७२२ क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि.३० :  राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून  एप्रिल २०२० मध्ये    राज्यातील १ कोटी ५६ लाख २ हजार ४३४ शिधापत्रिका धारकांना तब्बल ६९ लाख १६ हजार ७२२ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले  असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण … Read more

कुप्रसिद्ध गुंडाचा खात्मा करणाऱ्या अहमदनगरच्या सुपुत्राचे मुंबईत निधन ! मुलाने व्हिडीओ कॉलद्वारे वाहिली श्रद्धांजली…

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- मुंबई येथे पोलिस सेवेमध्ये असताना कुप्रसिद्ध गुंड माया डोळस गॅंगचा खात्मा करणाऱ्या टीममध्ये भाग घेऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने ज्यांचा गौरव केला असे श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावचे सुपुत्र सेवानिवृत्त पोलीस अंकुश ठवाळ यांचे बुधवार दि. २९ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास अल्पश्या आजाराने मुंबई येथे उपचारादरम्यान दुखःद निधन झाले. … Read more

राज्यातील ‘या’ शहरात कोरोनाचा हाहाकार ! कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला

मालेगावमध्ये कोरोनाने हाहाकार उडविला आहे. मालेगावात २४ तासांत कोरोनाचे ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २७६ कोरोनाबाधित असून एकट्या मालेगावात २५३ कोरोनाग्रस्त आहे. येथे ८०० पोलीस आणि एसआरपीएफ तुकडया तैनात करण्यात आल्या असूनही कोरोनाचा फैलाव आटोक्यात येताना दिसत नाही. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला. … Read more

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्यास जाळून मारण्याचा प्रयत्न

संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावत असताना झालेल्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यास मारहाण करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सायंकाळी माळशिरस तालुक्यातील मळोली गावाजवळ हा प्रकार घडला. मारहाण केल्यानंतर या आरोपीने थेट गाडीतील पेट्रोलची बाटली काढून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ओतून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याची फिर्याद … Read more

परराज्यात अडकलेल्या विद्यार्थी, नागरिकांना आणण्यासाठी आराखडा तयार करा

नागपूर, दिनांक 30:-‘लॉकडाऊन’मुळे राज्यात व राज्याबाहेर अडकून पडलेले विद्यार्थी, मजूर व नागरिकांना परत आणण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून अशा व्यक्तींची माहिती गोळा करून निधीसह तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयातून आज त्यांनी नागपूर विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी … Read more

महाविद्यालये सुरु होणार सप्टेंबरमध्ये असे असेल नियोजन

देशभरात कोरोनाने घातलेल्या धुमाकुळामुळे देशातील शैक्षणिक संस्थांचे काम बंद पडले आहे. साधारण जूनच्या सुमारास सुरू होणाऱ्या विद्यापीठांतील शैक्षणिक सत्राचा प्रारंभ सप्टेंबरमध्ये होणार आहे. आत्ताच्या सत्रातील परीक्षा शक्य झाल्यास येत्या जुलैमध्ये होतील, अशी चिन्हे आहेत. देशातील विद्यापीठांत शैक्षणिक सत्र कधी सुरू करायचे, परीक्षा कधी घ्यायच्या आदी मुद्द्यांबाबत विचार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विशेष समितीची स्थापना केली … Read more

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा

मुंबई दि ३०: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व व जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये

मुंबई, दि. ३० : कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत, उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज राज्य शासनामार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, अन्य कुठलेही आजार नसलेल्या आणि … Read more

स्नेहाची शिदोरी थेट गरजूंच्या दारी…

एक तीळ सात जणांनी वाटून खाण्याची, आपल्याकडे असलेल्या एक भाकरीतील अर्धी भाकरी समोरच्या उपाशी माणसाला देण्याची आपली भारतीय संस्कृती. आपण ज्या सामाजात राहतो त्या समाजाचे आपल्यावर अनंत उपकार असतात. या समाजाचे आपण काही देणे लागतो ही आपली शिकवण. या भावनेतूनच जळगाव येथील भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात गरीब … Read more

मुख्यमंत्रीपदाबाबत ठाकरे यांनी लावला थेट मोदींना फोन ; काय झालं संभाषण

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा राजकीय पेच निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळाने दोन वेळेस राज्यपालांची भेट घेतली आहे. या प्रस्तावावर विचार करतो, अशी सूचक प्रतिक्रिया राज्यपालांनी दिल्याचं महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. आता या पेचप्रसंगावर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटात राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे … Read more

असेल स्वच्छ चूल तर कोरोनामुक्त बनेल घरकुल !

  ‘स्वच्छ इंधन, सशक्त जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्‍वला योजनेतंर्गत जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील 2 लाख 24 हजार  महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. गॅस उपलब्ध करुन दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे महिलांच्या डोळ्यांवर व शरीरावर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम टाळण्यासाठी, ही योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे महिलांचे सक्षमीकरण तर … Read more

कालावधी लॉकडाऊनचा… मासळी उत्पादनाचा…!

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शारीरिक अंतर पाळण्याच्या नियमांची वैयक्तिक आयुष्यातही अंमलबजावणी होत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामध्ये मासेमारी व्यवसायाचाही समावेश होता. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करीत मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करण्याची परवानगी दिली. या … Read more

हातच सोडलं आणि आता आरोळ्या कुठं ठोकता ? कुकडीच्या पाण्याचे पाचपुते यांच्यामुळेच वाटोळे !

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- कुकडीचे आवर्तन पुन्हा सूरु व्हावे यासाठी काल व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात विद्यमान आमदारांनी पुणेकरांसोबत पंगा घेतल्याचा नुसता आव आणल्याचे नाटक केले. पण प्रत्यक्षात आवर्तन सुरू असताना कुकडीचे पाणी सर्व वितरिकेंना पाणी कसे मिळेल याकडे लक्ष दिले असते तर शेतकऱ्यांचे भले झाले असते. त्यावेळी … Read more

महाराष्ट्र सायबर विभाग : लॉकडाऊनच्या काळात ३३३ गुन्हे दाखल

मुंबई, दि. ३० – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात आतापर्यंत ३३३ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारासंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या ३३३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, … Read more

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा तिढा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली ? वाचा सविस्तर

सध्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुरु आहे. मंत्रिमंडळाने याबाबत राज्यपालांची भेट घेतली आहे. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. हे पत्र त्यांची दिशाभूल करणारे आहे. यापाठीमागे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी या हालचाली आहेत, असा थेट आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटल … Read more

मित्राचा वाढदिवस साजरा करणाऱ्या पोलीसासोबत झाले असे काही …

सोलापूर : संचारबंदी आदेशाचा भंग करून मित्राच्या वाढदिवसाला उपस्थित राहून वाढदिवस साजरा केल्याबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस शिपाई विनायक रामजी काळे (बक्कल नंबर ८१ ) त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी त्या पोलिसाला निलंबित केले आहे. घटनेची हकीकत अशी की करमाळा तालुक्यातील फिसरे येथील विकास विठ्ठल ननवरे यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांना … Read more

शेतकऱ्यांना निविष्ठा वेळेत उपलब्ध करा – पालकमंत्री जयंत पाटील

सांगली : खरीप हंगामासाठी आवश्यक असणारी खते, बियाणे, किटकनाशके शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. यासाठीचे आवश्यक ते सर्व नियोजन कृषी विभागाने करावे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बोगस बियाणे, खते, किटकनाशके यांची विक्री होणार नाही, तसेच जादा दराने विक्री होणार नाही, कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याबाबतची आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन … Read more