कोरोनामुक्तीचा अध्याय लिहिला दोन योद्ध्यांनी!

फक्त दहा महिन्याचं बाळ… आज कोरोना मुक्त झालं… त्याला माहितही नसेल तो आज केवढं मोठं संकट लिलया पेलून सुखरूप बाहेर पडला… आई – वडिलांची हिम्मत धरून मागचे दोन आठवडे ज्या धीरोदत्तपणे काढले…  त्यांच्या आनंदाला आज पारावार राहिला नसेल. 12 एप्रिलला 10 महिन्याचे बाळ पॉझिटिव्ह आल्याची बातमी आली.. त्यावेळी जिल्ह्याच्या मनात धस्स झालं… बाळ बरं व्हावं असे … Read more

कोटा येथे अडकलेले २७ विद्यार्थी व ७ पालक सुखरुप परत

अलिबाग, जि. रायगड, दि.28 :  राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थीही गेले होते. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी … Read more

इरफान खान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई, दि. २९ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. इरफान खान यांचे निधन धक्कादायक आहे. इरफान खान हे सामाजिक जाण असणारे प्रतिभावंत कलाकार होते. आपल्या सशक्त अष्टपैलू अभिनयामुळे त्यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमधील भूमिका संस्मरणीय केल्या. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या … Read more

‘हरहुन्नरी’ अभिनेता गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि २९ : एक कलाकार म्हणून प्रत्येक सिनेमात अभिनयाचा दर्जा वाढविणाऱ्या इरफान खान यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने ‘हरहुन्नरी’ अभिनेता गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली. अमित देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, इरफान खान यांच्या डोळ्यातील चमक, सहज अभिनय, पडद्यावरचा सुंदर वावर यामुळेच त्यांनी प्रत्येक सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली. टि.व्ही पासून … Read more

जीवनावश्यक वस्तुंच्या किराणा किटचे मोफत वाटप

मुंबई, दि. २९ : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोडणी करून जिल्ह्यात परतलेल्या मजुरांसाठी महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून आता जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना २८ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीसाठी म्हणून जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे. बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून यासाठी प्राथमिक स्वरूपात १ कोटी ४३ लाख रुपये … Read more

माहितीचे संरक्षण, चांगले इंटरनेट नेटवर्क यांच्या पूर्ततेचे मोठे आव्हान – राज्यमंत्री सतेज पाटील

मुंबई, दि. २९ : कोरोनामुळे भविष्यात निदान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तरी घरातूनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) ही नित्याची गोष्ट होवून जाईल. त्यामुळे राज्यातील माहितीचे संरक्षण आणि सुरक्षा, चांगले इंटरनेट नेटवर्क यांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान असेल. या सर्वांचा विचार करुन यासंदर्भातील पायाभूत सुविधा उभारणे व घरातून काम करण्याच्या नियमांची चौकट तयार करण्यावर भर दिला … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- महाराष्‍ट्र राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरूवार दि.30 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय निवासस्‍थान, मुंबई येथुन शासकीय मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन … Read more

लॉकडाऊनमध्येही त्यांनी शोधला रोजगाराचा मार्ग

दि २९ अहमदनगर वय वर्ष १८ पूर्ण झाल्याने अनाथ विद्यार्थ्यांना अनाथाश्रमाबाहेर पडावे लागते. अशा काही युवकांना रोजगार मिळावा, यासाठी ‘युवान’ ह्या सामाजिक संस्थेमार्फत क्रिसील रेच्या सहकार्याने ‘इको युवान’ हा ज्युट व कापडी पिशवी निर्मितीचा प्रकल्प ३ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला होता. त्यासाठी आवश्यक अद्यावत प्रशिक्षण वंचित युवक- युवतींना देण्यात आले. प्रशिक्षणानंतर उच्च दर्जाच्या आकर्षक बॅग्ज … Read more

