अहिल्यानगरमधील हाळगाव कृषी महाविद्यालयात सभागृह उभारणीसाठी सरकारकडून १४ कोटी मंजूर, सभापती राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयासाठी सभागृह (कॉन्फरन्स हॉल) उभारण्याकरिता शासनाने १४ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला सोमवारी (५ मे २०२५) प्रशासकीय मान्यता दिली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, कर्जत-जामखेड तालुक्यातील शैक्षणिक आणि कृषी क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे. *हाळगाव … Read more

अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी निमित्त नगरमध्ये २३ मेपासून पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

Ahilyanagar News:अहिल्यानगर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात जनसेवा फाउंडेशन आणि विचार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव २३ मे रोजी वक्तृत्व स्पर्धेने सुरू होईल आणि ३१ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांनी त्याचा समारोप होईल. बुधवारी (७ मे २०२५) झालेल्या पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष धनश्री विखे पाटील … Read more

अखेर ५ वर्षांची प्रतीक्षा संपणार! महापालिका, झेडपी निवडणुकाचा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच उडणार बार

राज्यात गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुका दोन टप्प्यांत होतील. दिवाळीपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या, तर दिवाळीनंतर महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात. मंगळवारी (दि. ६) सर्वोच्च न्यायालयाने एका महिन्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याचे आणि चार महिन्यांत … Read more

शिर्डीतील घाण साफ करायला आणि टारगटांचा कायमचा बंदोबस्त करायला आलोय! डॉ. सुजय विखे पाटील यांचा इशारा

Ahilyanagar News: शिर्डी- मतदारसंघात वाढती गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कोल्हार-भगवतीपूर गावांतील संयुक्त ग्रामसभेत आक्रमक पवित्रा घेतला. “शिर्डी मतदारसंघातील घाण साफ करायला मी आलो आहे. जर माझ्या मतदारसंघातील महिला आणि मुली सुरक्षित नसतील, तर अशा मतदारांची मला गरज नाही,” असे ठणकावून त्यांनी गुन्हेगारांना … Read more

100 दिवस झाले, आता 150 दिवसांचा दुसरा कार्यक्रम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा

चोंडी, अहिल्यानगर, दि. ६ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्री परिषदेच्या बैठकीनंतर या दीडशे दिवसांच्या कृती आराखड्याबाबत सूतोवाच केले. त्याचा तपशील उद्या जाहीर करण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की, … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

अहिल्यानगर, दि. ६ : – चौंडी येथील मंत्री परिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्रिमंडळ सदस्य आदी उपस्थित होते. मृद व जलसंधारण … Read more

अहिल्यानगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

Chaundi Cabinet Meeting : अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक बैठक पार पडली. ही बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने चौंडी येथे पुढील महिनाभर विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या … Read more

Explained : महानगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणूक होणार पण ओबीसींचं आरक्षण राहणार का ?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (६ मे २०२५) महत्त्वपूर्ण आदेश जारी केले, ज्यामुळे राज्यातील राजकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती नाँगमेईकपम कोटम यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करून चार महिन्यांत (सप्टेंबर २०२५ पर्यंत) निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन युवराज यशवंतराव होळकर यांचीही उपस्थिती

Ahilyanagar news : अहिल्यानगर दि. ६:जिल्ह्यातील चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिपरिषद बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ चौंडीत दाखल झाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंत्रिमंडळ सदस्यांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसराला भेट देऊन अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा राम … Read more

महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका चार महिन्यात होणार ! Supreme Court चा महत्वाचा आदेश

Elections In Maharashtra : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (६ मे २०२५) ऐतिहासिक आदेश जारी केले आहेत. राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करून चार महिन्यांत (सप्टेंबर २०२५ पर्यंत) निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठराविक वेळेत घेणे ही घटनात्मक बंधने आहे. … Read more

लाडक्या बहि‍णींसाठी धक्कादायक बातमी; 2100 रुपये मिळण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही? नेत्यानेच दिले ‘हे’ संकेत

