हिप्नोटाईज करून बलात्काराचा प्रयत्न !

नवी दिल्ली :- हल्ली घरातली छोट्यातली छोटी वस्तु ही ऑनलाईन मागवली जाते. ऑनलाईन वस्तु खरेदी केल्यानंतर डिलिव्हरी बॉय घरपोच सामना पोहचवतात, त्यामुळं हा पर्याय लोकांना सोयिस्कर असतो. मात्र नवी दिल्लीत या ऑनलाईन डिलिव्हरीचा एक भयंकर प्रकार घडला आहे. डिलिव्हरी बॉयनं सामना देताना चक्क महिलेला सम्मोहित केले. अॅमेझॉनवरून खरेदी केलेल्या वस्तु पोहचवण्यासाठी घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयनं … Read more

जागतिक मंदीचा सर्वाधिक फटका भारतालाच

नवी दिल्ली : २००८ साली अमेरिकेतील सबप्राईम समस्येमुळे आलेल्या जागतिक मंदीचा भारतावर फारसा परिणाम झाला नव्हता; पण सध्या हळूहळू गंभीर होत असलेल्या आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका भारतासारख्या उभरत्या अर्थव्यवस्थानाच बसेल, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलीना जॉर्जिवहा यांनी काढला आहे. क्रिस्टलीना यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर दहावर्षातील नीचांकी पातळीला पोहोचण्याची भीती व्यक्त केली आहे. ९० … Read more

टोमॅटोचा दर कडाडला

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कांद्यानंतर आता टोमॅटो ८० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. कर्नाटकसह प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरवठा प्रभावित झाला असून, त्यामुळे टोमॅटोचे दर कडाडले आहेत. मात्र, मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दिल्लीमध्ये कांदा आता ६० रुपये आहे. मागील काही दिवसांत टोमॅटो महागला आहे. टोमॅटोच्या … Read more

शेहला रशीदने राजकारण सोडले !

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील लोकांवर होत असलेले अत्याचार सहन होत नसल्याचे सांगत सहा महिन्यांपूर्वी मुख्य राजकारणात आलेली ‘जेएनयू’ची माजी विद्यार्थी नेता शेहला रशीदने बुधवारी राजकारण सोडण्याची घोषणा केली. काश्मीर खोऱ्यात बीडीसी निवडणूक होणार असताना शेहलाने हा निर्णय घेतला आहे. शेहलाने मार्च महिन्यात माजी आयएसएस अधिकारी शाह फैसल यांच्या जम्मू-काश्मीर पीपल्स मुव्हमेंट (जेकेपीएम) पक्षामध्ये प्रवेश केला … Read more

राहुल गांधींनी देश सोडल्याने काँग्रेसची दैना

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची समीक्षा करणे गरजेचे होते; परंतु राहुल गांधी यांनी ऐनवेळी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतरही आम्ही त्यांच्याबद्दल निष्ठा दाखविली. त्यामुळेच पक्षाची दैना झाली, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी पक्षाची दयनीय स्थिती बुधवारी उजागर केली आहे. काँग्रेस सध्या अडचणीत आहे. अशावेळी निवडणूक जिंकणे तर सोडाच, … Read more

काँग्रेसचा निवडणुकीवर बहिष्कार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणल्यानंतर राज्यात होऊ घातलेल्या गटविकास परिषदेच्या (बीडीसी) निवडणुकीवर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. राज्य प्रशासनाची उदासीन भूमिका आणि वरिष्ठ नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याचा हवाला देत काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने जम्मू-काश्मीरला उद्ध्वस्त केले, असा आरोपसुद्धा काँग्रेसने केला आहे. जम्मू-काश्मिरात येत्या २४ ऑक्टोबर रोजी बीडीसी निवडणूक होत आहे. गेल्या … Read more

‘जिओ’ वापरकर्त्यांनो…फुकट कॉल विसरा

मुंबई: ‘जिओ’द्वारे लागू करण्यात येणरे हे शुल्क ‘जिओ’ ते ‘जिओ’ कॉल केल्यास, ‘जिओ’ ते स्थिरभाष दूरध्वनीवर (लॅण्डलाईन) कॉल केल्यास किंवा ‘जिओ’च्या इंटरनेटसेवेवरील व्हॉट्सअप किंवा तत्सम ध्वनीसंदेश (व्हॉईस कॉल) संपर्क सेवा पुरवणाऱ्या सुविधांसाठी लागू नसेल. याशिवाय, ‘जिओ’च्या वापरकर्त्यांना भरावे लागणाऱ्या या शुल्काची परतफेड कंपनीकडून इंटरनेट डेटा सेवेच्या शुल्कातून भरून दिले जाईल. म्हणजेच, तेवढ्या पैशांचा अधिकचा डेटा वापरकर्त्यांना उपलब्ध होईल. दरम्यानस ‘जिओ’वर येणारे (इनकमिंग) … Read more

भारत पेट्रोलियम हिस्सेदारी रिलायन्स इंडस्ट्रीजला विकणार ?

