पे अँड पार्किंग योजना म्हणजे मनपाचा सामान्य नगरकरांना लूटण्याचा डाव – किरण काळे;

अहिल्यानगर : मनपाने शहरातील मोक्याच्या ३५ रस्ते, जागांवर पे अँड पार्क योजना अंमलबजावणीची घोषणा केली आहे. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील प्रमुख रहदारीचे रस्ते, जागा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शहरातील मालमत्तां धारकांकडून सुधारित कर आकारणीचा देखील घाट घातला गेला आहे. प्रत्यक्षात नळाला दररोज स्वच्छ मुबलक पाणी येत नाही, रस्त्यांची दैनावस्था अजून संपलेली नाही, ७७८ रस्त्यांच्या … Read more

अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण – मा. आ. बाळासाहेब थोरात

मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे .सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे हा संदेश देणारा नाताळ हा सण असल्याचे प्रतिपादन मा.आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून नाताळ व नवीन वर्षानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुदर्शन निवासस्थानी गाणी येशू जन्माची या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी मा. आमदार डॉ सुधीर … Read more

Ahilyanagar Politics : विखे पाटलांनी सांगितलं पुढचे टार्गेट ! स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूकामध्ये काय करणार ?

Ahilyanagar Politics : आ.अमोल खताळ यांच्‍या विजयाने तालुक्‍यात परिवर्तन होवू शकते हा विश्वास विधानसभा निवडणूकीच्‍या निमित्‍ताने सर्वांना मिळाला. भवि‍ष्‍यात अशाच संघटीतपणे आपल्याला स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूकीत यश मिळवायचे असल्‍याने त्‍या दृष्‍टीने तयारी सुरु करा असा संदेश जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी महायुतीच्‍या  पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांना दिला. जलसंपदा मंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्‍या नंतर मंत्री विखे … Read more

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more

राज्य शासनाने दिलेल्या ८४ कोटींच्या निधीतील ११४ पैकी ५० टक्के कामे पूर्ण! तीन महिन्यात सर्व कामे पूर्ण होणार; महानगरपालिकेचे नियोजन

ahilyanagar city

अहिल्यानगर – राज्य शासनाने अहिल्यानगर शहरातील विविध प्रभागात कामांसाठी दिलेल्या सुमारे ८४ कोटी रुपयांच्या निधीतील सर्व ११४ कामे सुरू झाली आहेत. यातील ५० टक्के कामे पूर्णही करण्यात आली आहेत. उर्वरित कामे येत्या तीन महिन्यात पूर्ण होतील. त्या दृष्टीने महानगरपालिकेने नियोजन केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. राज्य शासनाने नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या … Read more

Ahilyanagar Manapa :अनधिकृत फ्लेक्स प्रकरणी महानगरपालिकेमार्फत शहरात १२ जणांवर गुन्हे दाखल ; ७११ फलकांवर कारवाई करत ३४ हजारांचा दंड वसूल

महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात महानगरपालिका प्रशासनाने १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर ७११ फलकांवर कारवाई करत ३४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा … Read more

Sangamner News : संजय गांधी निराधार योजनेसह विविध प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा !

संगमनेर (प्रतिनिधी)–संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विविध गावांमधील योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळवून दिला आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली अनेक प्रकरणे प्रलंबित असून ते तात्काळ मार्गी लावून तालुक्यातील निराधार ,वृद्ध व गोरगरीब , नागरिकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या … Read more

राधाकृष्ण विखेंची दिल्ली दरबारी चलती तरीही राज्यात बावनकुळेच महसूल मंत्री! बावनकुळे यांच्या नावासमोर का उमटली महसूल खात्याची मोहोर?

vikhe patil

Ahilyanagar Politics:- नुकतेच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले व अधिवेशन संपण्याच्या आधी खाते वाटप करण्यात आले. जर आपण करण्यात आलेल्या या खाते वाटपाचे स्वरूप बघितले तर यामध्ये अनेक दिग्गजांना धक्का देण्यात आला व अनेक महत्त्वाचे खाती ही अशा आमदारांना मिळाली की ते कोणाच्या मनात देखील नव्हते. असाच काहीसा प्रकार माजी महसूल मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्यातीलच नव्हे … Read more

अहिल्यानगर शहरातील पतंग व मांजा विक्रेत्यांना महानगरपालिकेच्या नोटिसा! नायलॉन मांजा आढळल्यास २५ हजारांचा दंड करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

ahilyanagar

अहिल्यानगर – शहरातील पतंग व मांजा विक्रेत्यांना अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नायलॉन मांजा विक्री न करण्याबाबत, कायद्याचे पालन करण्याबाबत प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तोफखाना, बागडपट्टी यासह शहरातील ज्या ज्या ठिकाणी पतंग व मांजा विक्री होते, तेथे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून २५ हजारांचा दंड आकारण्यात येणार … Read more

