अजितदादा म्हणाले अनिलभैय्या आता आपल्यात नाहीत हे ऐकून धक्का बसला…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड (वय 70) यांचे आज (बुधवारी) पहाटे ह्यदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा विक्रम, 3 मुली असा परिवार आहे माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. त्यांच्या निधनाने सामाजिक … Read more

‘ह्या’ कारणामुळे झाला माजीमंत्री अनिल राठोड यांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, राठोड यांना आठ दिवसापूर्वी करोना झाला होता. त्यामुळे … Read more

अनिल राठोड यांचं निधन,नगरमधील शिवसेना शोकमग्न

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- आज सकाळी अहमदनगरकरांच्या दिवसाची सुरवात माजी मंत्री अनिल भैया राठोड यांचे निधन ही बातमी वाचून झाली. तब्बल 25 वर्षे नगर शहराचे आमदार राहिलेले राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी अनिल राठोड यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाचे निदान झाल्यानंतर अहमदनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र … Read more

पावभाजीचा स्टॉल ते २५ वर्ष आमदार आणि राज्यमंत्री…असा होता अनिल राठोड यांचा राजकीय प्रवास

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- नगर शहराचा इतिहास असा आहे, की इथं मोठमोठे नेते आमदार झाले; परंतु दोनेपक्षा जास्त वेळा कुणालाही नगरकरांनी स्वीकारलं नाही. दादा कळमकर यांच्यापासून शहरात सामान्यांतून आमदार होण्याची सुरुवात झाली. कळमकर हे हाॅटेलचालक होते. त्यानंतर अनिल राठोड हे पावभाजी गाडीचालक आमदार झाले. नगरसेवक वा अन्य कोणतंही पदाचा अनुभव नसताना त्यांना थेट … Read more

सत्यजित तांबे म्हणाले चांगला माणूस गेला…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. आजारपणाच्या कारणामुळे त्यांच्यावर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना आज बुधवारी पहाटे च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत माळवली.राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांसह जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांना … Read more

अहमदनगरच्या शिवसैनिकांचा ‘अनिलभैया’ गेला !

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  माजी मंत्री, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.  दरम्यान अनिल  राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली … Read more

चितळेरोडवरच्या ‘शिवालया’त यापुढे अनिलभैय्या कधीच भेटणार नाहीत…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अहमदनगर शिवसेनेचा ‘आव्वाज’ आज पहाटे काळाच्या पडद्याआड गेला. माजीमंत्री आणि अहमदनगर शहरावर गेली २५ वर्षै ज्यांनी आमदारकीच्या माध्यमातून अधिराज्य गाजवलं, अशा माजी मंत्री अनिल राठोड … Read more

राज ठाकरे म्हणाले आपल्या रामाचा वनवास संपला…

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राम मंदिरा व बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आज या मंगलप्रसंगी बाळासाहेब असते तर त्यांना मनापासून आनंद झाला असता, असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. #राममंदिर #भूमिपूजनसोहळा #अयोध्या #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya pic.twitter.com/cyIJgn3WfT — Raj Thackeray (@RajThackeray) August 4, … Read more

महाविकास आघाडी सरकारला प्रभु श्रीराम मंदीर भूमिपुजनाचा आनंदोत्सव मान्य नाही ?

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्या (दि.५) मनसेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इच्छेनुसार फटाके वाजवून धुमधडाक्यात हा उत्सव साजरा करण्याचे नियोजन केलेले असतांना  पोलिस प्रशासनाकडुन मनसेचे जिल्हासचिव नितीन भुतारे व जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांना नोटिस बजावण्यात आली आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला … Read more

पारनेरचे जावई झाले राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा,) व पारनेर तालुक्याचे जावई आणि सध्या पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले सुनील गव्हाणे यांची निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुनील गव्हाणे यांनी पक्षासाठी दिवसरात्र काम केले. या कामाची … Read more

‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. ‘ कोरोना’चे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प … Read more

‘नगर’ शहरातून भाजपचा आमदार निवडून द्यायचाय; विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुकीची तयारी करा

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तसे मोठे आहे. राज्यातील निवडक जिल्हे असे आहेत कि जेथे सत्ता असावी असे प्रत्येक पक्षाची इच्छा असते. यापैकीच एक म्हणजे अहमदनगर जिल्हा. जिल्ह्यातील नगर शहरावर अनेक पक्षांचा राजकीय डोळा असतो. आता भाजपनेही असाच एक आशावाद व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाला येणारे दिवस फार चांगले आहेत. … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले खासदार कोठे बोलले व काय बोलले याची कल्पना नाही, मात्र …

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलेच पाय रोवले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा ६  हजारांच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील वातावरण तापू लागले असल्याचे चित्र आहे.  दोन दिवसापूर्वी विकासवर्धिनी संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन नागरी संवाद या कार्यक्रमात खा. विखे यांनी प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन … Read more

आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती फिरतायत सोबत??? जाणून घ्या सत्य

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नसले तरी यावरून भलतेच राजकारण तापलेले दिसत आहे. अनेक बडे बडे नेते यात उडी घेत आहेत. आता या प्रकरणात महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावरही वेगळेच आरोप केले जात आहेत. ते रिया चक्रवर्तीला सोबत घेऊन गाडीमधून … Read more

भास्करगिरी महाराज अयोध्येला रवाना, म्हणाले ज्या सुवर्ण क्षणाची ….

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या बुधवारी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा होणार आहे. राम जन्मभूमिसाठी अनेक वर्षाच्या संघर्षानंतर भूमिपूजन समारंभ होत आहे.  श्रीराम जन्मभूमी आंदोलनावेळी महाराष्ट्र कारसेवा समितीचे भास्करगिरी महाराज प्रमुख होते. श्री राम जन्मभूमि अयोध्येतील अनेक आंदोलनांमध्ये भास्करगिरी महाराजांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. यासाठी श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या … Read more

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबई पोलिस आयुक्तांना भेटायला जातात, त्यानंतर लगेचच आज पोलिस आयुक्त पत्रकार परिषद घेतात. काहीतरी गडबड आहे हे न समजण्याइतकी लोकं मुर्ख नाहीत. जसं जसं दिवसं जात आहेत तसे टी गँग पुरावे नष्ट करत आहेत. म्हणून रोज धडपड सुरु आहे, असं ट्विट करत निलेश राणे यांनी … Read more

पंकजा मुंडेंना भावली ‘या’ भावाची ओवाळणी

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- महायुतीच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे मंत्री असताना अनेक नेत्यांनी त्यांना बहीण मानले होते. अधूनमधून होणाऱ्या सभा-समारंभातून बहीण-भावाच्या प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जात होत्या. मधल्या काळात राजकीय वातावरण बदलले. निवडणुकीतील पराभवानंतर मुंडे एकाकी पडल्या होत्या. मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना ‘नवा भाऊ’ भेटला आहे. या भावाने शब्दरूपी ओवाळणी घातली आहे. भावाचे हे … Read more

रोहित पवार म्हणाले सुशांतच्या आत्महत्येचं राजकारण करू नका

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मानसिक तणावामधून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. परंतु आता रोज या प्रकरणात नवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. आता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापू लागलं आहे. … Read more