नवी दिल्ली : सरकारी तेल विपणन कंपनी भारत पेट्रोलियम यामधील आपली हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत मोदी सरकार असून ती खरेदी करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका पाहणी संस्थेच्या माहितीनुसार इंडियन ऑईल कॉर्पोरेशनही यासाठी बोली लावण्यास तयार आहे.निर्गुंतवणुकीच्या बाबतीत सरकारच्या बीपीसीएलमधील ५३.२९ टक्के अशी पूर्ण हिस्सेदारी विकण्याची शिफारस … Read more

माकडाची गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी एकास अटक

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात एका माकडाची गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी बंदूक परवाना असलेल्या एका व्यक्तीला रविवारी पोलिसांनी अटक केली. झिंझाना पोलीस ठाणे हद्दीतील अबदान गावातील हाफिज अहमद नावाच्या व्यक्तीने शनिवारी एका माकडाची गोळी झाडून हत्या केली. संबंधित प्रकार निदर्शनास आल्यानंतर बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत निदर्शने केली. यानंतर पोलिसांनी … Read more

आठ कोटींचे रक्तचंदन जप्त,तिघांना अटक

भोपाळ : मध्य प्रदेशच्या राज्यस्तरीय ‘टायगर स्ट्राइक फोर्सच्या (एसटीएसएफ) सतर्कतेमुळे धार जिल्ह्यातील एका टोलनाक्याजवळ तब्बल ८ कोटी रुपयांचे १५,५०० किलो रक्तचंदन जप्त करण्यात आले. यावेळी तामिळनाडूतील दोघांसह ३ तस्करांना अटक केल्याचे रविवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन आरोपी एका वाहनातून विदेशात मागणी असणारे रक्तचंदन चेन्नई येथून मुरादाबादकडे घेऊन जात असताना धामनोद येथील खलघाट टोलनाक्याजवळ एसटीएसएफच्या पथकाने … Read more

अयोध्या खटल्यात राममंदिराच्या बाजूनेच निकाल येईल !

गोरखपूर : अयोध्येतील वादग्रस्त भूखंडासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या नियमित सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राममंदिराच्या मुद्यावर लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचे सूचक विधान केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते शनिवारी गोरखपूरस्थित चंपादेवी पार्कमध्ये मोरारी बापू यांच्या रामकथा वाचनाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील अयोध्या खटल्यात राममंदिराच्या बाजूनेच … Read more

महराष्ट्रात राहुल गांधी प्रचार करणार नाहीत

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी प्रचार करणार नाहीत. राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. वायनाड या मतदारसंघापुरतंच ते स्वत:ला सीमित ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर राहुल गांधी नाराज असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोकससभा निवडणुकीत … Read more

भारत-पाक युद्धात जाणार साडेबारा कोटी लोकांचा बळी !

वॉशिंग्टन : ‘भारत-पाकमधील विद्यमान तणावाचे आण्विक युद्धात रूपांतर झाले तर त्यात दोन्ही देशांतील सुमारे १२.५ कोटी लोकांचा बळी जाऊन जगापुढे हिमयुगाचे गंभीर संकट उभे राहील’, असा इशारा अमेरिकन वैज्ञानिकांनी दिला आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या मुद्यावरून भारत-पाकमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकने याप्रकरणी आतापर्यंत अनेकदा भारताला अणुयुद्धाची धमकी दिली आहे. या स्थितीत खरोखरच उभय … Read more

गांधीजींचा सत्याचा मार्ग अनुसरा, मगच बापूंबद्दल बोला

लखनौ : भाजपने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी दाखविलेला सत्याचा मार्ग पहिल्यांदा अनुसरावा, त्यानंतरच बापूंविषयी बोलावे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी बुधवारी केली आहे.  गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे काँग्रेसने काढलेल्या ‘गांधी संदेश पदयात्रे’त प्रियंका गांधी यांनी सहभाग घेतला. शहीद स्मारकापासून काढलेल्या अडीच किमीच्या यात्रेत त्यांनी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन … Read more

बलात्काराच्या आरोपानंतर सभापतींचा राजीनामा

नवी दिल्ली : नेपाळच्या संसदीय सचिवालयात कार्यरत एका महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाल्यामुळे सभापती कृष्णा बहादुर महारा यांनी मंगळवारी राजीनामा दिला आहे. संसदेचे उपसभापती शिवमय तुम्बाहम्फे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपुर्द केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, असे सांगत कृष्णा बहादुर यांनी स्वत: निर्दोष असल्याचा दावा केला आहे. परंतु याचवेळी महिला … Read more

न्यूड पार्टीची जाहिरात करणाऱ्यास अटक

गोवा : येथे ‘न्यूड पार्टी’ साठी सोशल मीडियावर निमंत्रण अपलोड केल्याच्या आरोपाखाली बिहारमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अरमान मेहता असल्याचे कळते. तो संगणक शिक्षक असल्याची माहिती मिळते. तो मूळचा बिहार येथील राहणारा आहे. गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात २३ सप्टेंबर रोजी गोव्यात … Read more

सोशल मीडियाचे खाते आधार क्रमांकाशी जोडा !

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात फेसबूक, ट्विटर व इंस्टाग्राम आदी प्रकारचा सोशल मीडिया अभिव्यक्त होण्याचे महत्त्वाचे साधन बनले आहे; परंतु याद्वारे बनावट बातम्या अर्थात ‘फेक न्यूज’ मोठ्या प्रमाणावर दिल्या जात आहेत. त्यास चाप लावण्यासाठी सोशल मीडियाचे खाते आधार क्रमांकाशी संलग्नित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सोमवारी दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे देण्यात आलेली … Read more

हा मंत्री म्हणतोय कांदा महाग झालाय तर मग कमी खा !

नवी दिल्ली : देशात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस कांदा भडकत चालला आहे. अशावेळी कांद्यासंदर्भात एका पत्रकाराने केलेल्या प्रश्नाला यूपीमधील मंत्र्याने आगळावेगळा सल्ला दिलेला आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या अतुल गर्ग यांनी ‘दर वाढले तर कमी कांदा खावा’, असा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले … Read more