महसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. विरोधकांनीही यावर आवाज उठवला. परंतु काही खासदारांना निलंबित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कडाडले. कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय … Read more

त्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जनमानसात आपली वेगळीच ओळख असलेले व कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यांना राजकीय नेत्यांसह तरुणांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच एक नेटकऱ्यांनं रोहित पवारांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करायचा का? असा प्रश्न विचारला होता. दरम्यान तरुणाईचे मुख्य … Read more

‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्‍यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  बेल्हे ते राळेगण थेरपाळ हा रस्ता हा अण्णा हजारे, खासदार अमोल कोल्हे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला आहे. परंतु या रस्त्याच्या कामाच्या मंजूरीचे केविलवाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न तालुक्‍यातील काही टक्केवारी सम्राट पुढाऱ्यांनी चालवला आहे, अशी टीका पारनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी … Read more

स्वीकृत सदस्य निवडीवरून नगर शहर शिवसेनेतही अस्वस्थता

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीवरून नगर शहर शिवसेनेतही अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी ‘स्वीकृत’साठी निवडले जात असलेल्या नावांवर आक्षेप घेत पक्षात जातीयवादाचे राजकारण सुरू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली आहे. … Read more

राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. तर आज पाटील यांच्याबरोबर असलेले नेते राज्यपालांना भेटायला जाणार नसल्याची‌ माहिती महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच आज आम्ही काळजी घेऊ, आम्ही राज्यपाल यांना ही भेटणार आहे त्यावेळेस सामाजिक अंतर काळजी … Read more

राजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- राज्यातील आदिवासी कोरोना संकटामुळे बेरोजगार झाला आहे. राज्य सरकारने ग्रामपंचायतींना केंद्राने दिलेला करोडो रुपयांचा विकास निधी परत घेतला असल्याने ग्रामपंचायतीकडे वसुली थांबल्याने या संस्था अडचणीत आल्या आहेत. अकोला तालुक्यात सर्वपक्षीय बैठका घेऊन आघाडीच्या माध्यमातून केवळ तहसीलदार व अधिका-यांना आदेश देण्यापेक्षा राज्य सरकारकडून निधी कसा आणता येईल. याकडे लोकप्रतिनीधींनी लक्ष … Read more

वंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार ?

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी परत एकदा ‘एआयएमआयएम’चे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांना मैत्रीसाठी अप्रत्यक्षपणे साद घातली आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम आणि दलित मते एकत्र आली तर ‘चमत्कार’ होऊ शकतो, असे म्हणत अॅड. आंबेडकर यांनी बिहारच्या निवडणुकीत उतरण्याचे सूतोवाच केले आहे. ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या … Read more

साखर कारखान्यांच्या अडचणींवर उपाय करा !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- राज्यात मागच्या वर्षीच्या गाळप हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक असताना यंदा उसाचे बंपर पीक उभे आहे. त्यामुळे राज्यात साखरेचा मोठा साठा निर्माण होणार असून कारखाने अडचणीत येणार आहेत. यावर काही उपाययोजना करावी, असे साकडे साखर कारखानदारांनी महाराष्ट्र विकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना घातले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी … Read more

बदनामी होईल असे वागू नका : झावरे

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल यांच्या सूचनेप्रमाणे कोपरगाव शहर शिवसेनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. उपशहरप्रमुख – विकास शर्मा, प्रफुल्ल शिंगाडे, गोपाल वैरागळ, गगन हाडा, भूषण पाटणकर, आकाश कानडे, शहर संघटक – बाळासाहेब साळुंके व नितीन राऊत, सहसंघटक – वैभव गिते, विभागप्रमुख – विजय शिंदे, … Read more

राठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- नगर शहर शिवसेनेतील वाढती गटबाजी तसेच मनपा स्थायी समिती सभापतीपद निवडीत सेनेची फसवणूक झाल्याच्या होत असलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर शहर सेनेच्या सद्यस्थितीवर अन्य पक्षीयांनी अस्वस्थता व्यक्त करीत मांडलेली खंत शहरात चर्चेची झाली आहे. शिवसेनेचे उपनेते (स्व.) अनिलभय्या राठोड यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच … Read more

नव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता ?