आशा व गटप्रवर्तकांना किमान 12 हजार वेतन देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूच्या महामारीने उभे केलेले आवाहन परतावून लावण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्या बरोबरच प्रत्यक्षात गावपातळीवर व शहरातील विविध भागात स्वतःला झोकून देऊन काम करणार्‍या आशा व गटप्रवर्तक महिलांना 12 हजार 798 रुपये एवढा महिन्याला किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, … Read more

जावई पोलिसाने ‘अशी’ केली सासुरवाडीवर कारवाई !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 / कराड :- ग्रामदैवताच्या यात्रेनंतर बोकडांच्या मेजवानीने साजरी होणारी पाल जत्रा मेंढ (ता. पाटण) येथील गावकऱ्यांना भलतीच महागात पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असतानाही सायंकाळी सुरू असलेल्या या यात्रेवर पोलिसांनी अचानक छापा टाकल्याने चुलींवर शिजणारे मटण तिथेच सोडून डोंगरातून सैरावैरा पळून जाण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. याप्रकरणी पोलिसांनी २१ जणांवर … Read more

दहावीचा निकाल ‘इतके’ दिवस लांबणार!

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :-  कोरोना विषाणूच्या संकटाने शैक्षणिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, त्यामुळे दहावीचा निकाल यंदा आठवडाभर उशिराने लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे उत्तरपत्रिका तपासणीला काहीसा विलंब झाल्याने दहावी परीक्षेचा निकाल निर्धारित वेळेपेक्षा आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे. संचारबंदीमुळे उत्तरपत्रिकांच्या संकलनावरदेखील … Read more

रोहित पवार म्हणाले कर्जत-जामखेडला कोणत्याही वेगळ्या पॅटर्नची गरज नाही …कारण

अहमदनगर Live24 :- आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेड शहरातील प्रत्येक कुटुंबीयांचा सर्वे करुन आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू आहे. नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे सर्वे होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. जामखेड शहरातील कोरोना बाधीतांची संख्या ही आता १७ वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आपण देशाला नक्की वाचवू – डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24  :- कोरोनाच्या संकटावर मात करण्यात देशाने चांगले काम केले असून अशावेळी प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आणि निर्णयामुळे आपण देशाला नक्की वाचवू, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. येथील जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातुन काल तालुक्‍यातील मुंगी, चापडगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, आव्हाणे, अमरापुर येथील गरजूना जीवनावश्‍यक साहित्याचे … Read more

नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

शिर्डी, दि.28 : राज्यामध्ये  लॉकडाऊन लागू केल्यानंतरही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. काही ठिकाणी अनावश्यक गर्दी होत आहे. हे अतिशय चिंताजनक आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संगमनेर येथील उपाययोजनांबाबत आढावा घेताना केले. नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश जाजू, प्रकाश … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय – गृहमंत्री अनिल देशमुख

जळगाव, (जिमाका) दि. 28 : कोरोनाची साखळी तोडून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याची कोरोनाचा परिस्थिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री यांनी आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. … Read more

अमळनेरकरांनो, घरातच रहा, सुरक्षित रहा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांच्या सहकार्याची जोड आवश्यक आहे. याकरीता नागरिकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत घरात राहून सुरक्षित रहावे. जेणेकरुन आपण कोरोनाचा प्रादुर्भाव निश्चितपणे रोखू शकू, असा आशावाद पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी … Read more

कोटा येथे अडकलेले 32 विद्यार्थी रायगडकडे रवाना

अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका) :  राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. पालकमंत्री कु.तटकरे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माहितीचे संरक्षण, चांगले इंटरनेट नेटवर्क यांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान

मुंबई दि.२८ :-   कोरोनामुळे भविष्यात निदान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तरी घरातूनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) हे नित्याची  गोष्ट होऊन जाईल. त्यामुळे राज्यातील माहितीचे संरक्षण आणि सुरक्षा, चांगले इंटरनेट नेटवर्क यांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान  असेल. या सर्वांचा विचार करुन या संदर्भातील पायाभूत सुविधा उभारणे व घरातून काम करण्याच्या नियमांची चौकट तयार करण्यावर भर दिला … Read more