Solar Eclipse 2025 : 2025 मधील पहिले सूर्यग्रहण! 29 मार्चला दिसणार, पण भारतात दिसेल का ?

Solar Eclipse 2025 : खगोलशास्त्राच्या दृष्टीने 2025 मध्ये दोन सूर्यग्रहण होणार आहेत, यापैकी पहिले 29 मार्च 2025 रोजी आणि दुसरे 21 सप्टेंबर 2025 रोजी दिसणार आहे. 29 मार्च रोजी होणारे ग्रहण आंशिक सूर्यग्रहण असेल आणि उत्तर गोलार्धातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. हा एक दुर्मिळ खगोलीय क्षण असणार आहे, जिथे चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकेल, परंतु … Read more

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप ! 4.0 तीव्रतेचे जोरदार धक्के, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

सोमवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे लोक घराबाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, पहाटे 5.36 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टर स्केलवर मोजली गेली.भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीतील नांगलोई येथे होता. अधिकाऱ्यांकडून सतर्कतेचे निर्देश अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आणि सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले. … Read more

Delhi Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के ! एवढ्या मोठ्या हादऱ्यांमागचं कारण काय ?

आज सोमवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले, ज्यामुळे लोक घाबरून घरे आणि इमारती सोडून बाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या अहवालानुसार, सोमवारी सकाळी 5:36 वाजता 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. जरी तीव्रता तुलनेने कमी असली, तरीही धक्के अत्यंत जोरदार जाणवले. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये इमारती आणि वस्तू … Read more

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांचे दर्शन हवे आहे? मग ही मोठी चूक करू नका!

Kelii Kunj Ashram Advisory : वृंदावनमधील केली कुंज आश्रमाचे पूज्य संत प्रेमानंद महाराज हे भारतभर प्रसिद्ध आहेत. ते आपल्या गूढ आध्यात्मिक ज्ञानामुळे लाखो भक्तांचे मार्गदर्शन करतात. श्रीराधा-कृष्ण भक्तीचा प्रचार करताना, भक्तांना जीवनातील समस्यांवर उपाय सांगतात. त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तगण सहभागी होतात. त्यामुळे, त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया आणि नियम पाळावे लागतात. प्रेमानंद … Read more

मोदींचा देशाच्या संपत्तीवर डोळा ; राहुल गांधी यांचे टीकास्त्र

१५ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित लाचखोरीच्या मुद्द्यावर देशात मौन बाळगतात अन् विदेशात गेले असता याच लाचखोरीला वैयक्तिक प्रकरण असल्याचे सांगतात,असा टोला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी लगावला आहे.लाचखोरी व देशाची संपत्ती लुटणे हे मोदींसाठी वैयक्तिक प्रकरण बनले आहे,अशी खोचक टीका त्यांनी केली. पंतप्रधान … Read more

सावधान ! हवामानातील बदलामुळे धोक्याची घंटा वाजणार ?

१४ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : हवामानबदल पृथ्वीच्या जलचक्रावर गंभीर परिणाम करत आहे. २०२४ मध्ये कोट्यवधी लोकांना अतिवृष्टी, भीषण पूर आणि दुष्काळाचा सामना करावा लागण्यास हाच घटक कारणीभूत आहे,असे एका नव्या आंतरराष्ट्रीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘२०२४ ग्लोबल वॉटर मॉनिटर रिपोर्ट’ हा अहवाल ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, चीन, जर्मनी आणि इतर देशांतील संशोधकांनी तयार केला … Read more

शेअर मार्केटकडे लोकांची पाठ ! या ठिकाणी होतेय सर्वाधिक गुंतवणूक ; मिळतोय जबरदस्त परतावा

१४ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : शेअर बाजारात पडझडीचे वातावरण असतानाही जानेवारी महिन्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांत ३९,६८८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. लघु आणि मध्यम कंपन्यांच्या शेअर्सशी जोडलेल्या योजनांमध्ये भांडवलाचा ओघ वाढल्यामुळे एकूण गुंतवणूक वाढली आहे. परंतु ही निव्वळ गुंतवणूक डिसेंबरमधील ४१,१५६ कोटी रुपयांपेक्षा ३.५ टक्के कमी आहे. गुंतवणूकदारांचा इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये सातत्याने गुंतवणुकीचा जानेवारी हा … Read more

विशेष पोक्सो न्यायालयांसह ७९० जलदगती न्यायालये स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य ; उच्च न्यायालयात मात्र इतक्या न्यायाधीशांची पदे रिक्त

१४ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : देशभरातील न्यायालयांत प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच सर्वोच्च न्यायालयात २ तर विविध उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची ३६७ पदे रिक्त आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत दिली आहे.याचवेळी अनेक राज्यांमध्ये जिल्हा आणि अधिनस्थ न्यायपालिकेत सुमारे ५,३२० न्यायिक अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचेही केंद्राने सांगितले. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कायदा … Read more

लग्नाला न बोलवल्यामुळे नाराज बिबट्या घुसला थेट जेवणाच्या पंगतीत ; वधू-वरासह पाहुणे मंडळी फरार !

