न्याय मिळावा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी मयत शिंदे कुटुंबीयांची मागणी.

अहमदनगर :- सनी शिंदे या युवकाचा खून करुन, सदर प्रकरण मागे घेण्यासाठी संबंधीत आरोपी कुटुंबीयांना धमकावून मानसिक पिळवणुक करीत असताना त्यांना पोलीस प्रशासन पाठिशी घालत असल्याने इच्छा मरणाची परवानगी मिळण्याची मागणी शिंदे कुटुंबीयांनी केली. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार माधुरी आंधळे यांना देण्यात आले. यावेळी शरद शिंदे, रेखा शिंदे, नंदा घोडके, बाळासाहेब शिंदे, अरुण घोडके, … Read more

आत्मघातकी हल्ल्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

अहमदनगर :- जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम समाज व मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने कापड बाजार येथे आतंकवादीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले. तर पाकिस्तान मुर्दाबाद…, भारत माता की जय…, इन्कलाब जिंदाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हाजी मन्सूर शेख, कासमभाई … Read more

“हमें एक जवान के बदलेमे दुष्मनोंके एक हजार सीर चाहिए”

शेवगाव :- शहरात आज सकाळी मोर्चा काढून “पाकिस्तान मुर्दाबाद.. शहीद जवान अमर रहे… पाकिस्तानला ठेचून काढा… हिंदुस्तान हम शरमिंदा है, हमारे जवानोंके कातील अभी जिंदा है..”अशा घोषणा देऊन सर्वसामान्य जनतेने आपला तिव्र संताप व्यक्त केला. मोर्च्याची सांगता शिवाजी चौकात सभा घेऊन करण्यात आली. या मोर्च्यामधे शेवगाव येथील अनेक मुस्लीम बांधवांनी भाग घेतला. सर्वप्रथम शहीद झालेल्या … Read more

माजी आ.अनिल राठोड यांना हद्दपारीची नोटीस

अहमदनगर :- दोन वर्षांसाठी आपणास जिल्ह्यातून हद्दपार का करू नये,’ अशी विचारणा करणारी नोटीस माजी आमदार अनिल राठोड यांना उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी बजावली. उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून हा अहवाल शहर विभागाचे पोलिस उपाधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात … Read more

महाविद्यालयीन युवतीचा शेततळ्यात पडून मृत्यू.

राहाता :- हरभरा धुताना शेततळ्यात पडून १७ वर्षांच्या महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला. ही घटना राहाता शहरातील पंधरा चारी भागात शुक्रवारी दुपारी घडली. सायली विजय सदाफळ ही विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत कोऱ्हाळे येथील श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. शुक्रवारी दुपारी हरभरा खाण्याकरिता ती शेतात गेली होती. हरभरा घेतल्यानंतर तो धुण्याकरिता त्यांच्याच मालकीच्या शेततळ्यावर ती गेली. हरभरा धुताना … Read more

तीन दिवसांत छावण्या सुरू होणार !

अहमदनगर :- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार पशुधनाला दिलासा देण्यासाठी येत्या तीन दिवसांत छावणीसाठी दाखल परिपूर्ण प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची मोहर उमटणार आहे. याच आठवड्यात छावणी सुरू होईल, अशी ठाम ग्वाही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.गतवर्षीच्या पाणकाळात जिल्ह्याच्या शिवाराकडे पावसाने पाठ फिरवली. खरीप पाठोपाठच रब्बीचा हंगामही बुडाला. घटलेल्या जलस्तरामुळे शेतकऱ्यांच्या सालचंदीचा आधार असणाऱ्या खळ्या-दळ्यांना … Read more

सुजय विखे म्हणतात तुम्ही जेवढे वाकड्यात शिराल, तेवढाच मी ही वाकड्यात शिरु शकतो…

संगमनेर :- थोरात गटाचा वाढता हस्तक्षेप आता सहनशिलतेच्या पलिकडे गेला आहे. इतकी वर्षे आम्ही तुमचा त्रास सहन केला. पण आता आमचा संयम सुटला आहे, अशी टीका डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे. निमोण येथे सरपंच संदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थित युवक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  तुम्ही … Read more

‘आय लव्ह यू’ म्हणणार्‍याची महिलांसह नागरिकांकडून यथेच्छ धुलाई !

श्रीरामपुर :- एका महिलेकडे पाहून ‘आय लव्ह यू’ म्हणणार्‍या एका आंबट शौकिनाची या महिलेसह जमलेल्या महिलांनी व नागरिकांनी यथेच्छ धुलाई केल्याची घटना घडली. श्रीरामपूर शहरातील डावखरवस्ती परिसरात काल सकाळी एक महिला जात असताना परिसरातील एका आंबट शौकिनाने सदर महिलेस ‘आय लव्ह यू’ म्हणत अश्‍लिल चाळे केले. येता-जाता नेहमी त्रास देणार्‍या या आंबट शौकिनाचे हे वर्तन … Read more

अल्पवयीन मुलीला मारहाण करून विनयभंग,सात जणांविरुद्ध गुन्हा.

श्रीगोंदा :- तालुक्यातील एका गावातील संगणकाचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. हा प्रकार दि. ९ रोजी शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी संगणकाचे शिक्षण घेते. दि. ९ रोजी शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सात जणांचा जमाव सदर मुलीच्या घरी गेला … Read more

एमआयडीसीमध्ये टेम्पो लावून देतो असे सांगून आमदार होता येत नाही !

