वंचित बहुजन आघाडीचे स्मशानभूमीत सरन रचत आंदोलन, हाथरस प्रकरणाचा केला निषेध

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  वंचित बहुजन आघाडी ने आज स्टेशन रोडवरील स्मशानभूमीत आंदोलन करत हाथरस प्रकरणाचा निषेध केला. यावेळी योगी सरकारच्या विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच स्मशानभूमीत सरन रचत तेथे बसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. हाथरस प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहे. नगरमध्येही आज वंचित बहुजन आघाडीने स्मशानभूमीत … Read more

देशात लोकशाही आणण्यासाठी राजकीय, सामाजिक परिवर्तनाची गरज

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  सत्ताधारी हुकुमशाही पध्दतीने कारभार करीत आहे. शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबवून लोकशाही पायदळी तुडवत आहे. राज्यकारभार घटनेला अनुसरुन चालताना दिसत नाही.याचा सर्वसामान्यांनी गाभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दलित व अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार होताना दिसत असून, देशात लोकशाही आणण्यासाठी व आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी एकजुटीने राजकीय, सामाजिक परिवर्तनाची मशाल … Read more

लवकरच लिंकरोड पुलाचे काम पूर्ण होणार : सभापती मनोज कोतकर

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- केडगाव उपनगराच्या विकासासाठी व विस्तारीकरणासाठी आ. संग्राम जगताप यांनी लिंकरोडच्या कामासाठी दीड कोटी रुपये व त्यावरील खोकर नदीवरील पुलासाठी १ कोटी रुपयांचा निधी असा सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करुन आणला व कामाला सुरुवातही झाली. रस्त्याचे व पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आणि कोरोनामुळे संपूर्ण देशात … Read more

आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- आमदारकी गेल्यापासून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आजवर दडपशाही करून ठेवलेले कार्यकर्ते आता दूर गेल्याने त्यांना त्यांच्या अस्तित्वाची चिंती लागली आहे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी शिवसेनेची नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी. अशी टीका अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव बेरड यांनी केली. माजी … Read more

‘शिवसेना संपवायची व राष्ट्रवादीची ताकद वाढवायची हा शरद पवारांचा हेतू’

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- सध्या कोरोनामुळे लोकांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री बाहेर फिरत नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र या वयातही बाहेर फिरतात. याचा अर्थ शिवसेना संपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बाहेर फिरू दिले जात नाही. राष्ट्रवादीची संघटना वाढविण्याचा त्यामागे हेतू दिसतो, या सर्वामागे असा हेतू दिसतोय की शिवसेना … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेत यंदा बांधली केवळ ‘इतकीच’ घरे; जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) यावर्षी फ्लॉप झाल्याचे दिसत आहे. यावर्षी ग्रामीण भारतातील पक्के घरांची संख्या नीचतम पातळीवर पोहोचली आहे. यावर्षी केवळ 0.06 टक्के घरे बांधली गेली आहेत. अशा परिस्थितीत सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  31 मार्च 2022 पर्यंत 2.47 कोटी घरांचे उद्दीष्ट :-31 मार्च 2022 पर्यंत … Read more

नगर शिवसेना गटबाजीचा वाद पोहचला मुख्यमंत्र्यांच्या दारी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- दिवंगत नेते अनिल भैय्या राठोड यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच शहरातील शिवसेनेमधील गटबाजी उफाळून आली आहे. दरदिवशी आरोप- प्रत्यारोप होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जाऊन पोहचले आहे. नगरमध्ये शिवसेना पक्षात गटातटाचे राजकारण सुरू राहिल्यास शिवसेनेला याची मोठी किंमत मोजावी लागेल. अजूनही वेळ गेलेली … Read more

कर्डिलेंचे मानसिक संतुलन बिघडले; राष्ट्रवादीच्या नेत्याचे वादग्रस्त विधान

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पक्षातील अंतर्गत वाद, गटबाजीचे प्रकरणे ताजी असतानाच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने चक्क माजी आमदारावर खालच्या पातळीची टीका केली आहे. आमदारकी गेल्यापासून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आजवर दडपशाही करून ठेवलेले कार्यकर्ते आता दूर गेल्याने त्यांना त्यांच्या अस्तित्वाची चिंती … Read more

द्विपक्षीय नवनिर्वाचित सभापतींनी केले सभेचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापदी पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मनोज कोतकर यांनी स्थायी समितीची सभा निश्‍चित केल्याची चर्चा महापालिकेत सुरु आहे. दरम्यान हि सभा शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सभापतिपदी वादग्रस्त निवड झाल्यानंतर सुरू झालेली चर्चा थांबविण्यासाठी मनोज कोतकर यांनी स्थायी समितीची घाईघाईने सभा … Read more

