आ. निलेश लंके म्हणाले मतदार संघासाठी 85 कोटींचा मास्टर प्लॅन तयार आहे. मात्र कोरोनामुळे….

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- मतदार संघ विकासासाठी 85 कोटींचा मास्टर प्लॅन तयार आहे. मात्र कोरोनामुळे आपला माणूस जगला पाहिजे त्यांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. निघोज व परिसरातील सव्वा कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत … Read more

अहमदनगर राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा उपाध्यक्षांचा मनसेत प्रवेश !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- तालुक्यातील जामगावच्या येथील रहिवासी असलेल्या व राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह रविवार दि.13 सप्टेंबर रोजी मनसेचे नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे पक्षप्रवेश करत मनसेची वाट धरली. गेल्या अनेक दिवसांपासून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर … Read more

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जिल्हा रुग्णालयास लिहिले पत्र, म्हणाले मयतांच्या नातेवाईकांना…

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असताना मयतांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे करोना मयतांवरील अंत्यसंस्कारही उशिरा होत असल्याने मयतांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जिल्हा रुग्णालयास पत्र लिहून सदर प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महापौर वाकळे यांनी म्हटले आहे की, अहम‍दनगर जिल्‍हयात कोरोनाचा प्रादुर्भाव … Read more

पालकमंत्र्यांना आली जाग… ‘ह्या’ दिवशी अहमदनगर दौऱ्यावर येणार !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात रोज ८०० – ९०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळत आहे.पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगरमध्ये परिस्थिती नियंत्रीत आहे असे सांगत होते. परंतु सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे. ही बाब लक्षात आणून देत मनसेचे परेश पुरोहित यांनी पालकमंत्री हरवले आहेत अशी टीका केली होती. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी नगरमध्ये … Read more

पंतप्रधानांचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा होणार

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने १४ ते २० सप्टेंबर दरम्यान विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे नेते माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिली. माजी आमदार पिचड पुढे म्हणाले कि, या सेवा सप्ताहमध्ये प्रत्येक मंडलात ७० दिव्यांगांन विविध वस्तू … Read more

मनसे स्टाईल! राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय फोडले

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर – पाथर्डी शहरातील मुख्य चौकासह उपनगरातील रस्त्याच्या निकृष्ठ कामामुळे ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे रोजच अपघात होत असून निरपराध नागरिकांचे बळी जात आहे. तसेच कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे पाथर्डी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी येथील महामार्गाच्या कार्यालयातील अभियंत्याच्या खुर्चीला चपलाचा … Read more

रस्त्याची झाली चाळण; रोहित दादा जरा इकडेही लक्ष द्या

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाच्या संकटमय काळात समस्यांचे राजकीय भांडवल करणाऱ्या विरोधकांना आपल्या शैलीत उत्तर देणारे आमदार रोहित पवार हे चांगलेच चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या नगर-सोलापूर रस्त्याची चाळण झाली आहे. याकडे जरा लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करू लागले आहे. देशाच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता … Read more

साईमंदिर खुले करा; मनसे झाली आक्रमक

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  देशात सर्वत्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. यातच आता जगात ख्याती असलेले जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची मागणी मनसेने केली आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. राज्यात इतर सर्व आस्थापना राज्य … Read more

दिव्यांगांच्या मदतीस धावली मनसे

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने दिव्यांग व्यक्तीस स्टॉल टपरी देऊन त्यांचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मनसेचे सुमित वर्मा म्हणाले कष्ट करण्याची तयारी त्यांच्यात आहे, त्यामुळेच अशा व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने मदतीचा हात देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात येत आहे. वास्तविक … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे ठरविले असून आपल्या जिल्ह्यात मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबरपासून या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेत कोरोनादूतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करावी आणि आजारी तसेच लक्षणे असणार्‍या रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत. … Read more