पारनेर :- विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी मी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. तुम्ही पक्ष पक्ष बदलला, पत्नीच्या जि. प. सदस्यपदाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्याची हिंमत दाखवा. समोरासमोर लढून पाहू लोक कोणासोबत आहेत, असे खुले आव्हान विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी नीलेश लंके यांचे नाव न घेता दिले. नारायण गव्हाण येथे चुभळेश्वर मंदिराच्या रस्त्याचे … Read more

नगरची मतदान यंत्र तडकाफडकी बदलली.

अहमदनगर :- नगर जिल्ह्याला प्राप्त झालेले आणि प्रात्यक्षिके पूर्ण होऊन मतदानासाठी सज्ज झालेली यंत्रे निवडणूक आयोगाने तडकाफडकी बदली करण्याचा घाट घातला आहे. नगर जिल्ह्याकडे असणाऱ्या सध्याच्या ईव्हीएम मशिन या इतर जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहेत. हैद्राबाद येथून नव्याने तयार झालेल्या मशिन आणण्याची सूचना निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. लोकसभा निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात. या … Read more

शौचालयासाठी गेलेल्या महिलेचे मोबाइलमधे चित्रीकरण करुन विनयभंग.

शेवगाव :- शेतात शौचालयासाठी गेलेल्या महिलेचे मोबाइलमधे चित्रीकरण करुन विनयभंग केल्याची घटना रविवारी शेवगाव शहरालगच्या एका गावात घडली. चित्रीकरण इतरांना दाखविण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरालगतच्या गावात एक महिला आपल्या मुलीसोबत राहते. महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. सदर महिला तीन फेब्रुवारी रोजी सकाळी स्वतःहाच्या शेतात … Read more

खा.शरद पवार यांनी नगर दक्षिणेतून लोकसभा लढवावी.

अहमदनगर :- जिल्ह्याच्या दक्षिण भागात तिव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने या भागात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे प्रश्न सोडवण्यात विद्यमान खासदार अपयशी ठरले आहेत. विविध प्रश्न सोडवण्यासाठी आता माजी मंत्री शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक नगर दक्षिण मतदारसंघातून लढवावी अशी मागणी महाराष्ट्र युथ कौंन्सिलचे अध्यक्ष रणजीत बाबर यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीची जागा काँग्रेसला मिळावी … Read more

तापमान घसरल्याने नगरकर गारठले !

अहमदनगर :- थंडीने पुन्हा उच्चांक गाठला आहे. गेल्या अकरा वर्षांत सर्वात कमी तापमान शुक्रवारी नोंदवले गेले. शुक्रवारी नगर शहराचे तापमान ४.४ अंश सेल्सिअस होते. तापमान घसरल्याने नगरकर देखील गारठले आहेत. गेल्या अकरा वर्षांत प्रथमच सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून थंडीचा कडाका कमी होतो. मात्र जानेवारी संपून आठ दिवस उलटले, तरी थंडी कमी … Read more

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार,धर्मांतरासाठी दबाव !

पारनेर :- तालुक्यातील एका १९ वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांपासून अत्याचार केल्याची फिर्याद या तरुणीने पारनेर पोलीस स्टेशनला दिली आहे. फिरोज हसन राजे वय-२८, याच्या विरोधात पारनेर पोलिसांनी बाललैंगिक विरोधी कायद्या अंतर्गत व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर शहरालगत वस्तीवर राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने पारनेर … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वरातीमागून घोडे कशासाठी?

अहमदनगर :- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे उपोषण वाजत गाजत संपले. पण ज्या प्रश्‍नासाठी 2011 मध्ये आणि आता उपोषण करण्यात आले तेंव्हाचे प्रश्‍न आजही प्रलंबीत आहेत. जनलोकपाल कायदा आनण्यासाठी अण्णांचे उपोषण संघाच्या साथीने देशासह-परदेशात गाजले. या आंदोलनामुळे काँग्रेसला सत्तेपासून पायउतार व्हावे लागले तर भाजपला राज्यासह केंद्रात सत्ता काबीज करता आली. सध्या भ्रष्टाचाराने उग्ररुप धारण केले असताना … Read more

श्रीगोंद्याची कन्या दौंड पंचायत समितीच्या सभापती !

दौंड :- पुणे जिल्ह्यातील दौंड पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताराबाई देवकाते यांची आज दुपारी बिनविरोध निवड झाली. देवकाते या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीच्या कन्या आहेत. राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दौंड पंचायत समितीच्या सभापती पदासाठी शुक्रवारी निवडणूक होती. सभापतीपदी ताराबाई देवकाते यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. देवकाते यांचे माहेर … Read more

माजी मंत्र्यांनी ३५ वर्षे केवळ फक्त थापा मारण्याचे काम केले !

श्रीगोंदा :- सर्वसामान्य जनतेने विश्वास ठेवून काम करण्याची संधी मला दिली आहे.त्या संधीचे सोने करणार आहे. केवळ थापा मारण्याचे व नारळ फोडण्याचे काम मी करत नसून, प्रत्यक्ष काम सुरु झाल्याशिवाय कधीही नारळ फोडत नाही. या परिसरातील उर्वरीत कामांचा पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल व ती कामे देखील लवकर होतील. या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा … Read more