मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

Published on -

अहिल्यानगर, दि. ६ : – चौंडी येथील मंत्री परिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्रिमंडळ सदस्य आदी उपस्थित होते.

मृद व जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार, जलयुक्त शिवार २.०, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना यांसारख्या इतर योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. पुस्तिकेत जिल्ह्याच्या या यशाची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात जलसंधारणाची उत्तम कामे करणाऱ्या गावातील यशोगाथांचा समावेशही या पुस्तिकेत करण्यात आला आहे. पुस्तिका जलसंधारण कामांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरक असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News