‘भाजप नेत्यांनी इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करावे’

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- दूध दराच्या प्रश्नावर भाजप राजकारण करत आहे. हा प्रश्न लवकरच सोडवला जातोय, त्यासाठी दोन-तीन बैठका झाल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी आंदोलन जाहीर केले आहे. भाजपने राज्य सरकारची काळजी करू नये. केंद्र सरकारने राज्यामध्ये १५ हजार टन दूध पावडर आयात केली, त्याबद्दल भाजप बोलत नाही, इंधन दरवाढीबद्दल शांत आहे. … Read more

महाविकासआघाडी सरकारने फडणवीस सरकारची ‘ही’ योजना केली बंद

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- महाविकासआघाडी सरकारने याआधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्यांना पेन्शन देणं बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आणीबाणीच्या काळात आणीबाणीविरोधात आंदोलन करून तुरुंगवास भोगलेल्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने दरमहा पेन्शन लागू केली होती. मात्र महाविकासआघाडी सरकारने हा निर्णय रद्द करून ही पेन्शन बंद … Read more

Live Updates : दूध उत्पादकांचा एल्गार, अहमदनगर जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात

शेतकरी संपाचे गाव असलेल्या पुणतांबा येथे शनिवारी दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीसमोरील बळीराजाच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून शेतक-यांनी दूध आंदोलन केले.   राज्यात आज दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे.दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघर्ष … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ता लागणार नाही !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्यात माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालीही भाजपने आक्रमक आंदोलन करून दूध दरवाढ करून शेतकर्‍यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा अशी मागणी केली.  दूधाची खरेदी अतिशय कमी दराने होते, त्याचवेळी विक्री 50 ते 60 रुपयाने होते. याबाबत सरकारला अर्ज विनंत्या करूनही निर्णय घेतला नाही. सरकार सर्वच … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले कोरोनाला न घाबरता…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- आमदार संग्राम जगताप यांनी कोरोना संसर्ग विषाणूच्या संकटाच्या काळात गरजूंना मदत करण्याची मोठी कामगिरी केली आहे. आयुर्वेद कॉलेज येथे कोरोना सेंटर उघडून अल्पदरात चांगल्या दर्जेच्या सुविधा कोरोना रुग्णांना देण्याचे काम केले. सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास समाजात अनेक लोक पुढे येऊन मदत करत असतात. कोरोनाच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे … Read more

‘हे’आमदार झाले नाराज, पोलिसांबाबत केली थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- तालुक्यातील विविध भागात पोलिस चौक्या उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले असतानाही पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला अंधारात ठेवत चौक्यांचे उद्घाटन केल्याने आमदार लहू कानडे नाराज झाले. त्यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. दरम्यान, यात राजकारण न करता सहकार्य केले पाहिजे, असे माजी सभापती दीपक पटारे म्हणाले. मागील महिनाभर आमदार कानडे मुंबईत … Read more

संकटाच्या काळात लोकसेवेला महत्त्व: आ. रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- संकटाच्या काळामध्ये लोकांच्या सेवेला अत्यंत महत्त्व आहे. आ. संग्राम जगताप यांनी नागरिकांवर आलेल्या कोरोना संसर्ग विषाणूच्या संकटाच्या काळामध्ये गरजूंना मदत करण्याची मोठी कामगिरी केली आहे. आयुर्वेद कॉलेज येथे कोरोना सेंटर उघडून अल्पदरात चांगल्या दर्जेच्या सुविधा कोरोना रुग्णांना देण्याचे काम केले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून काम केल्यास समाजामध्ये अनेक लोक पुढे … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले नेत्यांना चांगले वाटावे म्हणून सुजय विखे…..