१४ फेब्रुवारी २०२५ लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील बुद्धेश्वर परिसरात एका लग्न समारंभात एकच खळबळ उडाली. कारण लग्न ऐन रंगात आले असताना तिथे बिबट्याने आपली ऐटदार एण्ट्री मारली आणि जीव वाचवण्यासाठी वधू-वर अनेक तास गाडीतच अडकून राहिले,अखेर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला पकडले. बुधवारी रात्री बुद्धेश्वर रिंग रोड परिसरातील विवाहस्थळी बिबट्या घुसल्याची घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. … Read more

दोषी व्यक्ती खासदार-आमदार कसा होऊ शकतो ?

१२ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली: फौजदारी प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर देखील एखादा व्यक्ती पुन्हा संसद आणि विधानसभेत कसा येऊ शकतो, असा परखड सवाल उपस्थित करत सर्वोच्च गुन्हेगारीकरण हा मोठा मुद्दा गुन्हा असल्याचे म्हटले.तसेच या प्रकरणात केंद्र व निवडणूक आयोगाला तीन आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. देशातील खासदार आणि आमदारांविरोधातील फौजदारी प्रकरणे तातडीने … Read more

‘ईव्हीएम’ मधील डेटा नष्ट करू नका ; सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य निवडणूक आयोगाला आदेश !

१२ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) च्या पडताळणी संदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम मधील डेटा नष्ट न करण्याचे आणि डेटा रिलोड न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुख्य निवडणूक आयोगाला दिले.तसेच याप्रकरणी मानक कार्यप्रणाली काय आहे, याची विचारणा न्यायालयाने आयोगाकडे केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ मार्च पासून … Read more

Ranveer Allahbadia चा शोमध्ये आक्षेपार्ह प्रश्न ! कारकिर्दीला मोठा धक्का

Ranveer Allahbadia : प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि कॉमेडियन समय रैनावर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला विचारलेल्या अत्यंत आक्षेपार्ह प्रश्नामुळे लोकांचा संताप उसळला आहे. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे, तर काहींनी त्याला बॉयकॉट करण्याचीही मागणी केली आहे. नेमके काय घडले? … Read more

Indian Railway : भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन: जगातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात लांब

भारतीय रेल्वेने देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन विकसित करण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच राज्यसभेत ही घोषणा केली. ही ट्रेन केवळ लांबी आणि ताकदीच्या बाबतीतच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या प्रगत पातळीवरही जगात अव्वल ठरेल. भारताची हायड्रोजन ट्रेन का असेल खास ? रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन पूर्णपणे स्वदेशी … Read more

Bank Holidays 2025 : लवकरच होणार बँक संप ! बँकेची कामे लवकर संपवून टाका

भारतातील बँक कर्मचारी संघटनांनी येत्या काही दिवसांत देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या संपाचे नेतृत्व करत आहे. हा संप विविध मागण्यांसाठी आयोजित केला जात असून, त्यामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील रिक्त पदे भरणे आणि बँक संचालक मंडळांवर कर्मचारी आणि अधिकारी संचालकांची नियुक्ती या प्रमुख मागण्यांचा समावेश … Read more

महाकुंभमध्ये ४२ कोटींहून अधिक भाविकांचे स्नान

८ फेब्रुवारी २०२५ प्रयागराज : येथील महाकुंभमेळा २०२५ मध्ये शुक्रवार सकाळ पर्यंत ४२ कोटींपेक्षा अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले. महाकुंभ मेळ्याला आणखी १९ दिवस शिल्लक असून स्नान करणाऱ्यांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.महाकुंभ मेळ्यादरम्यान मकर संक्रांत, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी अशी तीन अमृत स्नान पर्व झाली असली, तरी भाविकांचा उत्साह कायम आहे. … Read more

भाजपकडून आपच्या उमेदवारांचा घोडेबाजार : केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपने आमच्या उमेदवारांचा घोडेबाजार सुरू केला,असा खळबळजनक आरोप आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.या आरोपांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केली. या तक्रारीची दखल घेत उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) चौकशीचे आदेश दिले व ‘एसीबी’चे पथक … Read more

पाकच्या ७ घुसखोरांना कंठस्नान ; भारताकडे वाकड्या नजरेने बघाल तर असेच होणार !

८ फेब्रुवारी २०२५ श्रीनगर : जम्मू-काश्मिरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरी करणारे पाकिस्तानातील ७ दहशतवादी तथा सैनिकांचा खात्मा करण्यात लष्करी जवानांना मोठे यश आले आहे.यात कुख्यात अल-बदर या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या व पाकच्या ३ सैनिकांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे.या बेधडक कारवाईमुळे भारतीय चौक्यांवरील हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. गेल्या ४ फेब्रुवारीच्या रात्री … Read more

अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयावर निर्बंध

८ फेब्रुवारी २०२५ वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयावर (आयसीसी) निर्बंध लादण्याचे आदेश जारी केले आहेत. आयसीसीने इस्रायलविरोधात दिलेल्या तपासाच्या आदेशामुळे ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे.दुसरीकडे आयसीसीने ट्रम्प यांच्या या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध करत आपल्या १२५ सदस्य देशांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.अमेरिका व इस्रायलने कधीही … Read more