आमदार रोहित पवारांचे ‘त्या’ नेत्याला पत्र…म्हणाले दुःख याचंच वाटतंय की, आपण आपल्या राजकीय वाटचालीसाठी…

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सुशांतच्या बहिणीसह काही जणांनी केली होती. यात लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही ही मागणी केली होती. याबाबत रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना खुलं पत्र लिहिलं असून, चिराग पासवान यांना चांगलीच चपराक लगावली आहे.त्यांना … Read more

नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले कोरोना संकट घालवण्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात यावे. तालुक्यातील व बाहेरून आलेल्या नागरिकांच्या समस्या फिजिकल डिस्टन्सिंचे पालन करत जाणून घेत, त्या सोडवण्यावर भर द्यावा. तसेच कोरोना संकट घालवण्यासाठी प्रत्येकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. एसएमबीटी महाविद्यालय ठिकाणी नगर, नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातून … Read more

‘वाघ’ म्हणून घेणार्‍यांची एका महिलेपुढे शेळी झाली…

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणे गैर आहेच, पण या गोष्टीचा निषेध करुन कंगनाचा संबंध भाजपाशी जोडणारे पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याबाबत अपशद्ब काढले जात होते, त्यावेळी कोणत्या बिळात लपून बसले होते, असा प्रश्न भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष ऍड.अभय आगरकर यांनी उपस्थित केला. … Read more

पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्या : कोल्हे

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-  कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पोहेगाव आणि परिसरातील गावांमध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नहेलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, महसूलमंत्री आणि पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली. मतदारसंघातील पोहेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापूर, सोनेवाडी, चांदेकसारे, घारी आदी गावामध्ये १० सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्याचा … Read more

केंद्र सरकारच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा – मा. खा. दिलीप गांधी

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-  देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदीजी यांनी आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पथक पुरवठा योजनेची अंमलबजावणी केली असून या योजने अंतर्गत पथविक्रेते, फेरीवाले यांच्यासाठी खेळते भांडवल म्हणून रु. १०,०००/- एवढे खेळते भांडवल कर्ज रूपाने सर्व सरकारी बँकेत उपलब्ध करून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कॉंग्रेस म्हणतेय अहमदनगर शहरात लॉकडाऊन नको !

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-‘घराबाहेबर जावे तर कोरोना घरात बसावं तर रोजी रोटी दूरपास्त’ अशी नगरसह सर्वत्र अवस्था आहे. पण, कोरोनाच्या भितीने घरात बसून, सर्वसामान्य जगणार कसे? ज्यांची हातावरची पोट आहेत, त्यांना दररोज रोजगारासाठी घराबाहेर पडावेच लागते, त्याशिवाय त्यांच्या घराची चूल पेटत नाही, म्हणून सद्या जनता कफ्यु, लॉकडाऊन लागू करु नये, अशी मागणी अहमदनगर … Read more

उपचार सुरु तरीही कार्यरत; मंत्री तनपुरे यांचे कौतुकास्पद काम

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. तनपुरे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असताना देखील ते आपलं कर्तव्य बजावत असल्याच पाहायला मिळत आहे. आजारी असताना देखील मंत्री तनपुरे हे राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात अंतिम परीक्षा होणार असून त्यादृष्टीने … Read more

आ. जगताप यांच्या मध्यस्थीने चिघळण्यापूर्वीच मिटला बुरूडगावकरांचा ‘तो’ प्रश्न

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-  बुरूडगाव ग्रामपंचायतीचे अनेक प्रश्न आणि समस्या अशा आहेत कि ज्याची अनेक वर्षांपासून वारंवार मागणी होऊनही त्या समस्या सुटताना दिसत नाहीत. आधी मनपात आणि पुन्हा ग्रामपंचायत यामध्ये भरडल्या गेलेल्या बुरूडगावच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे आता बुरूडगावकरांनी आक्रमक होत, ‘नगर शहरातील गटार गंगेचे पाणी सीना नदीत सोडले जाते.त्या पाण्यामुळे आमची शेती … Read more