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- आज अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात रोहित पवार यांनी भेट देत कोरोनाच्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर वक्तव्य केले. यावेळी त्यांनी खा.सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. खा. सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी राम मंदिर भूमिपूजनवरून भाजपवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला होता. ते म्हणाले होते ‘अहमदनगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडचे आमदार … Read more

राज ठाकरेंवर बाळासाहेब थोरात बरसले; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज्यातील राजकीय स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करत त्यांनी, राज्य सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, असा टोला लगावला होता. सरकारमधील तीन पक्षांमध्ये एकोपा नाही, असेही त्यांनी नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना प्रतिसवाल केला आहे. … Read more

मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ.रोहित पवार सरसावले

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. अहमदनगरमध्येही कोरोनाने उग्र रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. परंतु या प्रसंगात कोरोनाला घाबरून घरात न बसता जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. रोहित पवार हे मतदार संघात फिरत आहेत. थेट जनसामान्यांच्या प्रश्नांना भिडत आहेत. मतदारसंघातील कुकडी व सीना धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणुन … Read more

शेतकरी संकटात असताना आमदार लहू कानडे फिरकले देखील नाहीत !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी अतिवृष्टीच्या अस्मानी संकटामुळे पयर्त कोसळला आहे. देवळाली प्रवरा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या उभ्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी कदम यांनी … Read more

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या- माजी मंत्री आ.विखे पाटील यांची मुख्‍यमंत्र्यांकडेे पत्राव्‍दारे मागणी

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- महाराष्‍ट्राचे भूमिपुत्र आणि साहित्‍यरत्‍न लोकशाहीर आण्‍णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्‍न पुरस्‍कार देवून गौरव करावा यासाठी राज्‍य सरकारने शिफारस करावी,अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांना दिलेल्‍या पत्रात आ.विखे पाटील यांनी म्‍हटले आहे की, लोकशा‍हीर आण्‍णाभाऊ साठे यांना भारतरत्‍न पुरस्‍काराने … Read more

महाविकास आघाडी सरकारने दूध उत्‍पादक शेतक-यांची फसवणूक केली !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- राज्‍यातील दूध उत्‍पादकांच्‍या मागण्‍यांकडे जाणीवपुर्वक केलेल्‍या दुर्लक्षाचा निषेध म्‍हणून महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात दिनांक १ ऑगस्‍ट २०२० रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘एल्‍गार आंदोलनात’ दूध उत्‍पादक शेतकरी आणि कार्यकर्त्‍यांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले आहे. दूध उत्‍पादक शेतक-यांच्‍या समस्‍या दिवसागणीक वाढत चालल्‍या आहेत. … Read more

आमदार मोनिका राजळे यांच्या दिल्या ह्या सूचना

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील ज्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले त्या सर्व पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना आ. मोनिका राजळे यांनी महसूल, कृषी विभागाला दिल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात शेवगाव आणि पाथर्डी तालूक्यात पावसाने दमदार सुरुवात केली. शेतीत बाजरी, मूग, जवस, तूर आदी पिकाची पेरणी केली. अनेक शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले अनिलभैय्या घाबरू नका …

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर शहराचे माजी आमदार व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना करोनाची लागण झाली आहे नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली . अनिलभैय्या घाबरू नका ,काळजी घ्या, शिवसेना व आम्ही … Read more

अहमदनगरच्या राजकारणाने देशाच्या राजकरणात घडवला विक्रम ; केले असे काही की…

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगरमधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अध्यक्ष जे.पी नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच नोटीस पाठवली आहे. तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरून नाराज असल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. तालुका स्तरावरील वादात चक्क राष्ट्रीय अध्यक्षालाच नोटीस पाठवल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अहमदनगरमधील भाजप कार्यकर्ते सुनील पाखरे आणि नवनाथ गर्जे यांच्या वतीने अ‍ॅड. दिनकर … Read more

आनंदाची बातमी : ऐतिहासिक अहमदनगरच्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अखेर नगरच्या बहुर्चित, बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला आज (२९ जुलै) सुरवात होणार आहे. दुपारी एक वाजता साधेपणाने हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली. विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर … Read more

रोहित पवार म्हणतात, ‘ते’च शिवसेनेत नाही आले म्हणजे झालं !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलच फटकारलं आहे. सत्तेसाठी त्यांनी पक्ष नाही सोडला म्हणजे झालं अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. त्याच झालं असं, प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत जायला तयार असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केला होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more