शेतकऱ्यांना भरपाई द्या ; ‘ह्या’ मंत्र्यांच्या वडिलांचे सरकारला निवेदन

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने … Read more

के के रेंज :शरद पवार म्हणाले शेतकऱ्यांनो घाबरू नका; वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-के के रेंज प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा संभाव्य बाधीत २३ गावातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले शेतकऱ्यांनो घाबरू नका; वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल. आज आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची मुंबईत भेट घेतली संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची पवार शिष्टमंडळासह घेणार भेट … Read more

के.के. रेंज क्षेत्र अधिग्रहणाबाबत खा. सुजय विखे यांची महत्वाची माहिती; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे.  राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली … Read more

राष्ट्रवादीत भूकंप : पार्थ पवार मोठा निर्णय घेणार ?

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- पार्थ अपरिपक्व आहे. त्याच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही,’ असं म्हणत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारलं. शऱद पवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांचे डोळे विस्फारले. या टीकेनंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार पक्ष सोडणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. … Read more

सत्यजीत तांबे म्हणाले पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत!

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  देशात नोटबंदी व चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यात आता कोरोना व्हायरस आल्यानंतर लॉकडाऊनमुळे ज्यांना रोजगार होता अश्या 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून, देशभर अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे. अर्थव्यवस्था आणि लोकांच्या एकूणच जगण्यावर झालेले हे दुष्परिणाम 2-4 वर्षांपूरते मर्यादित नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते … Read more

`त्या` मंत्र्यांचा दलालांशी संबंध; मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- राज्यात गेल्या काही दिवसापासून दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये हमी भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना आणि भाजपतर्फे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होत नसून मधल्या दलालांचा फायदा होत आहे. या दलालांशी सरकारमधील काही मंत्र्यांचे संबंध असून ते … Read more

अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा नवीन वाघ आला !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- शिवसेना नेत्यांना आणि कार्यकत्यांना वाघ म्हणायची स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून परंपरा आहे. शिवसेना स्टाईल आंदोनल किंवा उत्तर म्हटलं तरी प्रत्येकाला ओळख आहे. त्यामुळे शिवसैनिकांना `वाघ` ही बिरुदावली शोभून दिसते. नगरमध्ये नुकतीच एका वाघाने एक्झिट घेतली होती. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शिवसैनिक अस्वस्थ होते. मात्र, अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री … Read more

गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले म्हणाले … तेव्हा अन्याय अत्याचार वाढतात !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस चा गृहमंत्री होतो तेव्हा अन्याय अत्याचार वाढतात. अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. काल मंगळवेढ्यातील अमानुष मारहाण झालेल्या व्यक्तीची आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली. मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील दामाजी बरकडे यांना मुलाने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणुन अमानुष मारहाण केली … Read more

कोरोना बाबत जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अधिकार्‍यांची आढावा बैठक

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील करोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने ११ हजारचा आकडा पार केला आहे, यामुळे जिल्ह्यात आरोग्याची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उद्या (दि.14) शुक्रवारी जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अधिकार्‍यांची आढावा बैठकीचे आयोजन … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या दरम्यान इतर कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये. जर … Read more

अनिल राठोड यांच्या रुपाने सच्चा मित्राला गमावला; मंत्री गुलाबराव पाटील भावुक, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. स्व. अनिल राठोड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी ते भावुक झाले होते. ते यावेळी म्हणाले, गेल्या अनेक वषार्पासून मी व अनिल राठोड एकत्रपणे आमदार म्हणून … Read more

१ हजार बेड्चे कोव्हीड सेंटर, शरद पवारांचे नाव आणि रुग्णांना गरम दूध, अंडी व जेवण !

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे आपल्या उपक्रमशील स्वभावाने परिचित आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार जसा तालुक्यात व्हायला लागला तसा त्यांनी आपल्या मदतीचा ओघही वाढवला. आता त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात १ हजार बेडचे सुसज्ज अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे. … Read more

‘मोदी फक्त घोषणा करतात, प्रत्यक्षात काहीच मिळत नाही’

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- मोदी सरकारने शेती आणि उद्योगांसाठी २० लाख करोड रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर आता त्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. ‘कहां गये वो २० लाख करोड?’ हे अनोखं आंदोलन आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या घटकांना भेटून पक्षाचे कार्यकर्ते माहिती संकलित करीत आहेत. या दोन्ही … Read more

गडाख यांच्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीला मोठी मदत

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधत अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. गडाख नेवासे मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. शिवसेना पक्ष प्रवेशामुळे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विश्वासामुळे शेतकऱ्यांचे, तसेच अन्य प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शंकरराव गडाखांचा शिवसेनेत प्रवेश, म्हणाले पक्ष प्रवेशामुळे…

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी शिवबंधन बांधून गडाख यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला. अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर आता गडाखांवर या जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.शिवसेनेकडून … Read more

आश्वासने देऊन खासदार आमदार व मंञी झालेल्या पुढा-यांना निवडणुकीनंतर विसर

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- के. रेंजसाठी राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील जमिनीचे भूसंपादन होऊ दिले जाणार नाही. तसेच रेडझोन उठवला जाईल हे निवडणुकीत आश्वासने देऊन खासदार आमदार व मंञी झालेल्या पुढा-यांना निवडणुकीनंतर विसर पडला आहे, अशी संतप्त भावना राहुरी तालुक्यातील वरवंडी बाभुळगाव,वावरथ, जांभळी, जांभूळबन,गडदेआखाडा सह इतर १३ गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लष्कराच्या सरावासाठी … Read more

श्रीगोंद्यात पुन्हा एकदा बाळासाहेब नाहाटा किंगमेकर

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवड प्रक्रिया अत्यंत चुरशीने झाली. या निवड प्रक्रियेत जगताप, नागवडे गटाचे संजय जामदार यांनी १० मते मिळवत सभापतीपदी बाजी मारली. तर पाचपुते गटाचे उमेदवार लक्ष्मण नलगे यांना ७ मते मिळाली. तसेच मीना आढाव यांना १ मत मिळाले आहे. उपसभापती संजय महांडुळे … Read more

जिल्हाधिकारी व्दिवेदींनी दुजाभाव केला ; भाजपकडून धिक्कार

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कोरोनामुळे अहमदनगरमध्ये सर्वच दुकानांची वेळ ठरलेली आहे. परंतु ही वेळ २ तासांनी वाढवावी असे निवेदन देण्यासाठी भाजप पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते. परंतु कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ते निवेदन हातात घेण्यास नकार दिला. मात्र या पदाधिकारी समोरच त्यांनी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडून शिवसेनेचे निवेदन स्वीकारले. त्यामुळे जिल्हाधिकारी हे दुजाभाव करत आहेत आणि … Read more