जीवनाश्यक वस्तूंंसाठी दुकानाची वेळ आता सकाळी ८ ते १२

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात नागरिकांचे रिपोर्ट सतत पॉझिटिव्ह येत असल्यामुळे २८ व २९ एप्रिल २०२० रोजी यवतमाळ शहरातील अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने दुपारी १२ ते ३ कालावधीत सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तसेच जिल्ह्यातील सर्व बँकेचे कामकाज दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत प्रशासनाने आदेशित केले होते. मात्र यात आता ३० एप्रिलपासून बदल … Read more

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या – पालकमंत्री

सातारा : खरीप हंगाम २०२० मध्ये खतांचा व बियाणांचा पुरवठा करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याची खातरजमा करावी. तसेच खतांच्या व बियाणांच्या बाबतीत कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहत संपन्न झाली. यावेळी … Read more

लॉकडाऊन कालावधीत राज्यात आतापर्यंत ८३ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि. २९ : लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ८३,१५६  गुन्हे दाखल झाले असून १६,८९७ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ९४ लाख ६६ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत राज्यभरात … Read more

सातारा जिल्ह्यातील बँकानी उद्दीष्टपुर्तीची परंपरा कायम ठेवावी – पालकमंत्री

सातारा : जिल्ह्याचा २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचा ८५०० कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखड्याचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकांनी नवीन पत आरखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुरवातीपासूनच प्रयत्न करण्यात यावे असे सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा प्राधान्याने करावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार श्रीमंत … Read more

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्या – पालकमंत्री सुनील केदार

भंडारा : शेतकऱ्यांनी एकच पीक वारंवार घेतल्यामुळे शेतीची सुपिकता नाहीशी होत आहे. पीक घेतांना फेरबदल करणे गरजेचे आहे. जमीनीच्या सुपिकतेसह शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल अशा पिकांची निवड कृषी विभागाने करावी व शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिले. जिल्हा परिषद सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीपपूर्व हंगाम आढावा बैठक घेण्यात … Read more

मालेगाव शहरासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे

मालेगाव, दि. 29 (उमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचे थैमान रोखण्यासाठी शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. मालेगाव शहरातील रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून यासाठी मालेगावातील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सुविधेसह नागरिकांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज … Read more

एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा असलेले स्वारातीम हे भारतातील पहिले विद्यापीठ – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे. या प्रयोगशाळेत एनएबीएल (नॅशनल अॅक्रेडीयशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन होऊन मिळवणारे हे भारतातील पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे मी अभिनंदन … Read more

पुन्हा एका कारखान्याच्या आवारात आग; मोठी दुर्घटना टळली !

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या आवारात काल दुपारी गोडाऊनच्या पश्चिम बाजुला असलेल्या वाळलेल्या गवताला आग लागली, परंतु सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. कारखाना व्यवस्थापनाने वेळीच प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. गणेश कारखान्याच्या पश्चिम बाजुला कारखान्याच्या आवारात साखर गोडावूनच्या शेजारी असलेल्या वाळलेल्या गवताला काल दुपारी 2.30 च्या सुमारास … Read more

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

मुंबई, दि. 29 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून दाखविलेला ‘ग्रामोन्नती’चा मार्गच राज्याला आणि देशाला विकासाकडे घेऊन जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराजांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण केलं आहे. तुकडोजी महाराज हे कृतीशील संत होते. … Read more

कोरोनामुक्तीसाठी मालेगाव शासनाच्या केंद्रस्थानी

नाशिक, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोना मुक्तीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने व समन्वयाने काम करीत असून संपूर्ण राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ मालेगांव हे कोरोनाच्या दृष्टीने अतिजोखीमेचे ठिकाण आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्य शासनाच्या दृष्टीने कोरोनामुक्तीसाठी सर्वोच्च केंद्रस्थानी असून मालेगावसाठी कुठलीही तडजोड करू नये, अशा सूचना आज संयुक्तपणे पालकमंत्री छगन … Read more

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

पुणे दि.२९ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासोबतच नरेगा अंतर्गत ग्रामीण तसेच नगरपंचायत क्षेत्रात सोशल डिस्टिसींग ठेवत आवश्यकता आहे त्या ठिकाणी कामे तात्काळ सुरू करा तसेच  कायदा व सुव्यवस्थेबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे सांगतानाच  प्रतिबंधित क्षेत्राबाबत सुक्ष्म नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर … Read more

ससूनच्या सोईसुविधांचा विभागीय आयुक्तकडून आढावा

पुणे, दि.२९ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.  दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात ससून रुग्णालयाच्या विविध विभाग प्रमुखांकडून ससून रुग्णालयात उपलब्ध व आवश्यक सोईसुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय तावरे, भूमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक तथा  समन्वय अधिकारी राजेंद्र … Read more

अन्यथा जिनिंगवर कडक कारवाई करा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच शासनाकडून हमीभाव जाहीर होत असतो. या हमीभावाने शेतमालाची खरेदी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. शेतकऱ्यांचा कापूस सध्या घरात आहे. या कापसाची तात्काळ खरेदी केली तर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हाती पैसे येतील. त्यामुळे कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगला निर्देश देण्यात यावे. अन्यथा चालढकल करणाऱ्या जिनिंगवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी … Read more

कोरोनाच्या प्रभावी उपाययोजनासाठी सहकार्य करा – पालकमंत्री

नागपूर, दि. २९ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून जीवितहानी टाळण्यासाठी कठोर निर्बेंध लागू करण्यात आले आहेत. संकटाच्या या परिस्थितीत सर्व जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. नागपूर शहरातील मुफ्ती, मौलाना, समाजसेवक व बुद्धीजिवी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते … Read more

कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास बँकांविरूद्ध एफआयआर – पालकमंत्री

अमरावती : खरीप पीक हंगामासाठी शेतकरी बांधवांना पतपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी वंचित राहता कामा नये. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखा. कर्ज मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी आल्यास खपवून घेतले जाणार नाही. कर्जपुरवठ्यात हयगय केल्याचे आढळल्यास बँकांवर एफआयआर दाखल करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. जिल्हा खरीप हंगाम २०२०-२१ नियोजन बैठक पालकमंत्री श्रीमती … Read more

चित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल असाच आहे. … Read more

तडफदार तरुण नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २९ : नाविद अंतुले यांच्या आकस्मिक  निधनामुळे एक तरुण तडफदार नेतृत्व आपल्यातून गेले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाविद अंतुले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, नाविद यांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळाली आणि धक्का बसला. वडील माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र अशी त्यांची ओळख असली तरी … Read more

अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 29 : अभिनेता इरफान खान यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टी, कलाजगतासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या अकाली निधनानं एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्वं आपण गमावलं आहे. सहजसुलभ अभिनयातून साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांमुळे इरफान खान कायम रसिकांच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली. अभिनेता म्हणून इरफान खान निश्चितच महान … Read more