सरकार कुठेतरी कमी पडतंय ! मस्साजोग प्रकरणी खा. नीलेश लंके यांची प्रतिक्रिया

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून सरकार कोठेतरी कमी पडत असल्याची प्रतिक्रिया खा. नीलेश लंके यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत खा. नीलेश लंके यांनी मस्साजोग येथे जात देशमुख परिवाराने सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. खा. बजरंग सोनवणे,आ. राजेश टोपे … Read more

इंडिया आघाडीच्या आंदोलनात खा. लंके यांचा सहभाग, संतोष देशमुख हत्या, बांगलादेशातील अत्याचाराविरोधात आंदोलन

बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच बांगलादेशातील हिंदू व ख्रिश्चन बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या कामकाजास सुरूवात होण्यापूव संसदेसमोर आंदोलन केले. नगरचे खासदार नीलेश लंके हे या आंदोलनात सहभागी झाले होते. हत्येचा आरोप असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा, खुनाचे कारण असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपींना हत्येच्या … Read more

वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत महत्त्वाचे नियम आहेत का माहिती? वडिलोपार्जित संपत्तीवर किती कालावधीपर्यंत करता येतो दावा?

property rule

Ancestral Property Rule:- मालमत्ता किंवा प्रॉपर्टी हा एक संवेदनशील विषय असून याबाबत भारतात अनेक प्रकारचे कायदे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा प्रॉपर्टी किंवा मालमत्तेच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेताना हा त्या नियमांच्या किंवा कायद्याच्या चौकटीत राहूनच घ्यावा लागतो. बऱ्याचदा अशा प्रकारचे कायदे किंवा नियम माहिती नसल्याने बऱ्याच जणांचा गोंधळ होतो व विनाकारण वाद उद्भवतात. त्यामुळे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्रीपदावरून पेटणार दक्षिण व उत्तरेत वाद? आघाडी सरकारच्या काळातला जिल्ह्यातील 3 कॅबिनेट मंत्र्यांचा पॅटर्न महायुतीने बदलला

mahayuti

Ahilyanagar News:- काल विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्र्यांचा शपथविधी पार पडला व अहिल्यानगर जिल्ह्याला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने एकच मंत्र पद मिळाले. तसे पाहायला गेले तर या वेळेस अहिल्यानगर जिल्ह्यातून अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर दुसऱ्यांदा निवडून गेलेले संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळेल अशी एक अपेक्षा होती. इतकेच नाही तर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत गेलेल्या … Read more

अहिल्यानगर- मनमाड रस्त्याच्या कामाच्या अपेक्षा वाढल्या! या रस्त्याच्या कामासाठी 2500 कोटी रुपयांची तरतूद; केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींची माहिती

bhausaheb wakchaure

Ahilyanagar News:- गेल्या कित्येक दिवसापासून रखडलेल्या अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाच्या कामाला आता वेग येईल आणि काही दिवसांनी त्याचे काम सुरु होण्याची शक्यता असून गेल्या कित्येक दिवसापासून अतिशय बिकट अवस्थेत असलेला हा महामार्ग अनेक लोकांच्या मृत्यूला देखील कारणीभूत ठरलेला आहे. परंतु आता लवकरात लवकर या महामार्गाचे काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे व त्यामागील प्रमुख कारण … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकारण पुन्हा विखेंच्या भोवतीच! जिल्ह्याच्या विकासासाठी विविध खात्यांचा मंत्रीपदाचा त्यांचा अनुभव येणार कामी

vikhe patil

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा वर चष्मा दिसला व महाविकास आघाडीचा मात्र पूर्ण जिल्ह्यातून सुपडा साफ झाला. या सगळ्या विजयाचे शिल्पकार म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली असून सलग सातव्यांदा मंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांची सलग सातव्यांदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी! दक्षिण अहिल्यानगर मात्र मंत्रीपदापासून दूरच

vikhe patil

Ahilyanagar News:- बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेल्या महायुती सरकारचा शपथविधी कधी होईल याची सगळ्यांना प्रतीक्षा लागून राहिली होती व अखेर ही प्रतीक्षा काल संपली. काल विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथे महायुतीच्या जवळपास 39 मंत्र्यांनी यामध्ये पद व गोपनीयतेची शपथ घेतली. काल झालेला हा शपथविधी सोहळा अनेक अर्थांनी वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण देखील ठरला. यामध्ये भारतीय जनता … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ दोन शिवसेना आमदारांना मिळणार मंत्रीपदाची संधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिरत्या मंत्रिपदाचा पॅटर्न राबवल्यास होईल फायदा

eknaath shinde

Ahilyanagar News:- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका पार पडल्या व त्यांचा निकाल देखील जाहीर झाला व या निवडणुकांमध्ये राज्यात महायुती सरकारला प्रचंड असे बहुमत मिळाले. तसेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी देखील झाला. परंतु आता राज्यातील मंत्री मंडळामध्ये बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले असून कुणाला कोणते मंत्रिपद मिळते? … Read more