ट्रक भीषण अपघातात ५ ठार तर २४ जण जखमी

वृत्तसंस्था :- आसामच्या उदलगुडी जिल्ह्यात अनियंत्रित ट्रक झाडाला धडकून उलटल्यानंतर शनिवारी झालेल्या भीषण अपघातात ५ ठार तर २४ जण जखमी झाले. नववधूला सासरी सोडून तिचे नातलग ट्रकने गावाकडे परतत असताना नसोनसाली गावाजवळ ही दुर्घटना घडली. यावेळी भरधाव अनियंत्रित ट्रक झाडाला धडकल्यानंतर जागेवरच उलटला. या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू … Read more

कोरोना संशयित असलेल्या ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24 टीम / बुलडाणा ;- सौदी अरेबियातून परतलेल्या चिखली येथील अकरा जणांपैकी कोरोना संशयित असलेल्या एका ७६ वर्षीय वृद्धाचा बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात १४ मार्च रोजी सायंकाळी मृत्यू झाला. कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यानेे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. चिखली शहरातील एका मुस्लिम वस्तीमधील वेगवेगळ्या कुटुंबातील चार दाम्पत्य, … Read more

ज्योतिरादित्यांच्या कारवर दगडफेक करत जीवघेणा हल्ला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / वृत्तसंस्था :- ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ताफ्यावर शुक्रवारी सायंकाळी येथील काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या प्रकरणी अज्ञात ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजप कार्यकर्त्यांन शिंदेंवर प्राणघातक हल्ला झाल्याचा दावा केला आहे. ‘ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कारचा ताफा शुक्रवारी सायंकाळी येथील कमला पार्क भागातून जात होता. त्यावेळी काही अज्ञात कार्यकर्त्यांनी … Read more

..या कारणामुळे प्रवाशांना मोफत मास्क!

अहमदनगर लाईव्ह24 टीम / वृत्तसंस्था :- कोरोनाने जगभरासह भारतातही दहशत निर्माण केली असताना प्रवाशांच्या आरोग्यासाठी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसमधील वाहकाने शनिवारी प्रवाशांना मोफत मास्क वाटले. यासाठी बसचे वाहक एम. एल. नदाफ व चालक एच. टी. मयन्नावर यांनी स्वखर्चातून मास्क खरेदी केले होते. कोरोनाच्या भीतीने लोक एसटी प्रवास टाळत आहेत. त्यामुळे मास्क देऊन प्रवाशांना प्रोत्साहित … Read more

तिसरे लग्न करणाऱ्या व्यक्तीला मांडवातच अटक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / वृत्तसंस्था :- ओडिशा राज्यात तिसरे लग्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी लग्नाच्या मांडवातच अटक केली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि खुर्दा जिल्ह्यातील धलापथर भागातील ही घटना आहे. येथे राहणारा शिवप्रसाद मंगराज याने पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पत्नीचा लग्नानंतर तो छळ करत होता. आरोपीने तिसरे लग्न करण्याचाही घाट घातला होता. … Read more

ज्याेतिरादित्य शिंदे हे अस्तनीतील साप!

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साेशल मीडियावर व्हायरल केलेल्या एका पाेस्टरमध्ये काँग्रेसचे सर्वात तरुण नेते ज्याेतिरादित्य शिंदे यांना अस्तनीतील साप असे संबाेधले आहे.  पाेस्टरमध्ये एका बाजूला काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य व वरिष्ठ नेते प्रमाेद तिवारी, त्यानंतर राहुल गांधी, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी-वढेरा व कमलनाथ यांचे छायाचित्रे पाेस्टरवर … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी 

अहमदनगर लाईव्ह24 टीम / नवी दिल्ली :- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. ती १ जानेवारी २०२० पासून लागू होणार आहे. आता महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा ४८ लाख केंद्रीय कर्मचारी … Read more

अंगाचा थरकाप उडवणारी घटना : ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले तोच व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन समोर !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एका व्यक्तीचा मृत्यू झाला. व त्यानंतर अंत्यसंस्कार झाले आणि तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन समोर आला तर ? होय अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना पंजाबमध्ये घडलेली आहे. एका व्यक्तीला मृत्यूनंतर पुरण्यात आलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मृत व्यक्ती चक्क घरी परतली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ज्याचा मृत्यू … Read more

सरकार पाडण्याचे भाजपचे षड‌्यंत्र अयशस्वी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या सरकारला कोणताही धोका नसून ते पाडण्याचे भाजपचे षड‌्यंत्र निष्फळ ठरल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या आमदार रामबाई सिंह यांनी अपहरण आणि मारहाण झाल्याचा दावा फेटाळला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी, पक्षाचे प्रवक्ते विवेक तन्खा आणि माध्यम विभागप्रमुख … Read more

काँग्रेसच्या आमदारांना ३५ कोटींची लाच!

