शिर्डीत धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट ! अजित पवारांना पक्षातून बाहेर करण्याचे षडयंत्र…

Shirdi News : शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा खुलासा करत अजित पवारांना पक्षातून बाहेर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा दावा केला. पक्षफुटीनंतर भरवलेल्या या पहिल्या अधिवेशनात मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीपासून बीडमधील परिस्थितीवर भाष्य करत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. अजित पवारांना शपथविधीला जाऊ नये, अशी विनंती केली होती … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार का ? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच एका वाक्यात उत्तर…

जिल्हा बँकेच्या कामकाजाबाबत त्यांनी सांगितले की, बँकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून राष्ट्रीय पातळीवर तिची कामगिरी उल्लेखनीय आहे. बँकेच्या भरती प्रक्रियाही योग्य पद्धतीने सुरू आहे. बँकेची बदनामी करणाऱ्या लोकांच्या हेतूवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शिर्डी साई मंदिरातील समाधीवर जमा होणाऱ्या पैशांचा वाद ! आमदार जगताप म्हणाले ते लोक पैसे घरी घेऊन जातात…

MLA Sangram Jagtap

शिर्डी साई मंदिर परिसरातील समाधींवर जमा होणाऱ्या पैशांच्या व्यवस्थापनावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी अब्दुलबाबा समाधीवरील जमा होणारा पैसा खाजगी लोक घरी नेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे सांगून, हा पैसा थेट सरकारकडे जमा व्हावा, अशी मागणी केली आहे. समाधींचा … Read more

आता आमदार संग्राम जगतापांच मिशन शिर्डी ! आक्रमक भूमिका आणि थेट हिंदुत्वाचा मुद्दा

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नवसंकल्प शिबिरात आमदार संग्राम जगताप यांनी संवाद साधताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. तसेच, साई समाधी मंदिरातील चौथ्या समाधीचे उत्पन्न सरकारला मिळावे, अशी ठाम मागणी केली. चौथ्या समाधीच्या उत्पन्नावर सरकारचा हक्क साई मंदिर परिसरात चार समाधी आहेत, परंतु चौथ्या समाधीचे उत्पन्न थेट समाधी सांभाळणारे घेत असल्याचे सांगून संग्राम … Read more

तीन वेळा आमदार, पण मंत्रीपद हुकले ! अखेर आमदार संग्राम जगताप मनातलं बोलले…

Sangram Jagtap News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात सहभागी झालेले अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी ऐनवेळी मंत्रिपदाची संधी हुकल्याचे कारण स्पष्ट केले आहे. तसेच, पुढील काही काळात मंत्रीपद मिळण्याबाबत त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तीन वेळा आमदार, पण मंत्रीपद हुकले संग्राम जगताप हे अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. महायुती सरकारमध्ये त्यांना यावेळी मंत्रीपद … Read more

सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले…

Ahilyanagar Politics : अकोळनेर येथे डॉ. सुजय विखे पाटील, आ. शिवाजीराव कर्डिले आणि आ. काशिनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की, “दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही, माझी सेवाव्रताची भूमिका कायम … Read more

Shirdi Breaking : शरद पवार गटाला मोठा धक्का ! शिर्डीत होणार ‘त्या’ आमदारांचा पक्षप्रवेश

शरद पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण याआधीच विधानसभा निवडणुकीच्या काळात सतीश चव्हाण यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला होता. आता मात्र ते पुन्हा अजित … Read more

Ahilyanagar BJP :कोण होणार अहिल्यानगर भाजपचे अध्यक्ष ? ही नावे आहेत चर्चेत

Ahilyanagar News : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये आता संघटनात्मक बदलावर भर दिला जात आहे. शहर जिल्हाध्यक्षांसह दक्षिण व उत्तर जिल्हाध्यक्ष बदलण्याची तयारी सुरू असून, या पदांसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. सत्ता स्थापनीनंतर भाजपने ‘संघटनात्मक पर्व २०२५’ हाती घेतले आहे, ज्याअंतर्गत नव्या निवडी केल्या जाणार आहेत. पहिल्यांदाच शहर व जिल्हा पातळीवरील नियुक्तीनंतर थेट … Read more

अमित शाहांची तडिपारी दरोडा,चोरीसाठी नव्हती ! भाजप नेते विनोद तावडेंचे पवारांवर टीकास्त्र

१६ जानेवारी २०२५ मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची तडिपारी दरोडा चोरीसाठी नव्हती.अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीनसारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी यांच्या एन्काऊंटरमध्ये तडिपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल,असे प्रत्युत्तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीतील … Read more