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- बहुतांश राजकारणी मंडळी राजकीय पद स्वीकारण्याआधी आपल्या इष्ट देवतेचे स्मरण व पूजन करतात. काहीजण मंत्रोच्चारात पदग्रहण करतात. महापालिकेच्या स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकरही या भावभक्तीला अपवाद ठरले नाहीत. सिद्धपुरुष शंकर महाराज यांच्या प्रतिमेला त्यांनी आधी सभापतीपदाच्या खुर्चीत विराजमान केले, त्या प्रतिमेची साग्रसंगीत पूजा केली व त्यानंतर दुसऱ्या खुर्चीत … Read more

मनोज कोतकर कोणत्या पक्षाचे?…महापौर वाकळे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  नगर मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीवेळी झालेल्या राजकारणावरुन भाजपमध्ये चिंता व्यक्त होत असताना आज सभापती मनोज कोतकर यांनी पदभार स्विकारुन कामकाजालाही सुरुवात केली. यावेळी सभापतींना शुभेच्छा देण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे हेही उपस्थित होते. त्यांना कोतकर यांच्या पक्षाबाबत विचारणा केली असताना त्यांनी ‘आज फक्त शुभेच्छा देवू द्या’ असे सांगत कोणतीही … Read more

महाविकास आघाडीशी सोयरीक करायची असेल तर खुशाल करावी, मात्र…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत जे काही घडले आणि त्यावरून भाजपबाबत होत असलेली चर्चा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विमनस्क करणारी आहे. सर्वाधिक सभासद, सर्वाधिक विश्वासार्हता आणि त्यामुळेच सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या भाजपसाठी ही चर्चा निश्चितच राजकीय दृष्ट्या धोकादायक आहे. ऐनवेळी पक्ष बदलून सभापती झालेले मनोज कोतकर यांनी ते कोणत्या पक्षात आहेत, हे … Read more

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले, पण होतेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नसल्याने गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यावरुनही खूप राजकारण झाले. जे जिल्ह्याने पहिले आहे. परंतु आता या प्रशासकांची नेमणूक ग्रामपंचायत विकासात अडथळे आणत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली … Read more

आमदार निलेश लंके म्हणाले ज्यांचे अस्तित्व संपले, राजकीय दुकाणदारी संपली त्यांच्याविषयी काय बोलणार ?

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- तालुक्यासाठी विकास कामे महत्वाची आहेत. ज्यांचे अस्तित्व संपले, ज्यांची राजकीय दुकाणदारी संपली त्यांच्याविषयी काय बोलणार असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली. कोहकडी येथे ४८ लाख रूपये खर्चाच्या विविध विकासकामांचा आ. लंके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी … Read more

ऑक्सिजन, व्हेंटीलेटर देणे म्हणजे आमदारांना उशिरा सूचलेले शहाणपण

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- आमदारांनी मोठा गाजावाजा करून कोपरगावला कोविड सेंटर सुरू केले, परंतु तेथे रुग्णांची सोय होण्याऐवजी गैरसोयच होते. रुग्णांची फसवणूक होत अाहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आता उपलब्ध करणे म्हणजे उशिरा सूचलेले शहाणपण आहे, अशी टीका कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांनी केली. कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत असल्याने सरकारने आमदारांना विकास निधीतून … Read more

महापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  स्थायी समितीच्या निवडणुकीआधी भाजपच्या कोट्यातून स्थायी समितीवर गेलेले नगरसेवक मनोज कोतकर यांनी गळ्यातील भाजपचा पंचा काढून टाकून घड्याळाचा पंचा परिधान केला व सभापतीपदाची उमेदवारी राष्ट्रवादीकडून दाखल केली. त्यानंतर ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे सांगून सेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांना माघार घेण्यास भाग पाडले गेले व त्यांची बिनविरोध निवड केली … Read more

मनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार ?

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- सभापतीपद निव़डीच्यानिमित्ताने झालेल्या राजकारणाचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी, सभापती कोतकर यांना पक्षाद्वारे नोटिस दिली जाणार असून, राष्ट्रवादीतील त्यांच्या प्रवेशाच्या चर्चेच्या अनुषंगाने त्यांना पक्षातून का काढून टाकले जाऊ नये तसेच त्यांचे भाजपचे नगरसेवकपद रद्द का केले जाऊ नये, य़ाची विचारणा या नोटिशीद्वारे त्यांना केली जाणार … Read more