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याच्या अनुषंगाने भाजपकडून सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना तब्बल ३५ कोटींची लाच देऊन घोडेबाजार केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केला आहे. एवढेच नव्हे, तर भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान हे मुख्यमंत्री तर नरोत्तम हे उपमुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत आहेत, असा दावासुद्धा त्यांनी केला … Read more

ट्रम्प-मोदी भेट राष्ट्रीय सुरक्षा, वैश्विक अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाची

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक भेट ही राष्ट्रीय सुरक्षा आणि वैश्विक अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाची आहे, असा सूर अमेरिकेच्या खासदारांनी मंगळवारी काढला आहे. भारत चांगला मित्र, सहकारी आणि पृथ्वीतलावरील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे, असेही या खासदारांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत … Read more

महाराष्ट्र सदनात सैनिकांचा घोर अपमान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात देशाच्या रक्षणासाठी जीवाची आहुती देणाऱ्या सैनिकांना जेवणाच्या ताटावरून उठवण्याचा निषेधार्ह प्रकार नवीन महाराष्ट्र सदनात घडला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या गोरखा रेजिमेंटच्या जवानांना व्हीआयपी नसल्याचे सांगून सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जेवणाच्या भर ताटावरून उठवल्याचे समोर आले आहे. छत्रपती … Read more

बस आणि कंटेनर ट्रकमध्ये जोरदार धडक, 19 प्रवाशांचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / चेन्नई : तामिळनाडूच्या तिरपुर जिल्ह्यात केरळ राज्य परिवहन मंडळाच्या बस आणि ट्रकमध्ये टक्कर होऊन भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, या बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.  या अपघातात 19 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून  20 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. तमिलनाडु: तिरुपुर जिले के अविनाशी शहर … Read more

खळबळजनक: त्यांनी महाविद्यालयात काढली तब्बल ६८ मुलींची अंतर्वस्त्रे!

अहमदाबाद : मासिक पाळी आली किंवा नाही, हे पडताळून पाहण्यासाठी गुजरातच्या एका महाविद्यालयाने तब्बल ६८ विद्यार्थिनींना त्यांची अंतर्वस्त्रे काढण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना शुक्रवारी उजेडात आली आहे. गुजरातच्या भूज येथील सहजानंद गर्ल्स इ्स्टिटट्यूटमध्ये ही घटना घडली आहे. या संस्थेच्या नियमांनुसार, विद्यार्थिनींना मासिक पाळी येते तेव्हा त्यांना कॉलेजमधील धार्मिक स्थळ व हॉस्टेलच्या स्वयंपाक घरात जाण्यास बंदी … Read more

धक्कादायक! ‘आप’ आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार, एका कार्यकर्त्याचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या ‘आम आदमी पक्षा’च्या आमदारावर गोळीबाराची घटना  घडली आहे. मेहरुलीचे आमदार नरेश यादव यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडण्यात आला.   Shots fired at AAP MLA@MLA_NareshYadav and the volunteers accompanying him while they were on way back from temple. At least one volunteer has passed away due to … Read more

हे आहे ‘व्हॅलेंटाईन डे’ आणि अरविंद केजरीवालांचं कनेक्शन!

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा आपकडे एकहाती सत्ता सोपवली आहे. त्यामुळे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून लवकरच  शपथ घेतील.  केजरीवाल यांचं व्हॅलेंटाईन डे कनेक्शन समोर येत आहे. त्यामुळे ते 14 फेब्रुवारी रोजी शपथ घेतील असा अंदाज आहे. पहिल्यांदा अरविंद केजरीवाल … Read more

आप चा हा विद्यमान आमदार आप सोडून गेला राष्ट्रवादी कडे आणि मिळाली इतकी मते 

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 चा निकाल जवळपास आला आहे. यात आम आदमी पक्षाने 63 जागांवर आघाडी घेत तिसऱ्यांदा दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकली. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या दिमाखदार विजयानंतर अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘आम आदमी पक्षा’चा राजीनामा देऊन राष्ट्रवादीच्या … Read more

दिल्ली निवडणुकीत उतरलेल्या राष्ट्रवादीच्या त्या उमेदवारांच काय झाल ?

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 63 जागांवर आघाडी मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला आहे, तर काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. दिल्ली निवडणुकांच्या रिंगणात राष्ट्रवादीचे पाच उमेदवारही उतरले होते, त्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. दिल्ली कँटॉन्मेंट – वीरेंद्रसिंह कडियान (आप)  26 हजार, तर मनिष सिंह  (भाजप)  17 हजार मतं सुरेंद्र सिंह 854 मतं … Read more