केजरीवाल, सिसोदियांविरुद्ध हवालाकांडाचा खटला चालणार ; दिल्लीच्या रणधुमाळीत अडचणी वाढल्या

१६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल व त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात वादग्रस्त मद्य धोरण प्रकरणी खटला चालवण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) बुधवारी परवानगी दिली.यापूर्वीच दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी खटल्याला मंजुरी दिली.त्यामुळे ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपच्या दोन्ही बड्या नेत्यांना … Read more

खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ईडीचा हस्तक्षेप का नाही ? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल…

१६ जानेवारी २०२५ पुणे : परभणी असो किंवा बीडमधील हत्या प्रकरणात मी कधीही राजकारण केले नाही.विविध समाज माध्यमे आणि इतर ठिकाणांहून उपलब्ध माहितीनुसार, बीड मध्ये मे महिन्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.गंभीर विषय पुढे येत असताना ईडीचा हस्तक्षेप अजून का झाला नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला. पुणे महापालिकेतील विकासकामांबाबत … Read more

बीड प्रकरणातील दोषींना थारा दिला जाणार नाही : अजित पवार

१५ जानेवारी २०२५ मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे.या घटनेत जे कोणी दोषी असतील, त्यांना थारा द्यायचा नाही,असे राज्य सरकारने मनोमन ठरवले आहे.त्यामुळे या प्रकरणात कुणीही दोषी असेल आणि त्याचे धागेदोरे तपासात मिळाले तर त्यांना आम्ही सोडणार नाही. तसेच गुन्हेगारी प्रकरणात मकोका लावला जाणे ही कायद्याची प्रक्रिया … Read more

मोठी बातमी : अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी पुन्हा जोरात !

अहिल्यानगर, 14 जानेवारी 2025 – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा जोर मिळाला आहे. यावेळी ही मागणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मातीपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. अहिल्यानगर जिल्ह्याचे दोन मुख्य भाग आहेत – दक्षिण अहिल्यानगर जिल्हा आणि उत्तर … Read more

जावई-सासरे एकत्र आले, अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा उचलला !

अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी अचानक अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा उपस्थित करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. त्यानंतर, त्यांच्या सासऱ्यांनी, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी देखील या मुद्द्यावर आपले समर्थन व्यक्त केले आहे. यामुळे आगामी काळात अहिल्यानगर जिल्हाच्या विभाजनाचा मुद्दा आणखी तापू शकतो. जिल्हा विभाजनाची मागणी … Read more

ठाकरेंनी उचलल मोठ पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ ! पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे फडणवीसांसोबत…

अमरावती : महाविकास आघाडीत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भाजपसोबत येण्याच्या चर्चांना वाव मिळाला आहे. स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी भाकित केलं की, उद्धव ठाकरे पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील. रवी राणा आणि त्यांच्या पत्नी, माजी खासदार नवनीत राणा … Read more

रोजगार संपवून भाजपने खेडे भकास केले ! आ. विजय वडेट्टीवार यांची संगमनेरात टीका

१४ जानेवारी २०२५ संगमनेर : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत जनतेची फसवणूक आणि बेनामी करून बहुमत मिळवत महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे.तुम्ही महाराष्ट्रात कुठे ही फिरले तरी जनतेच्या मनात अजिबात उत्साह किंवा चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. सत्तेवर असलेल्या महायुतीच्या सरकारनेच खेडेगावातील रोजगार संपवून खेडे भकास केली आहेत.अन् आता हेच म्हणतात की खेड्याकडे चला,अशी जोरदार टीका विधानसभेचे माजी … Read more

पारनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर दि.१३- पारनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. पारनेर येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मंत्री श्री.विखे पाटील बोलत होते. बैठकीस आमदार काशिनाथ दाते, उपविभागीय अधिकारी श्रीकांत चिंचकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, … Read more

अमृतवाहिनीत रंगला पतंग महोत्सव, मा.मंत्री थोरात यांनीही घेतला पतंग उडवण्याचा आनंद ! अमृतवाहिनीत 10 हजार विद्यार्थ्यांच्या सहभागात पतंग महोत्सव

गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत मेधा महोत्सव अंतर्गत मकर संक्रात निमित्त झालेल्या पतंग महोत्सवात सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत या भव्य दिव्य पतंग महोत्सवाचा आनंद लुटला. यावेळी मेधा महोत्सवाचा शुभारंभ बरोबर चांगल्या अभ्यासासाठी आणि जीवनासाठी माझी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अमृतवाहिनीच्या शेती व शिक्षण … Read more