राज्यात सर्वात गाजलेल्या लाडकी बहिण योजनेची चर्चा अजूनही सुरुच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींना दिल्या जाणाऱ्या 1500 रुपयांच्या हप्त्यात वाढ करुन आपण 2100 रुपये करु असे आश्वासन दिले होते. त्यानंतर लाडक्या बहि‍णींनी महायुती सरकारवर मतांचा वर्षाव केला आणि, महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर बसले. मात्र अजूनही महायुती सरकारने 2100 रुपयांचे दिलेले आश्वासन पूर्ण … Read more

श्रीरामपूर न्यायालयाचा आ. विक्रम पाचपुते यांना दणका: धनादेश अनादर प्रकरणी पकड वॉरंट

Ahilyanagar news :  श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि साईकृपा शुगर अँड अलाईड लिमिटेड, हिरडगाव येथील माजी अध्यक्ष आ. विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांच्यासह कारखान्याच्या व्यवस्थापकावर श्रीरामपूर न्यायालयाने कठोर कारवाई केली आहे. श्रीरामपूरमधील अशोक सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या २० लाख रुपयांच्या धनादेश अनादर प्रकरणी श्रीरामपूरच्या न्यायदंडाधिकारी (क्रमांक दोन) न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पकड वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणात … Read more

Ahilyanagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

अहिल्यानगर दि. ५- कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार रोहित पवार, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार … Read more

Ahilyanagar News :राहुरी राहात्यातही आपलेच लोक; पाण्यावर सर्वांचा हक्क, चर्चेतून मार्ग काढा; सर्वांना हक्काचे पाणी मिळेल : बाळासाहेब थोरात

Ahilyanagar News :निळवंडे कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी देण्यासंदर्भात वादाचा कोणताही विषय नाही. लाभक्षेत्रातील प्रत्येक गावाला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी आहे. त्याबाबतीत वेळापत्रक तयार करणे, ते योग्यरीत्या पाळले जाईल याचा विश्वास लोकांना देणे, ही भूमिका पाटबंधारे विभागाने घ्यायला हवी. हा विषय राहुरी किंवा राहत्याला जाणाऱ्या पाण्याच्या बाबतीत नाही, ज्याचा हक्क आहे त्याला पाणी … Read more

Ahilyanagar News : इंद्रजीत थोरात यांच्यावर गुन्हा दाखल; शेतकऱ्यांचा संताप अनावर, आंदोलनाचा इशारा

Ahilyanagar News : संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्याचा वाद चिघळला असून, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला असून, “आम्हालाही सहआरोपी करा” अशी मागणी करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. निळवंडे धरणाच्या … Read more

Ahilyanagar News:चौंडीची बैठक जिल्ह्याच्या दृष्टीने एैतिहासिक क्षण

Ahilyanagar News:चौंडी येथे मंत्रीमंडळाची प्रथमच होत असलेली बैठक जिल्ह्याच्या दृष्टीने एैतिहासिक क्षण आहे. अहील्यानगरच्या विकासाच्या वाटचालीसाठी बैठक महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. मंत्री मंडळाच्या बैठकी बरोबरच शहरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहीती देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे त्रिशताब्दी वर्ष असून, … Read more

पवार गटाच्या आमदाराने सभापती राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी घेतली भेट, बंद दाराआड अर्धा तास चर्चा

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांनी शनिवारी (३ मे) सायंकाळी विधान परिषदेतील सभापती प्रा. राम शिंदे यांची चौंडी येथील निवासस्थानी भेट घेतली. संचालक मंडळासमवेत शरद पवार गटाचे आमदार, तथा कारखान्याचे चेअरमन आ. नारायण आबा पाटील हेही उपस्थित होते. अर्धा तास बंद दाराआड चर्चा कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवल्याबद्दल प्रा. राम शिंदे … Read more

विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील जनतेकडून चूक – अभिनेत्री राजश्री लांडगे

संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संपूर्ण संगमनेर तालुका हा आपला परिवार मानला. एकही दिवस विश्रांती न करता सातत्याने काम केले. सर्व समाजाला बरोबर घेतले. शांत संयम आणि सेवाभाव असे नेतृत्व तालुक्याला आणि जिल्ह्याला लाभले. मात्र अशी कोणती हवा होती की ज्यामुळे विधानसभेत हा अपघात झाला. नक्कीच विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील जनतेकडून चूक झाली असल्याचे … Read more