नगरकरांना खड्ड्यांपासून सुटका मिळणार; महापौरांनी दिला ‘हा’ आदेश

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-   शहरातील खड्डे व नादुरुस्त रस्त्यावरून शहरातील राजकारण सध्या चांगलेच चर्चेत आहे. लोकप्रतिनिधी यांच्यासह महापौरांनी या सस्म्या सोडविण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. दरम्यान येत्या काळात नगरकरांना खड्डे व खडमडीत रस्त्यांचा सामना करावा लागणार नाही, अशी अशा व्यक्त केली जाऊ शकते. शहरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यात शहरातील ओढ्या-नाल्यांवर इमारती … Read more

कोविडचा काळ हा सर्वांसाठी कठिण अनुभव : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-   एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यासह शहरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन केले. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांचे हातातील काम गेल्यामुळे अनेकजण आर्थिक संकटात सापडला असल्यामुळे त्याला अन्नधान्य व किराणाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळत चालल्यामुळे रुग्णांना … Read more

नगर तालुक्यातील सर्व रस्त्यांची डांबराने पॅचिंग करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- पावसामुळे नगर तालुक्यातील अनेक रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असून, रस्त्यावरील खड्डे लहान-मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. तातडीने रस्त्यांची डांबराने पॅचिंग करण्याच्या मागणीसाठी नगर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आला. या आंदोलनात नगर तालुकाध्यक्ष गहिनीनाथ दरेकर, गजानन भांडवलकर, अक्षय भिंगारदिवे, वैभव म्हस्के, विशाल म्हस्के, विकास … Read more

हाथरसच्या घटनेचा निषेध नोंदवून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवून शहरातून कँडल मार्चसह संविधान रॅली काढण्यात आली. धर्मांध सरकारमुळे देशात मुलगी व संविधान धोक्यात असल्याचा आरोप करीत हिटलशाही भाजप हटाव लोकशाही बचावच्या घोषणा देण्यात आल्या. तर हाथरस येथील घटनेचे … Read more

तुम्ही केलेल्या पापाची शिक्षा जनता भोगतेय

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- साठवण तलावात तुम्ही केलेल्या पापाची शिक्षा श्रीरामपूरची जनता भोगत आहे, असा पलटवार करून पावसामुळे वीजपुरवठ्यात आलेल्या तांत्रीक बाबींमुळे पाणीपुरवठ्यास विलंब होत आहे,असे सत्ताधारी नगरसेवक राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे. शहर काँग्रेसच्यावतीने पालिका प्रशासनाच्या विरोधात हंडा आंदोलन करण्यात आले त्याबाबत ते म्हणाले, पाणीपुरवठ्यासंदर्भात आंदोलन करत आहेत त्यांनी खालील बाबींशी तपासणी केली … Read more

पाणी पेटले; श्रीरामपूर नगरपालिकेत आरोप प्रत्यारोप

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर नगरपालिकेच्या दरबारी आता पाणी प्रश्न तापू लागला आहे. विविध समस्यांच्या प्रश्नी विरोधक सत्ताधार्यांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. नुकताच उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे तीन तेरा वाजले असून त्याला अकार्यक्षम नगराध्यक्षाचा कारभार जबाबदार असल्याची टीका केली. मागील तीन वर्षांपासून पालिकेचा पाणीपुरवठा रामभरोसे आहे. गेल्या काही … Read more

…तर कोपरगाव तालुका कोरोनामुक्त होईल ; आ. काळेंचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही महिन्यापूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही वाढणारी संख्या चिंताजनक … Read more

उत्तर प्रदेशात लोकशाही नसून जंगलराज : कदम

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशात पोलिस प्रशासनाच्या मदतीने दबावाचे राजकारण करुन गुंडांना मोकळे रान करुन देत आहे. योगी सरकार बरखास्त करुन पिडितेच्या कुटूंबियांना संरक्षण देऊन न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी पुढाकार घेईल. उत्तर प्रदेशमध्ये लोकशाही नसून जंगलराज सुरू आहे, असा आरोप माजी महापौर सुरेखा कदम यांनी केला. उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील … Read more

मोदी-योगी सरकार असंवेदनशील; तांबेंचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  हाथरस घटनेप्रकरणी काँग्रेसने आज नगर शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर बसून बैठा सत्याग्रह केला. आ.डॉ.सुधीर तांबे यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. आ. तांबे म्हणाले, हाथरसमध्ये घडलेली घटना ही अत्यंत अमानवी आहे. क्रूर आहे. या घटनेमध्ये मोदी – योगी सरकार बेजबाबदारपणे वागत आहे. कुठली ही संवेदनशीलता या सरकारमध्ये उरलेली नाही. सरकार … Read more